स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्या वसाहती आहेत, त्या ठिकाणी अधिकाधिक सुविधा पुरविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महानगरपालिका आरोग्य शिबिरे घेत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी 'डीप क्लीन ड्राईव्ह' अभियान राबविले. अभियानाच्या माध्यमातून मोठे काम झाले. त्याचा मोठा परिणाम झाला. अशाच प्रकारचे स्वच्छता अभियान पुन्हा राबवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वच्छतेबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण केले आहे. नागरी वने, उद्यानांची देखभाल केली जात आहे. 'हरित क्षेत्र' वाढवण्यावर भर दिला जात आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची जागा उद्यानासाठी घेण्यात आली आहे. मुंबई किनारी मार्ग आणि महालक्ष्मी रेसकोर्स मैदान मिळून सुमारे ३०० एकर जागेवर 'मुंबई सेंट्रल पार्क' चे काम लवकरच सुरु होईल. जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. पुढील दीड - दोन वर्षात मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment