महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक
डॉ. शेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड)
28 वर्षांपासून विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शेख यांनी ग्रामीण भागातील अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. ‘सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी’ या उपक्रमातून त्यांनी गावापासून दूर भाड्याच्या जागेत शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. घरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप सुरू केले. बालभारतीच्या सहावी ते बारावीच्या पुस्तकांसाठी लेखन केले असून त्यांना यापूर्वी राज्य पुरस्कारही मिळाला आहे.
No comments:
Post a Comment