Saturday, 4 October 2025

लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे

 लोकनाट्य व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याचा प्रस्ताव समितीपुढे

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबईदि. २२ : लोकनाट्य/ तमाशा हे नाव संगीतबारी कला केंद्रासाठी न वापरण्याचे बंधन असावेया तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापित झालेल्या समितीकडे पाठविण्यात यावा. या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसात द्यावाअसे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

तमाशा कलावंताच्या विविध प्रश्नासंदर्भात आज पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीप्रभादेवी येथे मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरेगृह विभागाचे उपसचिव अ.नि.साखरकरअवर सचिव बाळासाहेब सावंतअखिल भारतीय लोक कलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधवसल्लागार खंडुराज गायकवाडअविष्कार मुळेकिरणकुमार ढवळपुरीकर, रघुवीर खेडकर, शेषराव गोपाळआनंद भिसेसुनिल वाडेकर उपस्थित होते.

राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यापूर्वीच घेतला आहे. या समितीची कार्यकक्षा वाढवून नावात बदल करण्याबाबत ही समिती उपाययोजना सुचवेलअसे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबरया लोक कलावंतांना गावोगावी कला सादर करण्यासाठी विविध परवानग्यांची आवश्यकता असते. यासंदर्भातही या नियुक्त समितीने उपाययोजना सुचवून पुढील १५ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi