राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणा तातडीने अमलात आणाव्यात
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र इनोव्हेशन सिटीच्या पायाभरणीसाठी कार्यवाहीचे निर्देश
मुंबई, दि. १० : राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच स्टार्टअप्सच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी. इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी कायम राखली पाहिजे. महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीने कार्यवाही करून पायाभरणी लवकरच करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अपुर्वा पालकर, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, आयुक्त लहूराज माळी, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. बी. वेणुगोपाल रेड्डी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री द
No comments:
Post a Comment