मंत्री श्री शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला संत-महात्मे, क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत, कलावंत, खेळाडू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अशा महनीय व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे; म्हणूनच शासन विविध क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चरित्रपट निर्मितीची योजना राबवत आहे. याच योजनेंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू आहे आणि आज या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण येथे संपन्न होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असेही ते म्हणाले.
यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी विभागाच्या योजना व नावीन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती दिली. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा पार पडला. गणेशोत्सव रिल्स स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
*
No comments:
Post a Comment