महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणार
दरम्यान, सकाळ मीडिया ग्रुपच्या ग्लोबल इॅम्पॅक्ट फोरमवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी ते म्हणाले, गेल्या दशकात महाराष्ट्राने सरासरी १० टक्क्यांहून अधिक विकासदर कायम राखला असून, राज्य २०३२ पर्यंत देशातील पहिले ट्रिलियन डॉलर्सची असणारी अर्थव्यवस्था बनू शकते. मात्र, हा टप्पा आणखी वेगाने २०३० पर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील ‘ब्राइट स्पॉट’ आहे. जगभरातील विकासदर मंदावले असताना, महाराष्ट्र मात्र आपला विकासदर टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे.
No comments:
Post a Comment