मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत
• मुंबई महानगर क्षेत्रात (MMR), मुं.म.प्र.वि.प्रा मार्फत एकूण 337 कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वेचे विस्तृत जाळे उभारले जात आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणेकरीता विस्तृत प्रकल्प अहवालांमध्ये (DPR) विविध मेट्रो डेपोच्या ठिकाणी कर्मचारी निवास्थाने बांधणे प्रस्तावित होते.
• त्याप्रमाणे, मेट्रो मार्ग 2-अ च्या चारकोप, मालवणी येथील मेट्रो डेपोच्या जागेमध्ये एकूण चार इमारती कर्मचारी निवास्थानांसाठी व एक इमारत वाहनतळासाठी बांधण्यात येत आहेत. यापैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
• या दोन इमारतींमध्ये एकूण 156 सदनिका असून, इमारत 'अ मध्ये 1 बेडरुम-हॉल- किचन असलेल्या 78 सदनिका असून इमारत 'ब मध्ये 2 बेडरुम-हॉल-किचन असलेल्या 78 सदनिका आहेत. 1 बेडरुम हॉल- किचन असणाऱ्या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 655 स्क्वे. फूट असून 2 बेडरुम-हॉल- किचन चे चटई क्षेत्रफळ 885 स्क्वे. फूट इतके आहे. या दोन इमारतींचा एकूण बांधकाम खर्च 90 कोटी रु. इतका आहे.
No comments:
Post a Comment