Friday, 16 January 2026

निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार

 महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सांगितले कीभारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकसुरळीत व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजनटेबल मांडणीअधिकारी व कर्मचारी यांची नेमणूकसुरक्षा व्यवस्थासीसीटीव्ही यंत्रणातसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहेअसेही आयुक्त गगराणी यांनी स्पष्ट केले.

मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला.

 महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशीविशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवारसहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवारअतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (कोकण विभाग) फरोग मुकादमसहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळेउपजिल्‍हाधिकारी महादेव किरवले यांच्‍यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६

 बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवारदिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (Strong Room) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभागपोलिस विभागाकडून  आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ ; २३ मतमोजणी कक्षात सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार

 बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ ;

२३ मतमोजणी कक्षात  सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार

-महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी

 

·         सुरक्षा व्यवस्थावाहतूक नियोजन व कायदा व सुव्यवस्‍थेबाबत आवश्यक ती दक्षता

·         मतमोजणीसाठी २ हजार २९९ अधिकारी - कर्मचारी नियुक्त

 

            मुंबईदि. १५ : बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत आज (दिनांक १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवारदिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थावाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल

 राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल

                                  - विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे

 

            नवी दिल्लीदि. 15: राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या माध्यमातून भारताचा लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल. तसेच ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

       नवी दिल्ली येथे 14 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी (सीपीएमहाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते.  परिषदेच्या दुसऱ्या दिवशी  त्यांनी 'महाराष्ट्र सदनयेथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि या जागतिक परिषदेचे महत्त्व आणि त्यातील चर्चेच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली.

 

            या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असूनयावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह 42 देशांचे संसदीय अध्यक्ष आणि भारतातील सर्व राज्यांचे पीठासीन अधिकारी उपस्थित होते. या ऐतिहासिक सोहळ्याचा संदर्भ देत प्रा. राम शिंदे म्हणाले कीभारताला या परिषदेचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असूनलोकशाहीच्या जननीसाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.


Thursday, 15 January 2026

मतदाताओं की उंगली पर स्याही लगाने के लिए मार्कर पेन के

 मतदाताओं की उंगली पर स्याही लगाने के लिए मार्कर पेन के उपयोग संबंधी आदेश राज्य निर्वाचन आयोग द्वारा 19 नवंबर 2011 तथा 28 नवंबर 2011 को जारी किए गए थे। तभी से स्थानीय स्वशासी संस्थाओं के चुनावों में मतदाताओं की उंगली पर स्याही लगाने हेतु मार्कर पेन का उपयोग किया जा रहा है। इन आदेशों के अनुसारमतदाता की उंगली पर स्याही स्पष्ट रूप से दिखाई देइस प्रकार मार्कर पेन से स्याही लगाई जानी चाहिए। इसके लिए नाखून पर तथा नाखून के ऊपर की त्वचा पर तीन से चार बार स्याही रगड़कर लगाई जानी चाहिए। ये निर्देश पहले भी दिए गए हैं और संबंधित मार्कर पेन पर भी अंकित किए गए हैं।

अतः राज्य निर्वाचन आयोग ने नागरिकों से अपील की है कि वे स्याही मिटाने जैसी किसी भी प्रकार की गड़बड़ी न करें।

000


स्याही मिटाकर गड़बड़ी से दोबारा मतदान संभव नहीं

 स्याही मिटाकर गड़बड़ी से दोबारा मतदान संभव नहीं

मुंबईदि. 15: मतदान के बाद उंगली पर लगाई गई स्याही को मिटाने का प्रयास कर मतदाताओं में भ्रम पैदा करना एक दंडनीय अपराध है। यदि कोई व्यक्ति उंगली की स्याही मिटाकर दोबारा मतदान करने का प्रयास करता हुआ पाया जाता हैतो उसके विरुद्ध उचित कानूनी कार्रवाई की जाएगीऐसा स्पष्टीकरण राज्य निर्वाचन आयोग ने दिया है।

उंगली की स्याही मिटाकर कोई भी व्यक्ति गड़बड़ी करने का प्रयास करेतब भी संबंधित मतदाता दोबारा मतदान नहीं कर सकता। इस संबंध में आवश्यक सतर्कता और व्यवस्थाएं पहले से ही की गई हैं। मतदाता द्वारा मतदान करने के बाद उसकी विधिवत प्रविष्टि दर्ज की जाती है। इसलिए केवल स्याही मिटाने से दोबारा मतदान करना संभव नहीं है। इस बाबत सभी संबंधित अधिकारियों को पुनः सतर्क रहने के निर्देश दिए गए हैं।

Featured post

Lakshvedhi