परिवहन प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची भाडे आकारणी बंधनकारक
"महाराष्ट्र बाईक - टॅक्सी नियम, २०२५" अंतर्गत सेवा देणाऱ्या
इलेक्ट्रिक दुचाकीचे भाडेदर जाहीर
मुंबई, दि. १५ : परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांना आता यापुढे राज्य परिवहन प्राधिकरणाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत निश्चित केलेल्या भाड्याप्रमाणे भाडे आकारणी करणे बंधनकारक असणार आहे.
"महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५" अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर राज्यात प्रथमतः करण्यात येत आहेत. राज्यात सदर भाडेदरामध्ये एकसूत्रता, समानता असावी यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने बैठकीत "महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५" अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर प्रति कि.मी. १०.२७ रुपयेप्रमाणे आकारणी करण्यास मान्यता दिली. ॲग्रीगेटर बाईक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ कि.मी. असल्यामुळे पहिल्या टप्याचे भाडे १५ रुपये असेल व त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटर दराप्रमाणे आकारणी करण्यात येईल.
No comments:
Post a Comment