सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हवाई प्रवास उपलब्ध करून देऊ
- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
देशातील सर्वोत्कृष्ट आणि कार्यक्षम विमान सेवा महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा बहुप्रतिक्षित आणि महत्वाकांक्षी प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा हवाई प्रवास उपलब्ध करून देईल. अशा प्रकल्पांमुळे आगामी काळात सामान्य जनतेच्या हवाई प्रवासात मोठी वाढ होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या ठोस धोरणांमुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण होत असून, हे देशाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात नमूद केले.
No comments:
Post a Comment