Thursday, 21 August 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल प्रकल्प

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल प्रकल्प

पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून यासाठी अंदाजित २७७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच अस्तित्वातील वाहतुकीस पुरेसा रस्ता उपलब्ध व्हावा म्हणून गणेशखिंड रस्त्याचे पुणे विद्यापीठ ते भारतीय कृषी महाविद्यालय या लांबीमध्ये पुणे मनपा विकास आराखड्यानुसार ४५ मीटर पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आला आहे.  या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध -शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आले. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

 

या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार आहे.

२९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे

 क्रीडा दिनानिमित क्रीडा महोत्सवाचे राज्यभर आयोजन

 

मुंबई, दि. २० : क्रीडा दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवात राज्यभर विविध कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी कार्यप्रणाली तयार करण्यात यावी. त्यासाठीचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली.

पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.  या महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील क्रीडा अधिकारी सहभागी झाले होते.

मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले कीकेंद्र सरकारच्या क्रीडा धोरणाच्या धर्तीवर नवे क्रीडा धोरण तयार करण्यात यावे. तसेच राज्यातील खेळाडूंच्या अपेक्षेप्रमाणे बदल करावे. क्रीडा महोत्सवात जिल्हा तसे तालुकास्तरावर विविध क्रीडा कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करावे. शाळा महाविद्यालय विद्यापीठांना तसेच जिल्ह्यातील क्रीडापटूंना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. केंद्र शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांना अभिवादनफिट इंडिया शपथ आणि ६० मिनिटे संघ खेळ व विरंगुळ्याचे खेळ आयोजित करावे.

३० ऑगस्ट रोजी स्थानिक/आदिवासी खेळइनडोअर स्पोर्ट्सशाळा/महाविद्यालय स्तरावरील क्रीडावादविवादफिटनेस व्याख्यानेक्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे. ३१ ऑगस्ट रोजी Sundays on Cycle या उपक्रमात देशभरातील नागरिकांचा सहभाग करून उपक्रम राबवावा.

या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात दोर  खेचणे (Tug of war), ५० मी. शर्यतरिले रेसमॅरेथॉनचमच्यातील गोळी शर्यतगोणपाट शर्यतयोगक्रिकेटसायकलिंगपिट्ठू सारखे स्थानिक खेळखो-खोकबड्डीव्हॉलीबॉलदोरीवर उड्या मारणेबुद्धिबळऑलिंपिक मूल्य शिक्षण कार्यक्रम  तसेचज्येष्ठ नागरिकांसाठी ३०० मी. स्पीड वॉक१ किमी वॉकयोगश्वसनाचे व्यायामसांध्यांचे व्यायामस्ट्रेचिंग चॅलेंजसायकलिंग या क्रीडा प्रकाराचा सहभाग करावा.

झोपडपट्ट्यांमधील पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करा

 झोपडपट्ट्यांमधील पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप करा

 

जिल्ह्यातील नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करावे. 2011 पूर्वीच्या घरांना नियमित करुन त्यांना सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्टे वाटप करण्यात यावे. याअनुषंगाने नागपूर येथे झालेल्या कामाची माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारातील बाबींवर तातडीने निर्णय घ्यावा तसेच जी प्रकरणे शासनाकडे पाठविणे आवश्यक असेल ते प्रस्ताव शासनाकडे पाठवावेतअसेही मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

समृद्धी महामार्गासाठी जो दर देण्यात आला त्याचा अभ्यास करुन तो दर देणे शक्य

 महसूलमंत्री श्री.बावनकुळे म्हणालेसमृद्धी महामार्गासाठी जो दर देण्यात आला त्याचा अभ्यास करुन तो दर देणे शक्य आहे का ते पाहावेअथवा रेडीरेकनरच्या दरानुसार अधिसूचनेच्या आधीच्या तीन वर्षात खरेदीखताचा जो सर्वाधिक दर असेल तो गृहीत धरुन त्यावर प्रतिवर्षी १० टक्के वाढ करावी. या दोन्ही पर्यायांपैकी जो दर शेतकऱ्यांना मान्य असेल त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा. जालना शहराजवळील ज्या जागांचे बाजारभाव अधिक असतील त्यांना सानुग्रह अनुदान देता येईल का ते तपासून पाहण्याची सूचनाही त्यांनी केली. त्याबरोबरच फळबागा आणि घरांच्या भरपाईचा आराखडा तयार करण्यात यावाअसेही त्यांनी सांगितले.

समृद्धी'च्या धर्तीवर नांदेड-जालना मार्गासाठी मोबदला देण्याच्या पर्यायाचा विचार करावा

 समृद्धी'च्या धर्तीवर नांदेड-जालना मार्गासाठी

मोबदला देण्याच्या पर्यायाचा विचार करावा

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २० : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नांदेड-जालना द्रुतगती मार्गासाठीही जमीन संपादनाचा मोबदला निश्चित करण्याच्या पर्यायाचा विचार केला जावाअसे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

जालना जिल्ह्यातील भूसंपादनाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. तर आमदार सर्वश्री अर्जुन खोतकरनारायण कुचेकैलास गौरंट्याल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीत समृद्धी महामार्गासाठी जमीन मूल्यांकनझाडे व घरांची नुकसान भरपाई आणि झोपड्यांचे नियमितीकरण आदी मुद्यांवर देखील चर्चा करण्यात आली.

250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्वसाधारण वसाहतींना पात्र ठरविण्याची आणि टप्पा-1 अंतर्गत बांधलेले

 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्वसाधारण वसाहतींना पात्र ठरविण्याची आणि टप्पा-1 अंतर्गत बांधलेले 10,000 किलोमीटर रस्तेजे जड वाहतुकीमुळे खराब झाले आहेतत्यांच्या दुरुस्ती व उन्नयनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली.

ग्रामीण रस्ते हे विकासाचा पाया आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने या सूचना अमलात आल्यास महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा कायापालट होईल, असे गोरे यांनी सांगितले. चौहान यांनी या सूचनांवर सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिली.

यासह केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. सोलापूर येथून मुंबई ते पुणे विमान सेवा सुरळीत व्हावीयासंदर्भात चर्चा केली. तसेच 10 ऑक्टोंबर 20 24 राज्य शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्य शासन प्रवाशांना सुविधा देणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांना दिली.

०००

सडक योजना (PMGSY) टप्पा-4 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवेदन सादर

 ग्रामीण रस्ते विकासासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट

या दौऱ्या दरम्यान ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) टप्पा-4 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निवेदन सादर केले. यापूर्वी 17 एप्रिल 2024 रोजीही त्यांनी चौहान यांच्याशी याच विषयावर चर्चा केली होती. या निवेदनात महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडण्यात आल्या. PMGSY टप्पा-3 अंतर्गत महाराष्ट्रासाठी 2,009 रस्त्यांना मंजूरी मिळाली असूनत्यांची एकूण लांबी 6,455 किलोमीटर आहे. टप्पा-4 अंतर्गत सामान्य क्षेत्रातील 500 पेक्षा जास्त आणि दुर्गम क्षेत्रातील 250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना बारमाही रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. सध्याचे पात्रता निकष 2011 च्या जनगणनेवर आधारित असूनगेल्या 12 वर्षांत लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेतागोरे यांनी जल जीवन मिशनप्रमाणे वर्तमान लोकसंख्येवर आधारित निकष लागू करण्याची मागणी केली.

Featured post

Lakshvedhi