Saturday, 6 December 2025

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विलेपार्ले येथे सांस्कृतिक कार्यक्रम

 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विलेपार्ले येथे सांस्कृतिक कार्यक्रम

 

मुंबईदि. ५ : प्रतिभावान दिव्यांग कलाकारांना एक अर्थपूर्ण व सर्जनशील मंच उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या कलागुणांचा समाजापुढे गौरवपूर्ण परिचय करून देणेहा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागसांस्कृतिक कार्य संचालनालयमुंबई यांनी ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहविलेपार्ले येथे  ३ डिसेंबर रोजी प्रतिभावान दिव्यांग कलावंतांचा 'स्वर-पंखया चित्रपट गीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

              

स्वर-पंख हे शीर्षक असलेला व "वो सुर जो उड़ान देते हैंअपने पंख ख़ुद बनाकर" ही टॅगलाइन असलेला हा कार्यक्रम संगीत संयोजकसर्व गायकवादक हे प्रतिभावान (दृष्टिहीन आणि गतिशीलता) दिव्यांग कलावंत यांनी सादर केला. त्यामध्ये संगीत संयोजन बिपिन वर्तकगायक- बिपिन वर्तकविनोद गावडेआफताब ठाकूर, मकरंद भोसलेसारिका शिंदेश्रध्दागौरी तसेच प्रमुख वादक संतोष मोहितेनागेश कांबळे यांचा सहभाग लाभला.

 

या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी स्वरपंख हा एक आगळा-वेगळा कार्यक्रम असून यामध्ये अतिशय प्रभावशाली दिव्यांग कलाकार सहभागी झालेले आहेत. दिव्यांग बंधू भगिनी यांना ईश्वराने विशेष शक्ती दिलेली असून ती वेगवेगळ्या स्वरूपात बाहेर येत असते. तीच शक्ती संगीत आणि गीताच्या माध्यमातून आज आपणाला दिसत आहे. दिव्यांग कलाकार आणि सामान्य माणूस एकच असून एकसमान गतीने चालले पाहिजे त्यासाठी कला हे एक माध्यम असल्याचे ते म्हणाले. सांस्कृतिक कार्य विभागार्फत राज्यभरात १२०० सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेतअसे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. 

              

या कार्यक्रमाचे संयोजन अतुल साटमकनक क्रिएशन यांनी केले. " स्वर- पंख या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. दिव्यांग कलावंतांच्या या अद्वितीय संगीत कार्यक्रमास प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi