Sunday, 7 December 2025

सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा वापर -

 सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा वापर -

राज्यात संकलित झालेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधील ६० टक्के निधी राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सेवारत तथा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांवर खर्च केला जातो. उर्वरित ४० टक्के निधी राज्याचे राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सैनिक मुला-मुलींची वसतिगृहे व सैनिक विश्रामगृहे निर्माण करण्यासाठी व चालवण्यासाठी वापरला जातो.

निधी संकलन -

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२३ सालासाठी महाराष्ट्र राज्याला ३६ कोटी ६४ लाख रुपये उद्दिष्ट दिले होतेपरंतु ४३ कोटी ६८ लाख २ हजार ५४ रुपये म्हणजेच ११९.२१ टक्के निधी संकलित झाला. तर सन २०२४ वर्षासाठी ४० कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले होतेपण नागरिकांच्या उस्फुर्त सहभागामुळे ४८ कोटी ९४ लाख ८१ हजार ३१८ रुपये म्हणजेच १२२.३७ टक्के निधी संकलित झाला आहे. ही आकडेवारी देशवासीयांच्या देशभक्तीचीसैनिकांप्रती असलेल्या आदराचीप्रेमाचीसन्मानाची व अभिमानाची साक्ष असून या निधीच्या माध्यमातून आपणही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी थेट योगदान देऊ शकतो.

ध्वज दिनाचा उद्देश

 ध्वज दिनाचा उद्देश

*नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे.

*सैनिकांच्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करुन देणे.

*शहीद सैनिकांचे कुटुंबजखमी जवानमाजी सैनिक यांच्या कल्याणासाठी मदत उपलब्ध करणे.

*सैनिकांसाठी नागरिकांमध्ये कर्तृत्वदातृत्व निर्माण करणे.

*तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सहकाराची भावना वाढीस लावणेहे ध्वज दिनाचे उद्देश आहेत. हा निधी लोकसहभागातून संकलित केला जातो आणि तो थेट सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरला जातो.

ध्वज निधी संकलन कशासाठी-  ध्वज दिन निधीमधून सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. जखमी आणि अपंग सैनिकांवर उपचारत्यांचे पुनर्वसननिवृत्त सैनिकांना आरोग्य सुविधानिवृत्ती वेतनशहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवले जातात. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर एखादे कुटुंब उघड्यावर पडू नयेयासाठी शासन आपली जबाबदारी निभवतेपरंतु सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्या पाल्याप्रती सहवेदना व्यक्त व्हावी हा देखील यामागचा उद्देश आहे.

ध्वजदिनाची पार्श्वभूमी २८ ऑगस्ट १९४९

 ध्वजदिनाची पार्श्वभूमी

२८ ऑगस्ट १९४९ रोजी देशाच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी नागरिकांना सशस्त्र सेनेचे प्रतिक असलेले छोटे ध्वज वितरित करुन निधी संकलनाची परंपरा सुरु करण्यात आली. १९९३ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध सैनिक कल्याण निधी एकत्र करुन त्याचे एकत्रित नाव "सशस्त्र सेना ध्वज दिन निधी" असे ठेवण्यात आले. तसेच हा निधी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येऊ लागला.

७ डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय लेख.. ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया..

 ७ डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय लेख..

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

मातृभूमीच्या रक्षणासाठीदेशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या शौर्यसमर्पण आणि देशसेवेला सलाम करण्याचा दिवस म्हणजे सशस्त्र सेना ध्वज दिन.! केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. परंतु देशवासीयांनाही सैनिकांप्रती कर्तव्य बजावण्याची संधी मिळावी आणि जनसहभागातूनही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी थेट निधी देता यावायासाठी ध्वज दिन निधी संकलन करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन राष्ट्रभक्तीच्या उत्साहात देशभर साजरा केला जात आहे..

हिंद की चादर समागम कार्यक्रमातून लाखो भाविक घेणार प्रेरणा

 हिंद की चादर समागम कार्यक्रमातून लाखो भाविक घेणार प्रेरणा

 

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मान्यवरांचे मार्गदर्शन

नारा येथे कार्यक्रमासाठी भव्य मंडप व लंगरसाठी स्वतंत्र दालने

जुताघरसाठी  लोकांनी घेतला स्वयंस्फूर्त पुढाकार

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची केली पाहणी

 

नागपूरदि.06 : आपल्या बलिदानातून धर्माचे जपलेले तत्व व मानवतेसाठी धर्माप्रती स्विकारलेली निष्ठा याचा मूलमंत्र देणारे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समारोहानिमित्त नागपूर येथे आयोजित महासत्संगाची जय्यत तयारी पूर्णत्वास आली आहे. सुमारे 5 लाख भाविकांसाठी व्यवस्था असलेल्या या सत्संगाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री नितीन गडकरीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारराज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेअल्पसंख्यांक मंत्री माणिकराव कोकाटेराज्यमंत्री माधुरी मिसाळवित्त राज्यमंत्री आशिष जयस्वालराज्यस्तरीय समन्वयक समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकअखिल भारतीय धर्म जागरणचे प्रमुख शरद ढोलेसंत ज्ञानी हरनाम सिंह जीमुखीदम दमा टकसाल (पंजाब)क्षेत्रीय आयोजन समिती विदर्भ प्रांतचे अध्यक्ष सरदार गुरमीत सिंग खोकर व मान्यवर उपस्थित राहणार आहे.

 

सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत या महासत्संगात विविध कार्यक्रमकिर्तन व प्रवचनाच्या माध्यमतून साधू संत मार्गदर्शन करणाार आहेत. दुपारी 3 ते 4.45 या कालावधीत मुख्य समारोह असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री योगी आदित्यनाथकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मान्यवर संवाद साधतील.

