प्रयोगशाळेमुळे मोठे उद्योग आकर्षित होतील – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
अन्न, नागरी पुरवठा मंत्री मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळा विद्युत सुरक्षा आणि संशोधन तसेच उद्योगाला चालना देणारे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. विद्युत क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या पश्चिम क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी ही प्रयोगशाळा उपयुक्त ठरेल. परदेशातील उन्नत प्रयोगशाळांमधील सुविधा या प्रयोगशाळेत आहेत. सोबत नाशिकमध्ये कुशल मनुष्यबळ आणि दळणवळण सुविधा असल्याने विद्युत क्षेत्रातील मोठे उद्योग इथे आकर्षित होतील आणि नाशिकच्या विकासाला गती मिळेल. परदेशात विद्युत उपकरणे निर्यात करण्यासाठी त्यांचे नमुने परिक्षणासाठी इतर राज्यात पाठवावे लागत होते. नाशिक हे इलेक्ट्रिकल हब बनवायचे आहे. कृषी प्रक्रीया करणारे आणि प्रदूषणमुक्त उत्पादन करणाऱ्या उद्योगसंस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीसोबत नाशिकच्या वैभवात भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात महासंचालक श्री.सिंग यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ही प्रयोगशाळा विद्युत उपकरणांच्या उच्च गुणवत्तेसाठी विश्वसनीय आणि वेळेत सेवा प्रदान करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री. खट्टर यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळेची पाहणी करीत प्रयोगशाळेची माहिती घेतली.
कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे, राहुल आहेर, राहुल ढिकले, सरोज आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सीपीआरआयचे सहसंचालक के.सुर्यनारायण आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment