Tuesday, 16 September 2025

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात स्वच्छता अभियानाची सुरुवात आयटीआय चे हजारो विद्यार्थी राज्यातील ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त

राज्यात स्वच्छता अभियानाची सुरुवात

आयटीआय चे हजारो विद्यार्थी राज्यातील ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार

 

मुंबईदि. १५ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्यावतीने "स्वच्छता अभियान" राबविण्यात येणार आहे. कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येणार असूनतब्बल ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार१७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे. या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असूनउद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

या अभियानाबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "विकसित भारताचा संकल्प साकार करण्यातील एक महत्वाचा टप्पा स्वच्छ भारत अभियान हा आहे. भारत स्वच्छ करण्याचा निर्धार पंतप्रधानांनी केला असूनत्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत हा उपक्रम सुरु करत आहोत. स्वच्छताआरोग्य या विषयांबाबत आजही जागृतीची गरज आहे आणि ती गरज या अभियानाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi