सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी करताना या कार्यालयांचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत नसल्याबाबत मंडळांनी प्रशासनाला लेखी दिल्यास, अशा मंडळांच्या कार्यालयांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Saturday, 16 August 2025
गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे हा महोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम ठेवण्यात येतील. हा उत्सव साजरा करताना कायद्याचे योग्य पालन करावे. ईद ए मिलाद सणही गणेशोत्सवा दरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी
'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा
गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठक
मुंबई, दि. 13 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ' ऑपरेशन सिंदूर' वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण
देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई
मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण
• एमएमआरडीएमार्फत 300 कि.मी.हून अधिक प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ घडवणे याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन, मुं.प्र.वि.प्रा. मार्फत मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) मंडाले डेपो येथे विकसित करण्यात आली आहे.
• प्रकल्पाच्या पहिला टप्प्यात प्रगत मेट्रो ड्रायव्हिंग सिम्युलेटर, 12 मॉड्यूल देखभाल सिम्युलेटर, सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण केंद्राचा एकूण बांधकाम, सिम्युलेटर आणि प्रणाली या करिता रुपये 69 कोटी इतका खर्च झाला आहे.
• या केंद्रामुळे प्रशिक्षणाचा दर्जा वाढेल, खर्चाची बचत होईल, तसेचकर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी व देखभाल कौशल्ये इ. विकसित होतील. या केंद्रामुळे पुढील 10 वर्षांत आवश्यकप्रशिक्षणावरीलसुमारे 225 कोटी रुपयांची बचत होईल.
• निवासी सुविधा, डिजिटल-आधारित शिक्षण व जागतिक मानकांची पायाभूत व्यवस्था यामुळे हे केंद्र केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल.
मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत
मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत
• मुंबई महानगर क्षेत्रात (MMR), मुं.म.प्र.वि.प्रा मार्फत एकूण 337 कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वेचे विस्तृत जाळे उभारले जात आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणेकरीता विस्तृत प्रकल्प अहवालांमध्ये (DPR) विविध मेट्रो डेपोच्या ठिकाणी कर्मचारी निवास्थाने बांधणे प्रस्तावित होते.
• त्याप्रमाणे, मेट्रो मार्ग 2-अ च्या चारकोप, मालवणी येथील मेट्रो डेपोच्या जागेमध्ये एकूण चार इमारती कर्मचारी निवास्थानांसाठी व एक इमारत वाहनतळासाठी बांधण्यात येत आहेत. यापैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
• या दोन इमारतींमध्ये एकूण 156 सदनिका असून, इमारत 'अ मध्ये 1 बेडरुम-हॉल- किचन असलेल्या 78 सदनिका असून इमारत 'ब मध्ये 2 बेडरुम-हॉल-किचन असलेल्या 78 सदनिका आहेत. 1 बेडरुम हॉल- किचन असणाऱ्या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 655 स्क्वे. फूट असून 2 बेडरुम-हॉल- किचन चे चटई क्षेत्रफळ 885 स्क्वे. फूट इतके आहे. या दोन इमारतींचा एकूण बांधकाम खर्च 90 कोटी रु. इतका आहे.
कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)
कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)
• कलानगर उड्डाणपुलाचे टप्याटप्याने काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले असून त्याचा धारावी ते वांद्रे वरळी सी लिंक या उन्नतमार्गाचा आर्म डी हा अंतिम भाग वाहतुकीसाठी खुला होत आहे.
• कलानगर उड्डाणपुलाचा धारावीच्या दिशेने येणारा हा उपउड्डाणपूल सायन-बांद्रा लिंक रोडला थेट बांद्रा-वरळी सी लिंकशी जोडला जातो. या 340 मीटर लांबी आणि 8.5 मीटर रुंदीच्या पुलासाठी 20 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.
• उपउड्डाणपूल केवळ एक रस्ता नसून मुंबईच्या पश्चिम भागाला धारावीशी जोडणारा सी-लिंक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबईसारख्या वेगाने धावणाऱ्या शहरात, ही केवळ काही मिनिटांची नव्हे, तर दररोज हजारो तासांची बचत होईल.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...