Tuesday, 4 November 2025

माविमच्या ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’च्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी -

 माविमच्या नवतेजस्विनी गारमेंट युनिटच्या

माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ४ : महिलांना स्थानिक जागी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोहा येथे नवतेजस्विनी गारमेंट युनीटचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक बळकट होण्यास सहाय लाभणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या नवउद्योगात सहभागी होणाऱ्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

रोहा (रा.) येथे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) निर्मित नवतेजस्विनी गारमेंट युनिटचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या युनिटचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अनिकेत तटकरेमहाव्यवस्थापक महेंद्र गमरेप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे,  माविम अधिकारीपंचायत समिती सदस्यउमेद व नगरपरिषद प्रतिनिधीमहिला बचत गटातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीया उपक्रमामुळे रोहा तालुक्यातील महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू झाला आहे. महिलांचे प्रशिक्षणस्थानिक भागातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार असल्याने आता महिला आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचा आनंद आहे.

000000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi