राज्यस्तरीय समिती समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, शहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभाव, मानवता, संविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या शहिदी समागम उपक्रमांची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या पार पडलेली असून त्याच उपक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांचा भव्य शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. व कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करून नांदेड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी, असेही रामेश्वर नाईक म्हणाले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 10 January 2026
15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले की, महाराष्ट्र शासन व विविध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सध्या तयारी वेगाने सुरु आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची पूर्णत: काळजी घेतली जाईल. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध 25 समित्यांची स्थापना करण्यात आली असून समित्यांवर सोपविलेल्या कामाप्रमाणे नियुक्त अधिकारी व कर्मचारी दक्षतेने कामे करीत आहेत. भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास, पाणी व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी विविध रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत.
संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे महत्त्व
जथ्येदार साहेब भाई कुलवंत सिंग जी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून शीख व इतर समाजाचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणाऱ्या योगदानाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. भाविकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले
नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रम ऐतिहासिक करावा पत्रकार परिषदेत आवाहन
नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रम ऐतिहासिक करावा
पत्रकार परिषदेत आवाहन
नांदेड, दि. 9 :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले.
सचखंड पब्लिक स्कूल येथील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महेंद्र रायचूरा (धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख पश्चिम क्षेत्र ) महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी उपस्थित होते.
जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षेवर सखोल मार्गदर्शन
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड
यांची विशेष मुलाखत
सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षेवर सखोल मार्गदर्शन
मुंबई, दि. 9: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्याचबरोबर सायबर फसवणूक, ऑनलाईन आर्थिक गुन्हे, बनावट संदेश, फेक प्रोफाइल्स, वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावा, कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत, सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ काय करावे, याबाबत पोलीस उप आयुक्त कराड यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागांत प्रसारित होणार असून, पहिला भाग मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी तर दुसरा भाग मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे
X (Twitter) : https://twitter.com/
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
महाराष्ट्राची समृद्ध परंपरा सर्वदूर पोहोचवणे हेच आमचे ध्येय
महाराष्ट्राची समृद्ध परंपरा सर्वदूर पोहोचवणे हेच आमचे ध्येय
-निवासी आयुक्त आर. विमला
निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी या महोत्सवाच्या सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अटकेपार झेंडा फडकवून महाराष्ट्राची प्रचिती दिली, तोच सांस्कृतिक वारसा आज राजधानीत आणि संपूर्ण देशात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. मकर संक्रांत हा सण देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, या विविधतेतील एकता जपत महाराष्ट्राची विशेष खाद्य संस्कृती, विशेषतः ' हुरडा' आणि मराठमोळ्या परंपरा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या भावना आणि संस्कृती अधिक प्रभावीपणे मांडली जात असून, यातून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख दिल्लीत निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र सदनात मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन महाराष्ट्र सदनात मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी
महाराष्ट्र सदनात मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन
महाराष्ट्र सदनात मराठी संस्कृतीची मेजवानी मनाला सुखद धक्का देणारी
-अभिनेते भरत जाधव
नवी दिल्ली,9 : एक कलाकार म्हणून कलेविषयी आणि आपल्या संस्कृतीविषयी बोलताना मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त न करण्याजोगा असतो. महाराष्ट्र सदनात पहिल्यांदाच असा अनुभव घेताना मला मनापासून समाधान वाटत आहे. दिल्लीसारख्या महानगरात, जिथे विविध प्रांतांचे लोक येतात, तिथे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीची चव पोहोचवणे हे अभिमानास्पद कार्य आहे, अशा शब्दांत लोकप्रिय अभिनेते भरत जाधव यांनी दिल्लीतील मराठी उपक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित मकर संक्रांती महोत्सव व हुरडा पार्टीचे उद्घाटन भरत जाधव यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, माहिती संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे उपस्थित होते.
यावेळी भरत जाधव म्हणाले, महाराष्ट्रात हुरडा पार्टीचा आनंद सर्वजण घेतोच, पण परराज्यात आपल्या माणसांसाठी अशी मेजवानी मिळणे ही मोठी पर्वणी आहे. या उपक्रमामुळे दिल्लीतही महाराष्ट्राचा सुगंध दरवळतो आहे. सर्व दिल्लीकरांनी या गावरान मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)