‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड
यांची विशेष मुलाखत
सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व सायबर सुरक्षेवर सखोल मार्गदर्शन
मुंबई, दि. 9: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय कार्यक्रमात ‘सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, त्याचबरोबर सायबर फसवणूक, ऑनलाईन आर्थिक गुन्हे, बनावट संदेश, फेक प्रोफाइल्स, वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावा, कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी काय उपाययोजना आवश्यक आहेत, सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ काय करावे, याबाबत पोलीस उप आयुक्त कराड यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत दोन भागांत प्रसारित होणार असून, पहिला भाग मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी तर दुसरा भाग मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी रात्री 8.00 वाजता
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध राहणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे
X (Twitter) : https://twitter.com/
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
No comments:
Post a Comment