ध्वज दिनाचा उद्देश
*नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे.
*सैनिकांच्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करुन देणे.
*शहीद सैनिकांचे कुटुंब, जखमी जवान, माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी मदत उपलब्ध करणे.
*सैनिकांसाठी नागरिकांमध्ये कर्तृत्व, दातृत्व निर्माण करणे.
*तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सहकाराची भावना वाढीस लावणे, हे ध्वज दिनाचे उद्देश आहेत. हा निधी लोकसहभागातून संकलित केला जातो आणि तो थेट सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरला जातो.
ध्वज निधी संकलन कशासाठी- ध्वज दिन निधीमधून सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. जखमी आणि अपंग सैनिकांवर उपचार, त्यांचे पुनर्वसन, निवृत्त सैनिकांना आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवले जातात. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर एखादे कुटुंब उघड्यावर पडू नये, यासाठी शासन आपली जबाबदारी निभवते, परंतु सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्या पाल्याप्रती सहवेदना व्यक्त व्हावी हा देखील यामागचा उद्देश आहे.
No comments:
Post a Comment