Tuesday, 4 November 2025

एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी

 विशेष अभियान राबवावे

-  उपमुख्यमंत्री अजित पवार

·         एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व

पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

 

       

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेएकल महिलांना समाजात सन्मानाची  वागणूक देणेमालमत्तेचे हक्क देणेआरोग्य सेवा उपलब्ध करून देणेत्यांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे. केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रात एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत करावी. पात्र एकल महिला लाभार्थींना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ द्यावाअसे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून राज्यस्तरीय संगणकीय डेटाबेस प्रणाली तयार करणेअंगणवाडी सेविका निवड प्रक्रियेप्रमाणे शासन निर्णयात बदल करून एएनएमस्टाफ नर्स निवड आणि एनएचएम भरती प्रक्रियेत एकल महिलांना प्राधान्य देणेत्यांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देणेव्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणेएकल महिलांसाठी गाव पातळीवर जागरूकता शिबिरे आणि मार्गदर्शन सत्र आयोजित करणे,अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi