Thursday, 9 October 2025

सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हवाई प्रवास उपलब्ध करून देऊ

 सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हवाई प्रवास उपलब्ध करून देऊ

- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

देशातील सर्वोत्कृष्ट आणि कार्यक्षम विमान सेवा महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बहुप्रतिक्षित आणि महत्वाकांक्षी प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हवाई प्रवास उपलब्ध करून देईल. अशा प्रकल्पांमुळे आगामी काळात सामान्य जनतेच्या हवाई प्रवासात मोठी वाढ होईलअसे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

केंद्र सरकारच्या ठोस धोरणांमुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होत असूनहे देशाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहेअसे केंद्रीय राज्यमंत्री यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताच्या उड्डाणाला नवीन गती

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताच्या उड्डाणाला नवीन गती - केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किंजरापु राममोहन नायडू

 नवी मुंबई ही नवीन आशा आणि उत्साहाचे प्रतीक आहे. जागतिक दर्जाच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताच्या उड्डाणाला नवीन गती मिळाली आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठीच नव्हेतर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा आहेअसे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी केले.

2014 नंतर मुंबई विमानतळावर प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या 190 वरून 260 वर पोहोचली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नवी मुंबई विमानतळ नव्या संधींचे दार उघडणार आहे. अंदाजे ₹100 अब्ज गुंतवणुकीत उभारण्यात आलेले हे विमानतळ 30 हजार एकर क्षेत्रात पसरले असून सुमारे 2 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करेल. सार्वजनिक-खासगी भागीदारीचे हे एक आदर्श उदाहरण ठरेलअसेही त्यांनी सांगितले.

व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार

 व्यापारगुंतवणूकपर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापारगुंतवणूकपर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेतअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आज लोकार्पण झालेली मेट्रो-3 मार्गिका म्हणजे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे. कुलाबा-बांद्रा-सीप्झ हा मार्ग सुरु झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे. मेट्रो लाईन-3 च्या फेज 2-बीच्या उद्घाटनाने मुंबईला नवी गती मिळणार आहे. ही भुयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाहीतर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबरीने वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

मुंबई वनहे ॲप म्हणजे वन मुंबईवन ॲप या संकल्पनेची झलक आहे. हे ॲप मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभसुत्रबध्द आणि स्मार्ट बनविणार असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हे आपल्या युवकांसाठी आशेचे नवे दालन आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले दमदार पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देशाने विकासाची नवी झेप घेतली आहे. विकसित भारत 2047’ या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करत आहोत आणि महाराष्ट्र त्या प्रवासात अग्रस्थानी राहीलअसा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीमुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आज सुरू झालेले हे प्रकल्प म्हणजे या राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे आहेत. विमानतळ आणि मेट्रोच्या प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या जीवनमानात आणि महाराष्ट्राच्या प्रगतीच्या प्रवासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीभारताला आत्मनिर्भर आणि महासत्ता बनवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2014 मध्ये प्रगती आणि विकास घेऊन आले. नवी मुंबई हे केवळ विमानतळ नाहीतर नवीन भारतावरील महाराष्ट्राच्या विश्वासाचे प्रतीक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून फक्त विमानांचे उड्डाण होणार नाहीतर एक मजबूत आणि आत्मनिर्भर भारत उभारला जाणार आहे. 21 व्या शतकात प्रधानमंत्री मोदी यांनी देशाची जबाबदारी स्वीकारलीतेव्हा देशात केवळ 74 विमानतळ होते. गेल्या दहा वर्षांत ही संख्या दुप्पट होऊन 150 वर पोहोचली असून 2030 पर्यंत ती 220 करण्याचा संकल्प प्रधानमंत्री मोदी यांचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

देशातील सर्वात लांब भुयारी मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहेही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला हिरवा झेंडा देखील त्यांनी दाखवला होता. उत्तर आणि पश्चिम मुंबईला दक्षिण मुंबईशी भुयारी मार्गाने जोडणारी ही मेट्रो पायाभूत सुविधांचा उत्तम नमुना आहे. पुढील दोन-चार वर्षांत सर्व मेट्रो लाइन सुरू होतील आणि मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त एका तासात पोहोचता येणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळे देशातील प्रमुख पायाभूत प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत. राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलेला शब्द पाळला असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने पीएम किसान सन्माननिधी योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 33,565 कोटी रुपये दिलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. जे प्रकल्प स्वप्न रूपात होते

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीआजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. जे प्रकल्प स्वप्न रूपात होतेते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वास्तवात उतरले आहेत. नवी मुंबई विमानतळाची संकल्पना 1990च्या दशकात झाली असलीतरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती. प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रगती उपक्रमाअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर सर्व आवश्यक परवाने मिळवण्यात यश येऊन कामाला वेग आला. हे विमानतळ दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

विमानतळाबरोबरच अटल सेतू40 किमी लांबीची भूमिगत मेट्रो हे प्रकल्पही जलद गतीने पूर्ण झाले आहेत. या मेट्रोच्या निर्मितीत जपान सरकार आणि जायका संस्थेचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

 मुंबई वन’ या सर्वसमावेशक वाहतूक ॲपद्वारे मेट्रोमोनोरेलबसउपनगरी रेल्वे आणि वॉटर टॅक्सी या सर्व वाहतूक साधनांसाठी एकाच तिकीटाची सुविधा मिळणार आहे. तसेचतरुणांसाठी कौशल्य विकास विभागाच्या नव्या योजना जाहीर करण्यात आल्या असूनविमानतळ आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीपालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली भेट असून याच ठिकाणी देशातील पहिले ऑफशोर विमानतळ तयार करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चौथी मुंबई तयार होणार आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन



 नवी मुंबई विमानतळमेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचे 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 8 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाहीतर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात एक टक्क्यांची वाढ करण्याची क्षमता या प्रकल्पात आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रतउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडूवने मंत्री गणेश नाईकमाहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढामहिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईककेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजपानचे राजदूत ओनो केइचीअदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासह खासदारआमदारलोकप्रतिनिधी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीआजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. जे प्रकल्प स्वप्न रूपात होतेते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात वास्तवात उतरले आहेत. नवी मुंबई विमानतळाची संकल्पना 1990च्या दशकात झाली असलीतरी अनेक वर्षांपासून ती केवळ कागदावरच होती. प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रगती उपक्रमाअंतर्गत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर सर्व आवश्यक परवाने मिळवण्यात यश येऊन कामाला वेग आला. हे विमानतळ दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची हाताळणी करू शकणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले

लोकनेते दि. बा. पाटील यांचे काम प्रेरणादायी - प्रधानमंत्री

 लोकनेते दि. बा. पाटील यांचे काम प्रेरणादायी - प्रधानमंत्री

मराठीतून भाषणाची सुरूवात करून प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे पुत्रलोकनेते दि. बा. पाटील यांनी समाजासाठीशेतकऱ्यांसाठी ज्या सेवाभावी वृत्तीने काम केले ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन समाजसेवेचे काम करणाऱ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहीलअसा दि. बा. पाटील यांचा गौरवपूर्ण उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला.

Featured post

Lakshvedhi