 

ऊर्जा क्षेत्रात 'एआय' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात

 ऊर्जा क्षेत्रात 'एआयतंत्रज्ञानाच्या माध्यमातून

 पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • महावितरणमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन
  • अमेरिकेच्या 'द रॉकफेलर फाउंडेशन', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेटव ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून उपक्रम

मुंबईदि. ४ :- राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या 'डिजिटल ट्वीनपद्धतीच्या माध्यमातून वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यात येणार आहे. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय )आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे 'एआयतंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रात पर्यावरणपूरक शाश्वत आर्थिक विकासाची सुरूवात होत असल्याचा विश्वास प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

            महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) 'द रॉकफेलर फाउंडेशन- आरएफ', 'ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट-जीईएपीपीआणि ऊर्जा विभाग यांच्या सहकार्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (एआय) आधारित डिजिटायझेशन उपक्रम राबविणार आहे. 

           मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजीव शाह यांची यावर्षी जानेवारीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये वीज वितरण प्रणालीमध्ये डिजिटल ट्वीन वापर करण्याची अतिशय नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आली. ऊर्जा विभागही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून त्यांनी महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला.

"आरएफ आणि जीईएपीपीसारख्या संस्थांच्या सहकार्यातून अत्याधुनिक एआय आधारित जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म हा देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेलवीज वितरण क्षेत्रातील कंपन्यासाठी हा एक आदर्श मानदंड असेलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

           रॉकफेलरचे अध्यक्ष डॉ. शाह यांच्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्राहक सेवा उन्नत करण्याकरिता आणि कालांतराने महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता एआय-आधारित निर्णय-सहाय्यक साधने अत्यंत उपयुक्त आहेत. महावितरण कंपनीसाठी विकसित होणाऱ्या उपाययोजना वीज वितरण क्षेत्रातील दीर्घकालीनशाश्वत आणि परिणामकारक सहाय्यभूत असतीलअसा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

      वीज वितरणमध्ये 'डिजिटल ट्वीनपद्धती विकसित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. नाविन्यपूर्ण एआय -आधारित उपक्रमातून शाश्वत पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढण्यासाठी ग्रामीण भागात मोठे बदल होतील.

संघर्ष से निकले युवा समाज के रोल मॉडल बनें

 संघर्ष से निकले युवा समाज के रोल मॉडल बनें


“हम जो कुछ भी प्राप्त करते हैं, वह समाज द्वारा बनाई गई व्यवस्था से संभव होता है — विद्यालय, संस्थाएँ, शासन और उद्योग सब मिलकर हमें अवसर देते हैं। इसलिए समाज को कुछ लौटाना हमारा कर्तव्य है। संघर्ष से आगे बढ़े ये युवा समाज में रोल मॉडल बनें, मुख्यमंत्री श्री फडणवीस ने कहा। “जहां पहुँचे हैं, वहीं न रुकें। आपका संघर्ष समाजसेवा की प्रेरणा बने। स्थिरता के बाद भी समाज के लिए कुछ करने की भावना बनाए रखें।”मनुष्य का कार्य ही उसे अमर बनाता है। कार्य के माध्यम से ही व्यक्ति जीवित रहता है। अपना कार्य ही अपनी पहचान बनाएं,” कार्यक्रम में उपस्थित सभी युवाओं का मुख्यमंत्री फडणवीस द्वारा सत्कार भी किया गया।


इस अवसर पर विनायक विश्वकर्मा नामक युवक ने मुख्यमंत्री के प्रति आभार व्यक्त करते हुए भावनात्मक कविता प्रस्तुत की:


“आज कुछ लेने नहीं, देने आया हूँ सर,


आपने आरक्षण दिया, गरीबी से ऊपर आया हूँ,


आप मुख्यमंत्री महाराष्ट्र के,


पर हम आपको ‘देवा भाऊ’ ही कहेंगे।” से निकले युवा समाज के रोल मॉडल बनें

हम जो कुछ भी प्राप्त करते हैंवह समाज द्वारा बनाई गई व्यवस्था से संभव होता है — विद्यालयसंस्थाएँशासन और उद्योग सब मिलकर हमें अवसर देते हैं। इसलिए समाज को कुछ लौटाना हमारा कर्तव्य है। संघर्ष से आगे बढ़े ये युवा समाज में रोल मॉडल बनें, मुख्यमंत्री श्री फडणवीस ने कहा। जहां पहुँचे हैंवहीं न रुकें। आपका संघर्ष समाजसेवा की प्रेरणा बने। स्थिरता के बाद भी समाज के लिए कुछ करने की भावना बनाए रखें।मनुष्य का कार्य ही उसे अमर बनाता है। कार्य के माध्यम से ही व्यक्ति जीवित रहता है। अपना कार्य ही अपनी पहचान बनाएं, कार्यक्रम में उपस्थित सभी युवाओं का मुख्यमंत्री फडणवीस द्वारा  सत्कार भी  किया गया।

इस अवसर पर विनायक विश्वकर्मा नामक युवक ने मुख्यमंत्री के प्रति आभार व्यक्त करते हुए भावनात्मक कविता प्रस्तुत की:

आज कुछ लेने नहींदेने आया हूँ सर,

आपने आरक्षण दियागरीबी से ऊपर आया हूँ,

आप मुख्यमंत्री महाराष्ट्र के,

पर हम आपको देवा भाऊ’ ही कहेंगे।

Featured post

Lakshvedhi