Saturday, 6 December 2025

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विलेपार्ले येथे सांस्कृतिक कार्यक्रम

 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विलेपार्ले येथे सांस्कृतिक कार्यक्रम

 

मुंबईदि. ५ : प्रतिभावान दिव्यांग कलाकारांना एक अर्थपूर्ण व सर्जनशील मंच उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या कलागुणांचा समाजापुढे गौरवपूर्ण परिचय करून देणेहा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागसांस्कृतिक कार्य संचालनालयमुंबई यांनी ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहविलेपार्ले येथे  ३ डिसेंबर रोजी प्रतिभावान दिव्यांग कलावंतांचा 'स्वर-पंखया चित्रपट गीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

              

स्वर-पंख हे शीर्षक असलेला व "वो सुर जो उड़ान देते हैंअपने पंख ख़ुद बनाकर" ही टॅगलाइन असलेला हा कार्यक्रम संगीत संयोजकसर्व गायकवादक हे प्रतिभावान (दृष्टिहीन आणि गतिशीलता) दिव्यांग कलावंत यांनी सादर केला. त्यामध्ये संगीत संयोजन बिपिन वर्तकगायक- बिपिन वर्तकविनोद गावडेआफताब ठाकूर, मकरंद भोसलेसारिका शिंदेश्रध्दागौरी तसेच प्रमुख वादक संतोष मोहितेनागेश कांबळे यांचा सहभाग लाभला.

 

या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी स्वरपंख हा एक आगळा-वेगळा कार्यक्रम असून यामध्ये अतिशय प्रभावशाली दिव्यांग कलाकार सहभागी झालेले आहेत. दिव्यांग बंधू भगिनी यांना ईश्वराने विशेष शक्ती दिलेली असून ती वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर येत असते. तीच शक्ती संगीत आणि गीताच्या माध्यमातून आज आपणाला दिसत आहे. दिव्यांग कलाकार आणि सामान्य माणूस एकच असून एकसमान गतीने चालले पाहिजे त्यासाठी कला हे एक माध्यम असल्याचे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागार्फत राज्यभरात १२०० सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेतअसे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

              

या कार्यक्रमाचे संयोजन अतुल साटमकनक क्रिएशन यांनी केले. " स्वर- पंख या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. दिव्यांग कलावंतांच्या या अद्वितीय संगीत कार्यक्रमास प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी

 नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी

    -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

·        महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त करार

मुंबईदि. ०५ :- महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहेयामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि बाडेन-वुटेमबर्ग राज्याचे मंत्री मॅनफ्रेड लुखा यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारवैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारीवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवालेवैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरातयांच्यासह अर्चना बडेधीरेंद्र रामटेकेतसेच बाडेन-वुटेमबर्ग राज्य येथील सामाजिक व्यवहारआरोग्य आणि एकात्मता मंत्रालयाचे उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्याया करारानुसार भाषा प्रशिक्षणप्रगत कौशल्य विकासप्रमाणपत्र मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणेतसेच जर्मनीत नोकरी स्वीकारणाऱ्या नर्सेसच्या सन्मान व संरक्षणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने प्रशिक्षित नर्सिंग मनुष्यबळाची निर्मिती हा या कराराचा केंद्रबिंदू असणार आहे. दोन्ही राज्यांतील नर्सिंग शिक्षण संस्थाविद्यापीठे व प्रशिक्षण केंद्रांदरम्यान विद्यार्थीप्राध्यापक आदानप्रदानसंयुक्त प्रशिक्षणअभ्यासदौरे आणि संशोधन उपक्रम राबवून शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा उद्देश आहे.

मंत्री मॅनफ्रेड लुखा म्हणालेदोन्ही राज्यादरम्यान नर्सिंग व आरोग्यसेवा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. कौशल्याधारित आरोग्यसेवेचा विस्तार करणेसंशोधनाला चालना देणे तसेच परदेशी रोजगार संधी उपलब्ध करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्यामुळे तरुणांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ अधिक प्रशिक्षित व सक्षम होईल.

