Tuesday, 4 November 2025

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

 विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

            विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घ्याव्या लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            या निर्णयानुसार विरार ते अलिबाग मार्गासाठीच्या भूसंपादनासाठी हुडकोचे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे. यामध्ये उभारण्यात येणाऱ्या कर्जास शासनाने हमी दिली आहे. तसेच यापूर्वीच्या हुडकोमार्फत निधी उभारण्यासाठीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे विरार ते अलिबाग मार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न सुटूनया मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. ही बहुउद्देशीय मार्गिका  126.06 कि.मी. लांबीची असेल. त्यापैकी मौजे नवघर (जि.पालघर) ते मौजे बलावली (ता.पेण) असे 96.410 कि.मी.चे पहिल्या टप्प्यातील काम बांधावापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’

 मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीराज्यातील महिलांच्या आर्थिकसामाजिकशैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या माध्यमातून महिला बचतगटांचे सक्षमीकरणमहिला सुरक्षा व न्यायप्रवेशआरोग्य व पोषण जनजागृतीशैक्षणिक व व्यावसायिक उन्नतीनेतृत्व विकास आणि सामाजिक सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे.

मंत्री तटकरे म्हणाल्या कीया अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबतची जनजागृती ग्रामस्तरावरील प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचविणे हे ध्येय ठेवले आहे. जिल्हातालुका आणि ग्रामस्तरीय समित्यांचे प्रशिक्षण तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी संबंधित विभागीय आयुक्तांना दिले.

ग्रामसमृद्धी योजनेच्या धर्तीवर ग्रामसभांमध्ये या अभियानाच्या प्रसारासाठी कार्यवाही करावीतसेच योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी माहिती पुस्तिका तयार करण्यात यावीअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियानाला’ गती

 महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियानाला’ गती

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. ३ : राज्यातील प्रत्येक महिलेच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या आदिशक्ती अभियानाला’ राज्यभर गती मिळत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यातील ३५१ तालुका आणि २६ हजार ५९ ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असूनया समित्यांचे प्रशिक्षण आणि अभियानाची कार्यवाही अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आदिशक्ती अभियान व पुरस्कार योजने’ च्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी विभागनिहाय आढावा घेतला. या बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादवसहसचिव वि.रा. ठाकूरसहआयुक्त राहूल मोरेअवर सचिव सुनील सरदार उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागाचे आयुक्तएकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कैलास पगारेतसेच छत्रपती संभाजीनगरनाशिककोकणनागपूर आणि अमरावती विभागांचे विभागीय आयुक्त सहभागी झाले होते.

माविमच्या ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’च्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी -

 माविमच्या नवतेजस्विनी गारमेंट युनिटच्या

माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ४ : महिलांना स्थानिक जागी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोहा येथे नवतेजस्विनी गारमेंट युनीटचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक बळकट होण्यास सहाय लाभणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या नवउद्योगात सहभागी होणाऱ्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

रोहा (रा.) येथे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) निर्मित नवतेजस्विनी गारमेंट युनिटचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या युनिटचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अनिकेत तटकरेमहाव्यवस्थापक महेंद्र गमरेप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे,  माविम अधिकारीपंचायत समिती सदस्यउमेद व नगरपरिषद प्रतिनिधीमहिला बचत गटातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीया उपक्रमामुळे रोहा तालुक्यातील महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू झाला आहे. महिलांचे प्रशिक्षणस्थानिक भागातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार असल्याने आता महिला आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचा आनंद आहे.

000000

गौरविलेल्या सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी

 गौरविलेल्या सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्यांची उभारणी

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबईदि. ३ : राज्यातील अंगणवाड्यांना आधुनिकसशक्त आणि पारदर्शक बनवून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत राज्यभरात व्यापक कार्यवाही सुरू आहे. या योजनेअंतर्गत उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरविण्यात आलेल्या १३ सरपंचांच्या गावांमध्ये स्मार्ट अंगणवाड्या उभारण्यात आल्या असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की१३ गावांतील अंगणवाड्यांना स्मार्ट स्वरूप देण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधाडिजीटल शिक्षण साधनेतसेच बालक आणि मातांसाठी आरोग्य व पोषण जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. हे काम पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे. एकात्मिक बालविकास सेवा (आयसीडीएसयोजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये बालकांना आरोग्यपोषण आणि पूर्व-प्राथमिक शिक्षण या तिन्ही क्षेत्रांत मूलभूत सेवा पुरविल्या जातात. या अंगणवाड्यांना स्मार्ट बनविण्याच्या उपक्रमामुळे त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये सुधारणा झाली असूनशिक्षण आणि पोषण सेवा अधिक प्रभावी पद्धतीने दिल्या जात आहेत.

 

महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हणाल्या कीस्मार्ट अंगणवाडी हे केवळ इमारतीचे नव्हेतर बालक आणि मातांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि संवेदनशील  दृष्टिकोन यांचा संगम घडवून अंगणवाड्यांना आदर्श केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असूनराज्यातील सर्व अंगणवाड्यांना टप्प्याटप्प्याने स्मार्ट स्वरूप देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.


एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी

 विशेष अभियान राबवावे

-  उपमुख्यमंत्री अजित पवार

·         एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व

पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 

       

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेएकल महिलांना समाजात सन्मानाची  वागणूक देणेमालमत्तेचे हक्क देणेआरोग्य सेवा उपलब्ध करून देणेत्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे. केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत करावी. पात्र एकल महिला लाभार्थींना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ द्यावाअसे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून राज्यस्तरीय संगणकीय डेटाबेस प्रणाली तयार करणेअंगणवाडी सेविका निवड प्रक्रियेप्रमाणे शासन निर्णयात बदल करून एएनएमस्टाफ नर्स निवड आणि एनएचएम भरती प्रक्रियेत एकल महिलांना प्राधान्य देणेत्यांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देणेव्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणेएकल महिलांसाठी गाव पातळीवर जागरूकता शिबिरे आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करणे,अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवावे

 एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी

 विशेष अभियान राबवावे

-  उपमुख्यमंत्री अजित पवार

·         एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व

पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 

         मुंबई, दि. ३ : एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे.त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावे,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह गृह येथे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मोहिमेच्या धर्तीवर राज्यस्तरावर अभियान राबविण्याबाबत बैठक झाली.

यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेराज्यमंत्री मेघना बोर्डीकर - साकोरेसामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही.राधामहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअन्न व नागरी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकरनियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवित्त विभागाच्या सचिव शैला ए.ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेमहिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुखसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायकपुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi