77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील 'अॅट होम' सोहळ्यासाठी
महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण
नवी दिल्ली दि. 16 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित 'अॅट होम' स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळे, नांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना विशेष निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध 'कृषिरत्न' श्री. चंद्रशेखर हरि भडसावळे यांच्या शेती, नैसर्गिक शेती, शून्य-नांगरणी तंत्र (एसआरटी), जलसंवर्धन, कृषी पर्यटन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीची दखल या निमित्ताने घेण्यात आली आहे. 1976 पासून शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भडसावळे यांनी नेरळ येथील 'सगुणा बाग'ला एकात्मिक शेतीचा एक जागतिक दर्जाचा आदर्श नमुना म्हणून विकसित केले आहे. मत्स्यव्यवसाय, वनशेती, फलोत्पादन, गो-पालन आणि पर्यटन यांची सांगड घालणारे हे मॉडेल आज देशभरातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले असून, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
No comments:
Post a Comment