बाडेन-वुटेमबर्ग राज्याच्या प्रतिनिधी मंडळाने ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्याचा दौरा केला होता. नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य वाढवणेप्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे व कौशल्य विकासासाठी नवीन मार्ग उभारणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.

या उपक्रमामुळे महाराष्ट्र व बाडेन-वुटेमबर्ग राज्यांमधील आरोग्यसेवा व नर्सिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय भागीदारी अधिक बळकट होणार आहे.

0000

क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत, कलावंत, खेळाडू यांचा समृद्ध वारसा

 मंत्री श्री शेलार म्हणाले कीमहाराष्ट्राला संत-महात्मेक्रांतिकारकसमाजसुधारकविचारवंतकलावंतखेळाडू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अशा महनीय व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहेम्हणूनच शासन विविध क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चरित्रपट निर्मितीची योजना राबवत आहे. याच योजनेंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू आहे आणि आज या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण येथे संपन्न होत आहेही अत्यंत आनंदाची बाब आहे त्यांच्या  कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असेही ते म्हणाले.

 

यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी   विभागाच्या योजना व नावीन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती  दिली. महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी प्रास्ताविक केले.

 

यावेळी दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा पार पडला. गणेशोत्सव रिल्स स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

*

शासन विविध क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चरित्रपट निर्मितीची योजना राबवत आहे. याच योजनेंतर्गत

 मंत्री श्री शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला संत-महात्मे, क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत, कलावंत, खेळाडू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अशा महनीय व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे; म्हणूनच शासन विविध क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चरित्रपट निर्मितीची योजना राबवत आहे. याच योजनेंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू आहे आणि आज या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण येथे संपन्न होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असेही ते म्हणाले.

स्त्री-समानता, जातीय समता, पर्यावरण, ग्रामीण जीवन, नवउद्योग या असंख्य विषयांवर मराठी आणि भारतीय

 मंत्री  अॅड.आशिष शेलार म्हणाले कीचित्रपट हा फक्त मनोरंजन देणारा प्रयोग नाहीतो समाजाच्या मनाशी थेट संवाद साधणारेविचार जागवत राहणारे शक्तिशाली माध्यम आहे. स्त्री-समानताजातीय समतापर्यावरणग्रामीण जीवननवउद्योग या असंख्य विषयांवर मराठी आणि भारतीय चित्रपटांनी गेल्या दशकांत जनजागृती केली आहे.फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे. फिल्म सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातच अद्यावत ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग सेंटर मुंबईत उभा करणार आहोत असेही ते म्हणाले.

 

50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

 50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार

 

·        चित्रपट नगरीचा अंतिम आराखडा मंजूर

·        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण

 

मुंबईदि.5: सामाजिक आशयकलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरले आहेत. अशा 50 मराठी चित्रपटांना 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य आपणास वितरित करत आहोत. सन्मानित करतो आहोत. ही केवळ आर्थिक मदत नसून सामाजिक आशय असलेल्या नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर करणाऱ्या प्रेक्षकांच्या जाणीव जागृतीला हातभार लावणाऱ्या मराठी चित्रपटांना मदत करण्यासाठी शासन नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच चित्रपट नगरीचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे असेही ते म्हणाले.

 

रविंद्र नाट्यमंदिरात सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळागणेशोत्सव रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण केले. या कार्यक्रमप्रसंगी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री  अॅड.आशिष शेलार बोलत होते.

मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम गिनीज बुकमध्ये नोंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान होणार

 'मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

गिनीज बुकमध्ये नोंद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान होणार

 

·        छत्रपती संभाजीनगर ऑरिक सिटीत उद्या सोहळा

 

मुंबईदि. ४ : महाराष्ट्राने 'मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक केला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली आहे. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारअपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावेछत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाटऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकरऊर्जा विभागाच्य अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Featured post

Lakshvedhi