Tuesday, 16 September 2025

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे

 कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

  • नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाचे अपूर्ण काम तातडीने सुरू करा.
  • साईनगरशिर्डी येथे संस्थानच्या वतीने कर्करोग रुग्णालय उभारणी

 

मुंबईदि. १५ : राज्यातील जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने धोरण तयार करावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री माधुरी मिसाळसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विनायक निपुणसचिव वीरेंद्र सिंगवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमारआरोग्य सेवा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे तसेच कॅन्सर केर प्रकल्पाचे मानद सल्लागार डॉ.कैलास शर्माटाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ.सी.एस. प्रमेशसंचालक डॉ.श्रीपाद बनावलीसंचालक डॉ.पंकज चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

कर्करोगावर प्रभावी उपचार होण्यासाठी विविध पातळ्यांवर कर्करोग उपचार केंद्रांची उभारणी आवश्यक असल्याचे असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर येथील संत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालयाच्या इमारतीचे अपूर्ण बांधकाम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. यासाठी आवश्यक निधी पुरवणी मागण्यात देण्यात येईल. श्री साई संस्थान यांच्या वतीनेही साईनगर, शिर्डी येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारणीबाबत साई संस्थानाला आवाहन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराज्यातील गरजू व्यक्तीला तत्काळ सेवा मिळाल्या पाहिजेयासाठी तीन प्रकारच्या उपचार केंद्रांपैकी एल ३ करिता सिंगल क्लाउड कमांड केंद्र स्थापन करावे. त्याचबरोबर कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना शीघ्र निदान व प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध करून द्यावी. प्रत्येक जिल्ह्यात समग्र कर्करोग उपचार सेवानिदानडे केअर रेडिओथेरेपी आणि केमोथेरपी युनिटची उभारणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले

मत्स्य व्यवसाय हा ग्रामीण व सागरी भागातील लाखो कुटुंबांचा मुख्य आधार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कीमत्स्य व्यवसाय हा ग्रामीण व सागरी भागातील लाखो कुटुंबांचा मुख्य आधार आहे. या क्षेत्रात आर्थिक वाढीच्या प्रचंड संधी आहेत. यासाठी व्यापक धोरण तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. आज झालेल्या सादरीकरणातून विकासाचा स्पष्ट मार्ग दिसत असून २०४७ पर्यंत या क्षेत्रातील विकासाच्या माध्यमातून राज्य विकसित अर्थव्यवस्थेच्या दिशेने जाऊ शकते. महिलांनी विकासात योगदान देणे हे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीव्हिजन मॅनेजमेंट युनिटची स्थापना करून मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील नियोजन व अंमलबजावणी अधिक कार्यक्षम बनवावी. राज्यातील तज्ज्ञअधिकारी आणि स्थानिक घटक यांच्या सहभागातून तयार केलेले व्हिजन डॉक्युमेंट मत्स्यव्यवसाय विकासासाठी उपयुक्त असून त्याची अंमलबजावणी गतीने करावी. मत्स्यव्यवसाय वाढीसाठी आर्थिक तरतूद वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विविध योजनाप्रकल्प व पायाभूत सुविधा उभारणीबाबत सूचना मांडल्या.

यावेळी राज्यातील विविध क्षेत्रात असलेल्या विकासाच्या संधी तसेच एक ट्रिलियन अर्थ व्यवस्थेसाठी करावयाच्या उपाययोजना आणि धोरणात्मक सुधारणा याविषयीही चर्चा करण्यात आली.

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

 मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी बैठक

 

मुंबईदि १५ : मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धनसह कृषी आणि बांधकाम क्षेत्रात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कार्यक्रम राबवावा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वर्षा निवासस्थानी राज्यातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. राज्यातील मत्स्य व्यवसायत्याचा विकासआर्थिक तरतुदीतसेच दीर्घमध्यम आणि लघुकालीन उद्दिष्टांची आखणी याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेमत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे‘मैत्री’ संस्थेचे प्रवीण परदेशीसंबंधित विभागाचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिवसचिवआयुक्त यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाने ०४ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ लागू केले

 राज्य शासनाने ०४ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम२०२५ लागू केले आहे. मोटार वाहन अधिनियम, राज्य परिवहन प्राधिकरण यांची २७७ वी बैठक अपर मुख्य सचिवगृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्षराज्य परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट २०२५ रोजी झाली होती.

राज्य परिवहन प्राधिकरणाने या बैठकीत मे. उबेर इंडिया सिस्टीम प्रा.लिमे. रोपेन ट्रान्सपोर्टशन सव्हिसेस प्रा.लिमे. ॲनी टेक्नोलॉजीसेस प्रा.लि यांना ३० दिवसाकरीता "मुंबई महानगर क्षेत्राकरीता" Provisional Licence जारी करण्यास मान्यता दिली. त्याचप्रमाणे अर्जदाराकडून ३० दिवसाच्या आत सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर पक्का परवाना प्रदान करण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य परिवहन प्राधिकरणासमोर सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिलेअसे अपर परिवहन आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

परिवहन प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक "महाराष्ट्र बाईक - टॅक्सी नियम, २०२५" अंतर्गत सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकीचे भाडेदर जाहीर

 परिवहन प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार

इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक

"महाराष्ट्र बाईक - टॅक्सी नियम२०२५" अंतर्गत सेवा देणाऱ्या

इलेक्ट्रिक दुचाकीचे भाडेदर जाहीर

 

मुंबईदि. १५ : परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांना आता यापुढे राज्य परिवहन प्राधिकरणाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत निश्चित केलेल्या भाड्याप्रमाणे भाडे आकारणी करणे बंधनकारक असणार आहे.

"महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम२०२५" अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर राज्यात प्रथमतः करण्यात येत आहेत. राज्यात सदर भाडेदरामध्ये एकसूत्रतासमानता असावी यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने बैठकीत "महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम२०२५" अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर प्रति कि.मी. १०.२७ रुपयेप्रमाणे आकारणी करण्यास मान्यता दिली. ॲग्रीगेटर बाईक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ कि.मी. असल्यामुळे पहिल्या टप्याचे भाडे १५ रुपये असेल व त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटर दराप्रमाणे आकारणी करण्यात येईल.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारताचा निर्धार पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाद्वारे विविध

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारताचा निर्धार पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतातील पहिली संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अकादमी महाराष्ट्रात सुरु करण्यात आली असूनयाद्वारे हजारो तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळत आहे. स्वच्छता आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे हे आपण जाणतोचपण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी गरज आहे ती जनजागृतीची आणि कुशल मनुष्यबळाची. या दोन्ही गोष्टींसाठी महाराष्ट्राचा कौशल्य विकास विभाग तत्परतेने पुढाकार घेत राहील, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात स्वच्छता अभियानाची सुरुवात आयटीआय चे हजारो विद्यार्थी राज्यातील ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त

राज्यात स्वच्छता अभियानाची सुरुवात

आयटीआय चे हजारो विद्यार्थी राज्यातील ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार

 

मुंबईदि. १५ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्यावतीने "स्वच्छता अभियान" राबविण्यात येणार आहे. कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येणार असूनतब्बल ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार१७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे. या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असूनउद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

या अभियानाबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "विकसित भारताचा संकल्प साकार करण्यातील एक महत्वाचा टप्पा स्वच्छ भारत अभियान हा आहे. भारत स्वच्छ करण्याचा निर्धार पंतप्रधानांनी केला असूनत्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत हा उपक्रम सुरु करत आहोत. स्वच्छताआरोग्य या विषयांबाबत आजही जागृतीची गरज आहे आणि ती गरज या अभियानाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहे

Featured post

Lakshvedhi