विदेशी गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र भारताच गेट वे उद्योग, गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· राज्याच्या सर्व भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार
· दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज
· उद्योग, गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र
झ्युरिक, दि. 19 :- 'महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे ऑफ इंडिया आहे. त्यामुळे भारतातील अन्य राज्यांशी आमची चांगल्या अर्थाने स्पर्धा आहे. सरतेशेवटी देशासाठी ही बाब चांगलीच ठरते. पण यातही महाराष्ट्र पुढे आहे याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत प्रतिनिधीमंडळासमवेत दावोस येथे दाखल झाले आहेत. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पॅव्हेलीयन मध्ये माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी गुंतवणूक मिळवणार असून. त्यासाठी वैविध्यपूर्ण अशा दहा ते बारा क्षेत्रातील उद्योगांशी समन्वय साधला जात आहे. आता तिसरी मुंबई उभी राहते आहे. तिच्यासाठी मोठी गुंतवणूक मिळण्याचे संकेत आहेत. आमच्याकडे उत्तम मेन्यू कार्ड आहे . त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment