महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही आयुक्त गगराणी यांनी स्पष्ट केले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 16 January 2026
मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला.
महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी (कोकण विभाग) फरोग मुकादम, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांच्यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (Strong Room) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभागाकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ ; २३ मतमोजणी कक्षात सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ ;
२३ मतमोजणी कक्षात सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार
-महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी
· सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन व कायदा व सुव्यवस्थेबाबत आवश्यक ती दक्षता
· मतमोजणीसाठी २ हजार २९९ अधिकारी - कर्मचारी नियुक्त
मुंबई, दि. १५ : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत आज (दिनांक १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.
राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल
राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल
- विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे
नवी दिल्ली, दि. 15: राष्ट्रकुल संसदीय परिषदेच्या माध्यमातून भारताचा लोकशाहीचा वारसा जागतिक स्तरावर अधिक उजळून निघेल. तसेच ही परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली येथे 14 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेसाठी (सीपीए) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे उपस्थित होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी 'महाराष्ट्र सदन' येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि या जागतिक परिषदेचे महत्त्व आणि त्यातील चर्चेच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली.
या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले असून, यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह 42 देशांचे संसदीय अध्यक्ष आणि भारतातील सर्व राज्यांचे पीठासीन अधिकारी उपस्थित होते. या ऐतिहासिक सोहळ्याचा संदर्भ देत प्रा. राम शिंदे म्हणाले की, भारताला या परिषदेचे यजमानपद भूषवण्याची ही चौथी वेळ असून, लोकशाहीच्या जननीसाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.
Thursday, 15 January 2026
मतदाताओं की उंगली पर स्याही लगाने के लिए मार्कर पेन के
मतदाताओं की उंगली पर स्याही लगाने के लिए मार्कर पेन के उपयोग संबंधी आदेश राज्य निर्वाचन आयोग द्वारा 19 नवंबर 2011 तथा 28 नवंबर 2011 को जारी किए गए थे। तभी से स्थानीय स्वशासी संस्थाओं के चुनावों में मतदाताओं की उंगली पर स्याही लगाने हेतु मार्कर पेन का उपयोग किया जा रहा है। इन आदेशों के अनुसार, मतदाता की उंगली पर स्याही स्पष्ट रूप से दिखाई दे, इस प्रकार मार्कर पेन से स्याही लगाई जानी चाहिए। इसके लिए नाखून पर तथा नाखून के ऊपर की त्वचा पर तीन से चार बार स्याही रगड़कर लगाई जानी चाहिए। ये निर्देश पहले भी दिए गए हैं और संबंधित मार्कर पेन पर भी अंकित किए गए हैं।
अतः राज्य निर्वाचन आयोग ने नागरिकों से अपील की है कि वे स्याही मिटाने जैसी किसी भी प्रकार की गड़बड़ी न करें।
000
स्याही मिटाकर गड़बड़ी से दोबारा मतदान संभव नहीं
स्याही मिटाकर गड़बड़ी से दोबारा मतदान संभव नहीं
मुंबई, दि. 15: मतदान के बाद उंगली पर लगाई गई स्याही को मिटाने का प्रयास कर मतदाताओं में भ्रम पैदा करना एक दंडनीय अपराध है। यदि कोई व्यक्ति उंगली की स्याही मिटाकर दोबारा मतदान करने का प्रयास करता हुआ पाया जाता है, तो उसके विरुद्ध उचित कानूनी कार्रवाई की जाएगी, ऐसा स्पष्टीकरण राज्य निर्वाचन आयोग ने दिया है।
उंगली की स्याही मिटाकर कोई भी व्यक्ति गड़बड़ी करने का प्रयास करे, तब भी संबंधित मतदाता दोबारा मतदान नहीं कर सकता। इस संबंध में आवश्यक सतर्कता और व्यवस्थाएं पहले से ही की गई हैं। मतदाता द्वारा मतदान करने के बाद उसकी विधिवत प्रविष्टि दर्ज की जाती है। इसलिए केवल स्याही मिटाने से दोबारा मतदान करना संभव नहीं है। इस बाबत सभी संबंधित अधिकारियों को पुनः सतर्क रहने के निर्देश दिए गए हैं।
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...