Friday, 16 January 2026

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ ; २३ मतमोजणी कक्षात सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार

 बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ ;

२३ मतमोजणी कक्षात  सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार

-महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी

 

·         सुरक्षा व्यवस्थावाहतूक नियोजन व कायदा व सुव्यवस्‍थेबाबत आवश्यक ती दक्षता

·         मतमोजणीसाठी २ हजार २९९ अधिकारी - कर्मचारी नियुक्त

 

            मुंबईदि. १५ : बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत आज (दिनांक १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवारदिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्थावाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi