Friday, 5 September 2025

. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

 न्या. चंद्रशेखर यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

 

मुंबई, दि. ५ : मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती न्या. श्री चंद्रशेखर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली.

शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. चंद्रशेखर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.  

शपथविधी सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाराजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावललोकायुक्त न्या. (नि.) विद्यासागर कानडे तसेच राजस्थानझारखंडदिल्लीअलाहाबादकर्नाटक व मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश व सेवानिवृत्त न्यायाधीश उपस्थित होते.

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी न्या. चंद्रशेखर यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दिलखुलास' कार्यक्रमात संचालक डॉ.तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत

 दिलखुलासकार्यक्रमात संचालक डॉ.तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात पुरातत्व व वस्तुसंग्रहालय व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. ८मंगळवार दि. ९बुधवार दि. १०गुरुवार दि. ११ आणि शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच "News on AIR" या मोबाईल अॅपवर प्रसारित होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            ऐतिहासिक स्मारकेस्थळे आणि कलाकृतींचा शोधअभ्यास आणि दस्तावेजीकरण करणेतसेच त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी 'राज्य संरक्षित स्मारकेम्हणून मान्यता देणेआदी महत्वाच्या कामांसाठी सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय कार्यरत आहे. आपल्या वारसास्थळांचे जतनसंवर्धन आणि संरक्षण करणेऐतिहासिक स्थळांचा उज्ज्वल इतिहास प्रकाशात आणणे आदी महत्वाची कामे संचालनालयामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये नुकतेच महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. तसेच आग्रा येथील स्मारक उभारणीजेएनयूतील अभ्यासकेंद्ररघुजी भोसले यांचा इतिहास, ‘राजगड’ नामकरणाची पार्श्वभूमीवाघनखे महाराष्ट्रात आणणे इत्यादी महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत. याविषयी संचालक डॉ. गर्गे यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली आहे.

 

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक

 महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते शिक्षक

डॉशेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूलअर्धापूरनांदेड)

 

28 वर्षांपासून विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉशेख यांनी ग्रामीण भागातील अल्पसंख्याक मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. ‘सुरक्षित शिक्षण तुमच्या दारी या उपक्रमातून त्यांनी गावापासून दूर भाड्याच्या जागेत शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलीघरोघरी जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड वाटप सुरू केलेबालभारतीच्या सहावी ते बारावीच्या पुस्तकांसाठी लेखन केले असून त्यांना यापूर्वी राज्य पुरस्कारही मिळाला आहे.

सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबई)

मुख्याध्यापिका सोनिया कपूर यांनी कमी खर्चातील शिक्षण साहित्याची निर्मिती करून सहकारी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. ‘टीच टू एनरिच या पुस्तकाच्या लेखिका असलेल्या कपूर यांनी समूह आधारित शिक्षण आणि आयसीटीचा वापर शिक्षणात प्रोत्साहित केलागेल्या 23 वर्षांत विद्यार्थ्यांच्या जीवनकौशल्ये आणि मूल्ये दृढ करण्यावर त्यांनी भर दिला.

महाराष्ट्रातील सहा शिक्षक 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025' ने सन्मानित शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल -

 महाराष्ट्रातील सहा शिक्षक 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025' ने सन्मानित

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

 

नवी दिल्ली, 5 : शिक्षकांचे समाजातील स्थान सर्वोच्च असून शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतातत्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे. राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 च्या अंमलबजावणीत शिक्षणाला आनंददायी बनवण्यावर भर देत बालिका शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. भारताला कौशल्याची राजधानी आणि सुपर पॉवर बनवण्यात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार  प्रदान करून सन्मानित करण्यात आलेयामध्ये शालेय शिक्षण क्षेत्रातील डॉशेख मोहम्मद वक़िउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूलअर्धापूरनांदेड), सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. 2, मुंबईआणि उच्च शिक्षण क्षेत्रातील डॉसंदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्सलातूर), डॉनीलाक्षी जैन (शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालयमुंबई), प्रापुरुषोत्तम पवार (एस व्ही पी एम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनीअरिंगबारामती), आणि कौशल्य विकास क्षेत्रातील श्रीअनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानागपूरयांचा समावेश आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे आयोजित या सोहळ्यात 45 शालेय शिक्षक, 21 उच्च शिक्षण आणि 16 कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आलायावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानशिक्षण राज्यमंत्री डॉसुकांत मजूमदारजयंत चौधरीशिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमारकौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे (MSDE) सचिव  देबाश्री मुखर्जी यावेळी उपस्थित होते.

या पुरस्काराचा उद्देश शिक्षकांचे समर्पणनाविन्यपूर्ण कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करणे हा आहेमागील काही वर्षांपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातील शिक्षकांनाही संधी देण्यात येत आहे.

 

अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार; बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात

 अतिवृष्टीने बाधित शेतक-यांना तातडीने मदत देणार;

बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

        मुंबईदि. ५ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहेअसे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

            अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.राज्यात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६११८७२.५ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. यामध्ये दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. 

          सर्वाधिक बाधित जिल्हे : नांदेड – ,२०,५६६ हेक्टर,वाशीम – ,६४,५५७ हेक्टरयवतमाळ - १,६४,९३२ हेक्टरधाराशिव - १५०,७५३,बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर,अकोला - ४३,८२८ हेक्टर,सोलापूर - ४७,२६६ हेक्टर,हिंगोली - ४०,००० हेक्टर क्षेत्रामध्ये बाधित पिके सोयाबीनमकाकापूसउडीदतूरमूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपालाफळपिकेबाजरीऊसकांदाज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.एकूण बाधित जिल्हे नांदेडवाशीमयवतमाळबुलढाणाअकोलासोलापूरहिंगोलीधाराशिवपरभणी,अमरावतीजळगाववर्धासांगलीअहिल्यानगरछ. संभाजीनगरजालनाबीडलातूरधुळेजळगावरत्नागिरीचंद्रपूरसातारानाशिककोल्हापूरसिंधुदुर्गगडचिरोलीरायगड व नागपूर.

****

बालकांचे पाचव्या वर्षी व पुन्हा पंधराव्या वर्षी आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने

 बालकांचे पाचव्या वर्षी व पुन्हा पंधराव्या वर्षी आधार बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असल्याने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. तसेच सर्व शाळांनाही आवाहन करण्यात आले आहे. याकरिता प्राधिकरण व शिक्षण मंत्रालयाने संयुक्त उपक्रम राबवत युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ (UDISE+) या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार बायोमेट्रिक अपडेटची स्थिती उपलब्ध करून दिली आहे. या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची आधार प्रमाणित माहिती यापुढे बंधनकारक असून त्याचा उपयोग विविध योजना व विद्यार्थी लाभांशी जोडण्यात येणार आहे. तसेच NEET, JEE, CUFT यासारख्या स्पर्धा व विद्यापीठ परीक्षांमध्ये नोंदणी करताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना अडचणी येऊ नयेत याकरिता वेळेत बायोमेट्रिक अपडेट करणे महत्त्वाचे असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

आधार अद्ययावत करणे ही प्रक्रिया शाळांमधून शिबिरांच्या माध्यमातून अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते. या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय शिक्षण आयुक्तांना आधार प्राधिकरणाच्या मदतीने राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात शिबिरे आयोजित करण्यात यावीत आणि आधारची नोंदणी व आधार अद्ययावत करणे याबाबत सर्व संबंधितांना आवाहन करण्यात यावे असे कळविले आहे. यामुळे राज्यातील उर्वरित विद्यार्थ्यांची आधारशी संबंधित माहिती संलग्नित करण्यासाठीविद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या माहितीमधील विसंगतीत्यामधील त्रुटी/ तफावत दूर करून आधार क्रमांक वैध करण्यासाठी व त्याकरिता येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या विशेष मोहिमांमध्ये आधार प्राधिकरणाची नक्कीच मदत होणार आहे.

००००

राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण; उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

 राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण;

उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे

मुंबईदि. : राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.

Featured post

Lakshvedhi