महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कटिबद्ध
- महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती प्रमुख मोनिका राजळे
· महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती मुंबईतील अभ्यास दौऱ्यात सुविधांबाबत समाधानी
मुंबई, दि. ८ : समस्याग्रस्त व गरजू महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे समितीच्या प्रमुख तथा आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. महिला व बालकांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि पुनर्वसनसंदर्भात योग्य सुविधा देण्यात येत असून, अधिक परिणामकारक व दीर्घकाळ उपाययोजना राबविण्यासाठी शासनास योग्य शिफारसी करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समितीने मुंबईतील भायखळा कारागृह, शताब्दी रुग्णालय (गोवंडी), बालसुधारगृह आणि महिला सुधारगृह (मानखुर्द) तसेच शहाजी मॅटर्निटी हॉस्पीटल (मानखुर्द) या संस्थांना भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान महिला व बाल विकास विभाग आणि नगरविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला.


No comments:
Post a Comment