Thursday, 11 September 2025

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि 11 –अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी व आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबविण्यात येत आहे. या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळांनी मुंबई बँकेशी करार करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मुंबई बँकेने सुरू केलेल्या विशेष कर्ज योजनाअंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. या बैठकीस बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरआमदार चित्रा वाघअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलविभागाचे सहसचिव वि. रा.ठाकूरवित्त विभागाचे सहसचिव स्मिता निवतकरसहसचिव मु. प्र. साबळेवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवारमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे आदि अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमुंबई बँकेला व्याज परतावा योजनांसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याने यांना अपात्र ठरवता येणार नाही. यासंदर्भात्‍ विशेष सूचना जारी करण्यात याव्यात. या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास सहकार्य लाभणार आहे.

मुंबई बँकेच्या या उपक्रमांतर्गत महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. यामध्ये 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात.  ₹१०,००० ते ₹१,००,००० पर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले. मुंबई बँकेची मुंबईत एकूण १६.०७ लाख बचत खाती आहेत. त्यापैकी "माझी लाडकी बहीण योजना" अंतर्गत ५३,३५७ महिलांची शून्य शिल्लक खाती उघडली. पात्र महिलांना शासनाकडून दरमहा ₹१५०० थेट खात्यात जमा होत आहेत.

राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणा तातडीने अमलात आ

 राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणा तातडीने अमलात आणाव्यात

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र इनोव्हेशन सिटीच्या पायाभरणीसाठी कार्यवाहीचे निर्देश

 

मुंबईदि. १० : राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करावीतसेच स्टार्टअप्सच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी कायम राखली पाहिजे. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीने कार्यवाही करून पायाभरणी लवकरच करण्यात यावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढाअपर मुख्य सचिव मनीषा वर्मामुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेरतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकरसचिव डॉ.श्रीकर परदेशीआयुक्त लहूराज माळीज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकरमित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशीमाहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटियानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ताउच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. बी. वेणुगोपाल रेड्डीसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री द

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची बैठक तज्ञ समितीची दर तीन महिन्यांनी बैठक सीमा भागातील नागरिकांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे नियोजन

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची बैठक

तज्ञ समितीची दर तीन महिन्यांनी बैठक

सीमा भागातील नागरिकांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीचे नियोजन

 

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची बैठक मंत्रालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीचे  अध्यक्ष  धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील सह-अध्यक्ष धनंजय महाडिकसदस्य दिनेश ओउळकरअॅड महेश बिर्जेअॅड. शिवाजीराव जाधवअॅड. संतोष काकडे तसेच अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या.

बैठकीत सीमा प्रश्नासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेले. तज्ञ समितीने घेतलेले निर्णय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती म्हणजेच हाय पावर कमिटीसमोर मांडण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. याशिवाय तज्ञ समितीची बैठक दर तीन महिन्यांनी नियमित घेण्याचेही ठरले.

सीमा भागातील नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असूनमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या समस्या सोडवण्यासाठी विनंती करण्यात येईलअसेही बैठकीत ठरले.

बैठकीत सीमा भागातील मुलांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर तसेच उच्च व तंत्र शिक्षण महाविद्यालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आवाहन

 3629

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर

  • राखीव उमेदवारांनी १५ सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आवाहन

 

मुंबईदि. १० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयबीपीएस या संस्थेमार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल राखीव ठेवलेल्या ३१८७ उमेदवारांनी आपली माहिती १५ सप्टेंबर पर्यंत www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंकमध्ये देण्यात यावी. त्यानंतर माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाहीयाची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दिनांक २७ मे २०२५ ते ३० मे २०२५ आणि दिनांक ०२ जून २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण २,२८,८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेस एकूण २,११,३०८ प्रविष्ट झाले होते.

या परीक्षेचा निकाल दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६,३२० प्रविष्ट (Appear) वि‌द्यार्थी/उमे‌दवारांपैकी २७८९ वि‌द्यार्थी/ उमेदवारांचा निकाल दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. तद्नंतर दि. ०३ सप्टेंबर २०२५ रोजी ३४४ विद्यार्थी/ उमेदवारांचा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे.

राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६३२० प्रविष्ट (Appear) वि‌द्यार्थी/ उमेदवारांपैकी एकूण ३१८७ प्रविष्ट (Appear) वि‌द्यार्थी/ उमेदवारांनी २ मे २०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिलेल्या संकेतस्थळावरील लिंक‌द्वारे अ‌द्यापही माहिती न भरल्याने अशा ३१८७ विद्यार्थी/ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे.

