देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई
मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण
• एमएमआरडीएमार्फत 300 कि.मी.हून अधिक प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ घडवणे याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन, मुं.प्र.वि.प्रा. मार्फत मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) मंडाले डेपो येथे विकसित करण्यात आली आहे.
• प्रकल्पाच्या पहिला टप्प्यात प्रगत मेट्रो ड्रायव्हिंग सिम्युलेटर, 12 मॉड्यूल देखभाल सिम्युलेटर, सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण केंद्राचा एकूण बांधकाम, सिम्युलेटर आणि प्रणाली या करिता रुपये 69 कोटी इतका खर्च झाला आहे.
• या केंद्रामुळे प्रशिक्षणाचा दर्जा वाढेल, खर्चाची बचत होईल, तसेचकर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी व देखभाल कौशल्ये इ. विकसित होतील. या केंद्रामुळे पुढील 10 वर्षांत आवश्यकप्रशिक्षणावरीलसुमारे 225 कोटी रुपयांची बचत होईल.
• निवासी सुविधा, डिजिटल-आधारित शिक्षण व जागतिक मानकांची पायाभूत व्यवस्था यामुळे हे केंद्र केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल.
No comments:
Post a Comment