Saturday, 4 October 2025

टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा

 टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत आणखी सुधारणा

 

मुंबईदि. २५ : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने गेल्या सहा महिन्यांत विविध उपक्रम राबवले आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आयोगाने टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ व स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मतपत्रिका / इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील टपाल मतपत्रिका यांची मोजणी आणि ईव्हीएमद्वारे मोजणी ह्या आयोगाच्या मतमोजणी प्रक्रियेतील दोन प्रमुख टप्पे आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू होतेतर सकाळी ८.३० वाजल्यापासून ईव्हीएमची मोजणी सुरू होते. पूर्वीच्या निर्देशांनुसारईव्हीएमची मोजणी टपाली मतपत्रिकांच्या मोजणीपासून स्वतंत्रपणे सुरू राहू शकत होतीत्यामुळे काहीवेळा ईव्हीएमची मोजणी टपाल मतपत्रिकांपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत असे.

अलीकडेच दिव्यांग मतदार व ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे टपाली मतपत्रिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत सुसंगती आणि स्पष्टता राखण्यासाठी ईव्हीएम/व्हीव्हीपॅटच्या मोजणीतील शेवटून दुसरी फेरी  टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू करण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

याशिवायज्या मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या मोठी आहेतिथे पुरेशा संख्येने टेबल्स आणि मोजणी कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयोगाने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेतजेणेकरून मतमोजणीची गती आणि पारदर्शकता कायम राहीलअसे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

000

स्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने

 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्या वसाहती आहेतत्‍या ठिकाणी अधिकाधिक सुविधा पुरविण्‍याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या मुलांना गुणवत्‍तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना राबविल्‍या जात आहेत. स्वच्‍छता कर्मचारी आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी महानगरपालिका आरोग्‍य शिबिरे घेत आहेहे निश्चितच कौतुकास्‍पद आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी 'डीप क्लीन ड्राईव्हअभियान राबविले. अभियानाच्या माध्यमातून मोठे काम झाले. त्याचा मोठा परिणाम झाला. अशाच प्रकारचे स्‍वच्‍छता अभियान पुन्‍हा राबवायचे आहेअसेही त्यांनी सांगितले.

उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणालेस्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने एक लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण केले आहे. नागरी वनेउद्यानांची देखभाल केली जात आहे. 'हरित क्षेत्रवाढवण्‍यावर भर दिला जात आहे. महालक्ष्‍मी रेसकोर्सची जागा उद्यानासाठी घेण्‍यात आली आहे. मुंबई किनारी मार्ग आणि महालक्ष्‍मी रेसकोर्स मैदान मिळून सुमारे ३०० एकर जागेवर 'मुंबई सेंट्रल पार्कचे काम लवकरच सुरु होईल. जागतिक दर्जाच्‍या सेंट्रल पार्कचा सविस्‍तर प्रकल्‍प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांसाठी रस्ते काँक्रिटीकरण करण्‍यात येत आहे. पुढील दीड - दोन वर्षात मुंबईतील संपूर्ण रस्‍त्‍यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्‍याचे उद्दिष्‍ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

राज्यात आज 'एक तास स्वच्छतेसाठी' अभियान सुरु आहे. हे अभियान वर्षभर सातत्याने सुरु ठेवायचे

 महानगरपालिकेच्या ए विभागातील महात्मा गांधी मार्ग (मेट्रो चित्रपटगृह ते फॅशन स्ट्रीट) परिसरात लोकसहभागातून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्‍तेपदपथ स्‍वच्‍छ करत पाण्‍याने धुवून काढण्‍यात आले. यावेळी स्‍वच्‍छतेविषयक सामूहिक शपथ घेण्‍यात आली.

उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे म्‍हणाले कीसंपूर्ण देशात तसेच राज्यात आज 'एक तास स्वच्छतेसाठीअभियान सुरु आहे. हे अभियान वर्षभर सातत्याने सुरु ठेवायचे आहे. प्रत्येक नागरिकाने स्‍वच्‍छतेसाठी पुढाकार घेतल्‍यास देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने देशात कोट्यवधी स्वच्छतागृहे उभी राहिली. पिण्‍याचे शुद्ध पाणी कोट्यवधी लोकांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे महाराष्‍ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नगरविकास विभागाने घनकचरा टाकण्‍यात येणारी सुमारे १९ हजार ९४० ठिकाणे शोधून काढली आहेत. त्‍यांच्‍या स्‍वच्‍छतेचे लक्ष्‍य निश्चित करण्‍यात आले आहे. राज्यभर स्‍वच्‍छताविषयक लोकसहभागाचे ६ हजार ३१७ कार्यक्रम होणार आहेत. स्‍वच्‍छता मित्रांसाठी आरोग्‍य शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छ हरित महोत्सवदेखील घेण्‍यात येणार आहे. यासमवेतच प्रभात फेरीस्वच्छता कामगार सन्मानपायाभूत सुविधांचे लोकार्पणसर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मानसर्वोत्कृष्ट नागरी स्वयंसेवक सन्मान असे विविध उपक्रम स्वच्छता ही सेवा’ या अभियानामध्ये राबविले जाणार आहेतअसे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार

 मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी 

स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार

-         उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात 'स्वच्छता ही सेवा २०२५या अभियानांतर्गत श्रमदान

 

मुंबईदि. २५ : मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार आणि कर्मचाऱ्यांमुळे मुंबई स्वच्छसुंदर आणि हिरवीगार आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ आहे. स्वच्छता कर्मचारी हे स्वच्छतेचे दूतवास्‍तवातील 'हिरोआहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छ-सुंदर शहरासाठी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्‍ह) सातत्याने सुरू राहीलअशी ग्वाही उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्‍वच्‍छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित असून त्‍याचे अनुकरण राज्‍यातील इतर महानगरपालिकांनी करावेअसे आवाहन उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

'स्वच्छता ही सेवा २०२५या अभियानांतर्गत 'स्‍वच्‍छोत्‍सवउपक्रम राबविण्‍यात येत आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्‍ते आणि कौशल्‍यरोजगारउद्योजकता आणि नाविन्‍यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामूहिक श्रमदान करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीनगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंद राजउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोनामहानगरपालिका उपायुक्तसहायक आयुक्‍तअधिकारीकर्मचारीकामगार शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थीस्‍वयंसेवी संस्‍थांचे प्रतिनिधीनागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.

विमानतळ नामकरण आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार

 विमानतळ नामकरण आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार

       नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. या आंदोलनातील गुन्ह्यांमुळे विमानतळावर नोकरी मिळण्यात अडचण येऊ नयेयासाठी हे गुन्हे रद्द करण्याचे निर्देश देण्यात येतील. काही आंदोलने कोविड काळात देखील झाले असल्याने काही आंदोलनकर्त्यांवर कोविड तरतुदीनुसार गुन्हे दाखल असून असे गुन्हे नियमानुसार न्यायालयाच्या परवानगीने मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास

लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

§  विमानतळाच्या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सकारात्मक प्रतिसाद

 

  • राज्यातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांचादेखील लवकरच नामविस्तार

 

मुंबईदि. ३: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विमानतळाला  दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही. असे स्पष्टपणे नमूद करून  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ' केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळअशा नावाने पूर्वी परवानगी दिली होतीत्यामध्ये नामविस्तार होऊन आता "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ" असे होईल. राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल', असा प्रतिसाद प्रधानमंत्री मोदी यांनी दिला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होईलतेव्हा 'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळअशीच अधिकृत उद्घोषणा निश्चितपणे होईल. या 'ड्राय रनकालावधीत विमान प्रवासी यांचे पुढील कालावधीचे आगाऊ बुकिंग नोंदवणेतांत्रिक बाबींची सज्जता अशा स्वरूपाची कार्यवाही होईलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला असून राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन केंद्र शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र शासनाच्या स्तरावर अशा नामकरणासाठी निश्चित असे धोरण ठरविले जात असून नवीन धोरणानुसार विमानतळाचे नामकरण लवकरच होणार आहे. 

लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे

 लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबईदि. २२ : लोकनाट्य/ तमाशा हे नाव संगीतबारी कला केंद्रासाठी न वापरण्याचे बंधन असावेया तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापित झालेल्या समितीकडे पाठविण्यात यावा. या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसात द्यावाअसे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात आज पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी येथे मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरेगृह विभागाचे उपसचिव अ.नि.साखरकरअवर सचिव बाळासाहेब सावंतअखिल भारतीय लोक कलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधवसल्लागार खंडुराज गायकवाडअविष्कार मुळेकिरणकुमार ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, शेषराव गोपाळआनंद भिसेसुनिल वाडेकर उपस्थित होते.

राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यापूर्वीच घेतला आहे. या समितीची कार्यकक्षा वाढवून नावात बदल करण्याबाबत ही समिती उपाययोजना सुचवेलअसे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबरया लोक कलावंतांना गावोगावी कला सादर करण्यासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता असते. यासंदर्भातही या नियुक्त समितीने उपाययोजना सुचवून पुढील १५ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi