Saturday, 4 October 2025

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास

लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

§  विमानतळाच्या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सकारात्मक प्रतिसाद

 

  • राज्यातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांचादेखील लवकरच नामविस्तार

 

मुंबईदि. ३: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विमानतळाला  दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य शासनाचा इरादा बदललेला नाही आणि केंद्र शासनाचा देखील वेगळा विचार नाही. असे स्पष्टपणे नमूद करून  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ' केंद्र शासनाने विमानतळ बांधकामाला परवानगी देताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळअशा नावाने पूर्वी परवानगी दिली होतीत्यामध्ये नामविस्तार होऊन आता "लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ" असे होईल. राज्य शासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसारच विमानतळास नाव देण्यात येईल', असा प्रतिसाद प्रधानमंत्री मोदी यांनी दिला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रत्यक्षात प्रवासी वाहतूक सुरू होईलतेव्हा 'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळअशीच अधिकृत उद्घोषणा निश्चितपणे होईल. या 'ड्राय रनकालावधीत विमान प्रवासी यांचे पुढील कालावधीचे आगाऊ बुकिंग नोंदवणेतांत्रिक बाबींची सज्जता अशा स्वरूपाची कार्यवाही होईलअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठीचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला असून राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन केंद्र शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र शासनाच्या स्तरावर अशा नामकरणासाठी निश्चित असे धोरण ठरविले जात असून नवीन धोरणानुसार विमानतळाचे नामकरण लवकरच होणार आहे. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi