Saturday, 10 January 2026

शहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभाव, मानवता, संविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा

 राज्यस्तरीय समिती समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले कीशहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभावमानवतासंविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या शहिदी समागम उपक्रमांची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या पार पडलेली असून त्याच उपक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांचा भव्य शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. व कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करून  नांदेड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी, असेही रामेश्वर नाईक म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi