डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर) महाराष्ट्र पुरस्कार विजेती
संगीत विषयाचे प्राध्यापक असलेले डॉ. जगदाळे हे लातूरमधील पहिले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते ठरले. तबलावादक आणि गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदाळे यांनी गोंड आदिवासी वस्त्यांवर शिक्षण पोहोचवले, एचआयव्ही बाधित व अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील संगीत पुस्तक तयार करणे हे त्यांचे विशेष योगदान आहे. कोविड काळात दूरदर्शन, रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे त्यांनी लोकगीते व पोवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांच्या लिखाणातील 13 संगीतग्रंथ परदेशातही प्रसिद्ध झाले आहेत.
No comments:
Post a Comment