यास्तव या उमेदवारांनी दि. १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंक मध्ये माहिती व अंतिम वर्षास प्रविष्ट उत्तीर्ण असल्याबाबतचा निकाल देण्यात यावा. दि १५ सप्टेंबर २०२५ नंतर माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थी/ उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाहीयाची सर्व विद्यार्थी/ उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावीअसे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

सागरी महामंडळाच्या प्रकल्पांना परवानग्यांसाठी विविध विभागांशी समन्वय साधावा

 सागरी महामंडळाच्या प्रकल्पांना परवानग्यांसाठी

विविध विभागांशी समन्वय साधावा

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. १० : महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध प्रकल्पासाठी पर्यावरणवने यासह विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या विविध विषयांचा आढावा मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात घेतला.

 मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले कीसागरी महामंडळाच्या जागेवरील स्टॉलसाठीचे भाडे तातडीने निश्चित करण्याची कार्यवाही करावी. होर्डिंग्ज उभारण्याच्या कामांना गती द्यावी. नोव्हेंबरपर्यंत सर्व नियोजित होर्डिंग्ज उभारण्यात यावीत. या सर्व प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवान्यांसाठी पर्यावरण विभागाशी समन्वय ठेवावा, असे निर्देशही श्री. राणे यांनी दिले.

प्रयोगशाळेमुळे मोठे उद्योग आकर्षित होतील –

 प्रयोगशाळेमुळे मोठे उद्योग आकर्षित होतील – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

अन्ननागरी पुरवठा मंत्री मंत्री श्री.भुजबळ म्हणालेप्रादेशिक तपासणी प्रयोगशाळा विद्युत सुरक्षा आणि संशोधन तसेच उद्योगाला चालना देणारे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. विद्युत क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या पश्चिम क्षेत्रात कार्यरत आहेतत्यांच्यासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरेल. परदेशातील उन्नत प्रयोगशाळांमधील सुविधा या प्रयोगशाळेत आहेत. सोबत नाशिकमध्ये कुशल मनुष्यबळ आणि दळणवळण सुविधा असल्याने विद्युत क्षेत्रातील मोठे उद्योग इथे आकर्षित होतील आणि नाशिकच्या विकासाला गती मिळेल. परदेशात विद्युत उपकरणे निर्यात करण्यासाठी त्यांचे नमुने परिक्षणासाठी इतर राज्यात पाठवावे लागत होते. नाशिक हे इलेक्ट्रिकल हब बनवायचे आहे. कृषी प्रक्रीया करणारे आणि प्रदूषणमुक्त उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसोबत नाशिकच्या वैभवात भर पडेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

प्रास्ताविकात महासंचालक श्री.सिंग यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ही प्रयोगशाळा विद्युत उपकरणांच्या उच्च गुणवत्तेसाठी विश्वसनीय आणि वेळेत सेवा प्रदान करेलअशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीसकेंद्रीय ऊर्जा मंत्री श्री. खट्टर यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळेची पाहणी करीत प्रयोगशाळेची माहिती घेतली.

कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदेराहुल आहेरराहुल ढिकलेसरोज आहेरविभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडामपोलिस आयुक्त संदीप कर्णिकविशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मामनपा आयुक्त मनीषा खत्रीजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवारजिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलसीपीआरआयचे सहसंचालक के.सुर्यनारायण आदी उपस्थित होते.

पश्चिम भारतातील उद्योजकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरटीएल उपयुक्त

 पश्चिम भारतातील उद्योजकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आरटीएल उपयुक्त

- केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर

ऊर्जा क्षेत्राचे प्राण असलेली ही प्रयोगशाळा असल्याचे नमूद करून केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री. खट्टर म्हणालेघरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीची विद्युत उपकरणे सूक्ष्म तपासणीनंतर उपयोगात येतात. गुणवत्ता तपासणीच्या आधारे ऊर्जा क्षेत्रातील प्रत्येक उपकरण तयार केले जाते. अशा तपासणीसाठी आरटीएल महत्वाची असून ती पश्चिम भारतातील उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही अत्याधुनिक प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा विज्ञान आणि अभियांत्रिकीचे उत्कृष्ट प्रतीक आहे.

महाराष्ट्रात प्री-पेड स्मार्ट मीटरचा उपयोग सुरू झाल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करून ते म्हणालेस्मार्ट मीटरच्या उपयोग करणाऱ्यांसाठी वीज देयकात १० टक्के सूट देण्याचा राज्य शासनाचा निर्णयही स्तुत्य आणि इतर राज्यांना मार्गदर्शक आहे. ट्रान्सफॉर्मरएनर्जी मीटरस्मार्ट मीटरट्रान्सफॉर्मर ऑइल आणि इतर वीज उपकरणांचे उत्पादक येथे देण्यात येणाऱ्या प्रगत चाचणी आणि प्रमाणन सेवांचा लाभ घेऊ शकतील. भारत आणि दुबईमधील विद्युत वाहिन्या समुद्राखालून जात असल्याने त्यासाठीच्या वाहिन्यांचे परिक्षण आणि अणुऊर्जासाठीच्या वाहिन्यांचे परिक्षण महत्वाचे आहे. उद्योग विश्वाला विश्वास वाटेल असे परिक्षण येथे होईलअसा विश्वास श्री.खट्टर यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi