वैद्यकीय क्षेत्रातील मानवतावादी कार्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील विख्यात तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे यांना ही विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून एम डी पदवी प्राप्त केल्यानंतर, शहरात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक अतिमागास आणि डोंगराळ अशा मुखेड भागाची रुग्णसेवेसाठी निवड केली. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी सर्पदंशावरील उपचारांत क्रांती घडवून आणली आहे. 1988 मध्ये मुखेड परिसरात सर्पदंशामुळे होणारा 25 टक्के मृत्यूदर आज डॉ. पुंडे यांच्या शास्त्रीय उपचार पद्धतीमुळे शून्य टक्क्यांवर आला आहे. त्यांच्या या कार्याची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) दखल घेऊन त्यांची निवड 'राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समिती'मध्ये केली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 18 January 2026
77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील 'अॅट होम' सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण
77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील 'अॅट होम' सोहळ्यासाठी
महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण
नवी दिल्ली दि. 16 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित 'अॅट होम' स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळे, नांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना विशेष निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध 'कृषिरत्न' श्री. चंद्रशेखर हरि भडसावळे यांच्या शेती, नैसर्गिक शेती, शून्य-नांगरणी तंत्र (एसआरटी), जलसंवर्धन, कृषी पर्यटन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीची दखल या निमित्ताने घेण्यात आली आहे. 1976 पासून शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भडसावळे यांनी नेरळ येथील 'सगुणा बाग'ला एकात्मिक शेतीचा एक जागतिक दर्जाचा आदर्श नमुना म्हणून विकसित केले आहे. मत्स्यव्यवसाय, वनशेती, फलोत्पादन, गो-पालन आणि पर्यटन यांची सांगड घालणारे हे मॉडेल आज देशभरातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले असून, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे 'टीसीएस'कडून जतन
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे 'टीसीएस'कडून जतन
▪ वारसा जतन आणि संवर्धनात खासगी क्षेत्राला सहभागी करून घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्याकडून चालना
▪ मुंबईतील राजाबाई टॉवर, ग्रंथालय इमारत, वस्तुसंग्रहालयाचे संवर्धन
मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्यामुळे (टीसीएस) अधिक प्रभावीपणे होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी क्षेत्राला वारसा जतन आणि संवर्धनात सहभागी करून घेण्याच्या धोरणाला चालना दिली आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्मारके आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या संरक्षणात 'टीसीएस' आणि टीसीएस फाउंडेशन सक्रिय भूमिका बजावत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून गेल्या दशकात मुंबईतील ऐतिहासिक राजाबाई क्लॉक टॉवर आणि मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आला आहे.
मुंबईतील 156 वर्षे जुन्या राजाबाई टॉवरच्या बाह्य प्रकाशव्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच ग्रंथालयातील फर्निचरची दुरुस्ती व पुनर्स्थापना या कामांना शासनस्तरावर मिळालेल्या पाठबळामुळे गती मिळाली. या प्रकल्पासाठी 'टीसीएस'ने 8.90 कोटी रुपयांचे योगदान दिले असून, युनेस्कोने 2018 च्या आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत या उपक्रमाची दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (सीएसएमव्हीएस) यांच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. 'टीसीएस'ने या प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने एकूण 24.79 कोटी रुपयांचे योगदान दिले. सन 2022 मध्ये युनेस्कोच्या आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत ‘अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ मिळवणारा हा प्रकल्प वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आदर्श ठरला. गेल्या 100 वर्षांतील हे संग्रहालयाचे पहिले मोठे पुनर्संचयितीकरण कार्य ठरले आहे.
००००
कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया
कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया - डॉ. अजय कुमार सूद
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद म्हणाले की, भारतीय युवक हा जागतिक स्तरावर परिवर्तनाचा वाहक ठरत असून, कुतूहल, सर्जनशीलता व नवोपक्रम यांचा संगम असलेले शिक्षण हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरणार आहे.
शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापन, संकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण या तीन बदलांची गरज आहे. दर्जेदार शिक्षण, रोजगारक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती यामुळे भारताला जागतिक नेतृत्व प्राप्त होत असल्याचे डॉ. सूद यांनी सांगितले.
डॉ. सूद यांनी ‘एस-लाइफ फ्रेमवर्क’ची संकल्पना मांडत विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी नाते, प्रयोगशाळांचा पुनरुज्जीवन, संशोधनाचे अभ्यासक्रमात एकत्रीकरण, विज्ञान महोत्सवांचे आयोजन आणि तरुणांचा डिजिटल सहभाग यावर भर दिला.भारत सरकारचा ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रम संशोधन क्षेत्रात लोकशाहीकरण करत असून, देशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू असल्याचेही ते म्हणाले. तसेच, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0” च्या माध्यमातून आरोग्य, शेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या दिग्गजांच्या पाऊलखुणांवर चालत, आजचा युवक धैर्य, सर्जनशीलता आणि वचनबद्धतेच्या बळावर सक्षम भारत घडवेल, अशा शब्दांत डॉ. सूद यांनी नवस्नातकांना प्रेरित केले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) रविंद्र कुलकर्णी यांनी अहवालाचे वाचन केले.
२१व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, २१व्या शतकात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन होत आहे. विद्यार्थ्यांनी ‘कसे शिकायचे’ हे शिकण्यावर भर द्यावा. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक अनुभवात्मक, समावेशक आणि आनंददायी होईल. यामुळे विज्ञानाबरोबरच कला, क्रीडा, संस्कृती आणि मूल्यशिक्षणाचा समावेश होऊन सर्वांगीण विद्यार्थी तयार होतील.
शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. शिक्षकांना सक्षम करणे आणि शिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्तींना आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षण धोरणामुळे आत्मज्ञान, सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारी असलेला विद्यार्थी घडेल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी नमूद केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल
77
राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
· मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ
· विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान
मुंबई, दि. १७ :- मुंबई विद्यापीठ हे देशातील नवशिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे अग्रगण्य विद्यापीठ असून न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान विभूतींनी येथे शिक्षण घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नवस्नातकांनी देशाच्या प्रगतीत आपले मोलाचे योगदान द्यावे.राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचे भक्कम पायाभूत धोरण आहे. या धोरणाद्वारे विद्यार्थ्यांना नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची प्रेरणा मिळून देशाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सक्रीय सहभाग राहील, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृह फोर्ट येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. कार्यक्रमास केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.
अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत वाहनधारकांना मोठा दिलासा
अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत
वाहनधारकांना मोठा दिलासा
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच ईलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ई- व्हेईकल्स धारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापराकरिता पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांकरिता एकेरी प्रवासाचा पथकर दर ही निश्चित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे आहेत.
अ क्र | वाहनांचा प्रकार | शिवडी ते गव्हाण | शिवडी ते शिवाजीनगर | शिवाजी नगर ते गव्हाण |
१ | मोटर, जीप, व्हँन, हलके मोटार वाहन | २५० रु. | २०० रु. | ५० रु. |
२ | हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस | ४०० रु. | ३२० रु. | ८० रु. |
३ | ट्रक अथवा बस ( दोन आसांचे) | ८३० रु. | ६५५ रु. | १७० रु. |
४ | तीन आसांचे व्यावसायिक वाहन | ९०५ रु. | ७१५ रु. | १८५ रु. |
५ | अवजड बांधकाम यंत्रसामग्री, जमीन खोदाई यंत्रसामग्री, अधिक आसांचे वाहन | १३०० रु. | १०३० रु. | २७० रु. |
६ | अति अवजड वाहन, सात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन | १५०० रु. | १२५५ रु. | ३२५ रु. |
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...