एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी
विशेष अभियान राबवावे
- उपमुख्यमंत्री अजित पवार
· एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व
पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश
मुंबई, दि. ३ : एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवून देण्याची गरज आहे.त्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय विशेष अभियान राबवावे,असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह गृह येथे एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या मोहिमेच्या धर्तीवर राज्यस्तरावर अभियान राबविण्याबाबत बैठक झाली.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर - साकोरे, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पुणे जिल्ह्याच्या पालक सचिव व्ही.राधा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment