Monday, 8 September 2025

केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल

 केंद्र सरकारच्या जीएसटीबाबतच्या ऐतिहासिक निर्णयामुळे

सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुलभ होईल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

 

            मुंबई दि. ५ :- केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल आनंद व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

         उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीजीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार जीएसटी स्लॅब १२ टक्के आणि २८ टक्के रद्द करून केवळ ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्याचा निर्णय तसेच दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. नवरात्रीपासून हे नवे दर लागू होतील. त्यामुळे सणासुदीच्या काळात जनतेला दिलासा मिळेल. सामान्य नागरिकशेतकरीमध्यमवर्गीय आणि लघुमध्यम उद्योजकांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे. या सुधारणांमुळे व्यापार सुलभ होईलबाजारपेठेतील मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फायदा होईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.


पुरस्कार व्यावसायिक कौशल्य आणि शिक्षणाद्वारे सक्षम

 श्रीअनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानागपूर)

 

नवीन पिढीला व्यावसायिक कौशल्य आणि शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय प्रयत्न केलेत्यांनी नागपूरच्या वर्किंग कार्यशाळांपासून आपली यात्रा सुरू केलीजिथे त्यांनी 700 हून अधिक शिक्षण सत्रांचे आयोजन केले आणि 14 पेक्षा जास्त पात्रता (क्वालिफिकेशन्स


पुरस्कार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी

 पुरुषोत्तम पवार (एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंगबारामती)

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी जागरूकता आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी प्रापवार यांनी विशेष प्रयत्न केलेत्यांनी उद्योजकतेला प्रोत्साहन देत स्थानिक समुदायालाही शिक्षणाशी जोडले.

 

पुरस्कारआयसीटीचा वापर शिक्षणात प्रोत्साहित केला.

 सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबई)

मुख्याध्यापिका सोनिया कपूर यांनी कमी खर्चातील शिक्षण साहित्याची निर्मिती करून सहकारी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. ‘टीच टू एनरिच या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या कपूर यांनी समूह आधारित शिक्षण आणि आयसीटीचा वापर शिक्षणात प्रोत्साहित केलागेल्या 23 वर्षांत विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्ये आणि मूल्ये दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.

डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर)

 डॉसंदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्सलातूर) महाराष्ट्र पुरस्कार विजेती 

संगीत विषयाचे प्राध्यापक असलेले डॉजगदाळे हे लातूरमधील पहिले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते ठरलेतबलावादक आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदाळे यांनी गोंड आदिवासी वस्त्यांवर शिक्षण पोहोचवलेएचआयव्ही बाधित व अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.

अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील संगीत पुस्तक तयार करणे हे त्यांचे विशेष योगदान आहेकोविड काळात दूरदर्शनरेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे त्यांनी लोकगीते व पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केलीत्यांच्या लिखाणातील 13 संगीतग्रंथ परदेशातही प्रसिद्ध झाले आहेत.

सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबई)

 सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबई) पुरस्कार्थ 

मुख्याध्यापिका सोनिया कपूर यांनी कमी खर्चातील शिक्षण साहित्याची निर्मिती करून सहकारी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. ‘टीच टू एनरिच या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या कपूर यांनी समूह आधारित शिक्षण आणि आयसीटीचा वापर शिक्षणात प्रोत्साहित केलागेल्या 23 वर्षांत विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्ये आणि मूल्ये दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक डॉ. शेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड)

 महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक

डॉशेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूलअर्धापूरनांदेड)

 

28 वर्षांपासून विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉशेख यांनी ग्रामीण भागातील अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. ‘सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी या उपक्रमातून त्यांनी गावापासून दूर भाड्याच्या जागेत शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलीघरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप सुरू केलेबालभारतीच्या सहावी ते बारावीच्या पुस्तकांसाठी लेखन केले असून त्यांना यापूर्वी राज्य पुरस्कारही मिळाला आहे.

Featured post

Lakshvedhi