Friday, 16 January 2026

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल

 राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल

                                  - विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे

 

            नवी दिल्लीदि. 15: राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या माध्यमातून भारताचा लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल. तसेच ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

       नवी दिल्ली येथे 14 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी (सीपीएमहाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते.  परिषदेच्या दुसऱ्या दिवशी  त्यांनी 'महाराष्ट्र सदनयेथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि या जागतिक परिषदेचे महत्त्व आणि त्यातील चर्चेच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली.

 

            या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असूनयावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह 42 देशांचे संसदीय अध्यक्ष आणि भारतातील सर्व राज्यांचे पीठासीन अधिकारी उपस्थित होते. या ऐतिहासिक सोहळ्याचा संदर्भ देत प्रा. राम शिंदे म्हणाले कीभारताला या परिषदेचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असूनलोकशाहीच्या जननीसाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi