Tuesday, 20 January 2026

महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणार

 महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणार

दरम्यानसकाळ मीडिया ग्रुपच्या ग्लोबल इॅम्पॅक्ट फोरमवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत झाली.  त्यावेळी ते म्हणालेगेल्या दशकात महाराष्ट्राने सरासरी १० टक्क्यांहून अधिक विकासदर कायम राखला असूनराज्य २०३२ पर्यंत देशातील पहिले ट्रिलियन डॉलर्सची असणारी अर्थव्यवस्था बनू शकते. मात्रहा टप्पा आणखी वेगाने २०३० पर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असलीतरी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील ब्राइट स्पॉट’ आहे. जगभरातील विकासदर मंदावले असतानामहाराष्ट्र मात्र आपला विकासदर टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे.

 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम गुंतवणूकदारांसाठी चावडी

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम गुंतवणूकदारांसाठी चावडी

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बठक ही उद्योगगुंतवणूकदारासाठी एक प्रकारे चावडी आहे. याठिकाणी दरवर्षी आम्ही महाराष्ट्राकडे काय आहेकोणती क्षमता आहेहे शोकेस करण्यासाठी येत असतो. यंदाही गतवर्षीच्या तुलनेत आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास आहे. कारण देशात अशा प्रकारे येणारी गुंतवणूक व त्याबाबतचे करार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अशाप्रकारे सुमारे ६० ते ६५ करार प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राला यश मिळाले आहे. दावोस परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहेच. इथे उद्योगजगत एकत्र येतो. महाराष्ट्रातून आलेल्या उद्योजकांनी या मंचाचा पुरेपूर उपयोग करावाअसे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम गुंतवणूकदारांसाठी चावडी

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम गुंतवणूकदारांसाठी चावडी

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बठक ही उद्योगगुंतवणूकदारासाठी एक प्रकारे चावडी आहे. याठिकाणी दरवर्षी आम्ही महाराष्ट्राकडे काय आहेकोणती क्षमता आहेहे शोकेस करण्यासाठी येत असतो. यंदाही गतवर्षीच्या तुलनेत आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास आहे. कारण देशात अशा प्रकारे येणारी गुंतवणूक व त्याबाबतचे करार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अशाप्रकारे सुमारे ६० ते ६५ करार प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राला यश मिळाले आहे. दावोस परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहेच. इथे उद्योगजगत एकत्र येतो. महाराष्ट्रातून आलेल्या उद्योजकांनी या मंचाचा पुरेपूर उपयोग करावाअसे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

उद्योग, गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र

 विदेशी गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र भारताच गेट वे उद्योग, गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· राज्याच्या सर्व भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार

· दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज

· उद्योग, गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र

झ्युरिक, दि. 19 :- 'महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे ऑफ इंडिया आहे. त्यामुळे भारतातील अन्य राज्यांशी आमची चांगल्या अर्थाने स्पर्धा आहे. सरतेशेवटी देशासाठी ही बाब चांगलीच ठरते. पण यातही महाराष्ट्र पुढे आहे याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत प्रतिनिधीमंडळासमवेत दावोस येथे दाखल झाले आहेत. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पॅव्हेलीयन मध्ये माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी गुंतवणूक मिळवणार असून. त्यासाठी वैविध्यपूर्ण अशा दहा ते बारा क्षेत्रातील उद्योगांशी समन्वय साधला जात आहे. आता तिसरी मुंबई उभी राहते आहे. तिच्यासाठी मोठी गुंतवणूक मिळण्याचे संकेत आहेत. आमच्याकडे उत्तम मेन्यू कार्ड आहे . त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

मॅग्नेटिक महाराष्ट्रद्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

 

मुंबईदि. 18 : महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून 'मॅग्नेटिक महाराष्ट्रअधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्राची 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी WEF 2026 महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. गेल्यावर्षी 16 लाख कोटींचे गुंतवणूक करार महाराष्ट्राने केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे.

 

दावोस येथे होणाऱ्या या परिषदेदरम्यान जागतिक उद्योगसमूहगुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूकऔद्योगिक प्रकल्परोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

000

 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी 21 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुण पडताळणीसाठी

21 जानेवारीपर्यंत आक्षेप नोंदविता येतील

-परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक

 

मुंबई दि. १९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५ चा अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी / आक्षेप असल्यास http://mahatet.in या संकेतस्थळावर २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवार/ परीक्षार्थींना लॉगिन करुन ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईलअसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

 

अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाहीयाची संबंधित सर्व उमेदवार परीक्षार्थींनी नोंद घ्यावीअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्‍णा व गोदावरी

 बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत कृष्‍णा व गोदावरी महामंडळाच्‍या अंतर्गत सुरु असलेल्‍या प्रकल्‍पांच्‍या कामापैकी १५ प्रकल्‍प पूर्ण झाले आहेत. उर्वरित दोन प्रकल्‍प पूर्ण करण्‍याकरिता विभागाचे प्रयत्‍न असूनया दोन्‍हीही योजनांच्‍या अंतर्गत सुरु असलेल्‍या  कामांची गती वाढवून ही कामे पूर्णत्‍वास जाण्‍यासाठी सहकार्य करण्‍याची ग्‍वाही केंद्रीय मंत्री सी.आर पाटील यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi