Thursday, 27 March 2025

सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळ उभारणीसाठी कार्यवाही करावी

 सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळ 

उभारणीसाठी कार्यवाही करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          आरोग्य सेवेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा

•          नागरिकांना किमान 5 कि.मी च्या आतमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

•          प्राथमिक आरोग्य केंद्रात 13 आरोग्य सेवा उपलब्ध कराव्यात.

 

            मुंबईदि.26 : राज्यातील नागरिकांना किमान 5 कि.मी च्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना व आरोग्य सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात याव्यात यासाठी सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करुन आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अत्याधुनिक दर्जाच्या उभाराव्यात असे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  सार्वजनिक आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरमुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीसार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातील अंतर्गत कामकाजात अधिक समन्वयावर भर द्यावा. ज्या गोष्टी कालबाह्य झाल्या असतील तिथे सुधारणा कराव्यात. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतच जास्तीत जास्त उपचार मिळतील यासाठी प्रयत्न करावेत. तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर 13 आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध कराव्यात. नागरिकांना आरोग्य सेवा सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळाव्यात यासाठी  राज्य शासन प्रयत्न करत आहे. यंत्रणांनी सर्व अभ्यास करून याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसमावेश माहिती तत्काळ सादर करावी. तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढविणेआरोग्य विभागात नवीन सुविधा सुरू करणे. जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांचे आधुनिकीकरण करणे. ग्रामीण भागात आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारण्याबाबत गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.फडणवीस यांनी दिले.

          मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीऔषध पुरवठा व उपकरण व्यवस्थापन सुधारणाआरोग्य सेवेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणेआयुष्मान भारत व राज्य सरकारच्या विमा योजनांतर्गत सरकारी व खासगी रुग्णालयांची संख्या वाढवणे. उपचारांचा खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपाय यावर भर द्यावा लागेल. ग्रामीण व दुर्गम भागातील सुधारणांवर भर देवून आदिवासी व दुर्गम भागांत विशेष आरोग्य केंद्रेमोबाईल हेल्थ युनिट्स आणि टेलीमेडिसिनचा विस्तार करावा. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून आरोग्य सेवा पोहोचवाव्यात. खाजगी रुग्णालयांसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. नागरिकांसाठी आरोग्य शिक्षण आणि जनजागृती मोहीम राबवावी. आरोग्य विभागाच्या डेटा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायकसचिव विरेंद्र सिंह यांनी तामिळनाडू येथील आरोग्य यंत्रणेला भेट देवून आल्यानंतर तेथील अभ्यास दौरा अहवाल.राज्यातील आरोग्य विभागातील सुधारणांच्या संदर्भातील माहिती यांचे सादरीकरण केले.

यावेळी या बैठकीला अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ताअपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरामुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव वैद्यकीय शिक्षण धीरज कुमारप्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशीसार्वजनिक आरोग्य विभागाचे डॉ.सचिव निपुण विनायकसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंहवैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकरराष्ट्रीय आरोग्य मिशनचे आयुक्त अमेगोथु नायक हे उपस्थित होते.

अहिल्यानगरमधील खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या कार्यवाहीस गती देण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

 अहिल्यानगरमधील खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या

कार्यवाहीस गती देण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 26 : अहिल्यानगरमधील खर्डा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरूस्ती करण्याकरिता बगीचासुशोभीकरणसंरक्षण भिंतदरवाजा या बाबींचा नव्याने समावेश करून फेरनिविदा काढण्यात यावी. जलदगतीने काम पूर्ण करण्यासंदर्भातील कामकाजाचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ल्याच्या स्मारकाच्या जतनासंदर्भात विधीमंडळ येथे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी खर्डा किल्ल्याच्या दुरूस्तीसंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा तसेच गाव स्तरावर असलेल्या महावारसा समिती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना स्मारकाची डागडुजी व जतन करताना विचारात घ्याव्यात, असे निर्देश यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

सभापती प्रा.शिंदे म्हणाले कीस्मारकाच्या ठिकाणी किल्ल्याच्या खंदकातील उर्वरीत भिंतबुरूजखोल्या य 

भारतीय संविधान हे शतकानुशतके देशाला मार्ग दाखविणारे

 भारतीय संविधान हे शतकानुशतके देशाला मार्ग दाखविणारे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. 26 : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया भारतीय संविधानाने घातला. संविधानाने भारतीय संस्कृतीचे आणि देशाचे उज्वल भवितव्य सुनिश्चित केले. अब्जावधी भारतीयांच्या स्वप्नांना बळकटी दिली. गेली 75 वर्ष अविरतपणे देशाला मार्ग दाखवण्याचे काम संविधानाने केले आहे आणि पुढे शतकानुशतके करत राहणार आहेअसे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केले.

भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर विधानपरिषदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विचार व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीप्रत्येक जण सन्मानाने आणि न्यायाने जगू शकेल याची खात्री संविधानाने दिली. स्त्री-पुरुषांना समान अधिकार संविधानाने मिळवून दिला. म्हणूनच आज महिला मुख्यमंत्रीराज्यपालन्यायाधीशलोकसभा अध्यक्षपंतप्रधानराष्ट्रपती अशा उच्चपदांवर पोहोचू शकल्या. त्यामुळे संविधान हा केवळ कायदा नाही तर ती लोकशाहीची सनद आहे. भारतरत्नमहामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती प्रत्येक भारतीयांने सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे. भारताचा स्वातंत्र्यलढा महात्मा गांधीलोकमान्य बाळ गंगाधर टिळकस्वातंत्र्यवीर सावरकरभगतसिंगचंद्रशेखर आझाद आणि असंख्य ज्ञातअज्ञात वीरांच्या नेतृत्वाखाली लढला गेला. त्यातून अखेर देश स्वतंत्र झाला आणि पुढे संविधानापर्यंत पोहोचलाअसल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीराज्यशासन जनतेच्या भल्यासाठी काम करताना संविधानाचे सगळे मानदंड पाळत आहे. सुशासनलेक लाडकीलाडकी बहीण सारख्या लोकहिताच्या योजनासारथीबार्टीआर्टीमहाज्योती सारख्या संस्थाशेतकऱ्यांसाठीच्या कृषी सुधारणा योजनासंविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्वाला पुढे नेण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्यशिक्षणशेतीमहिला सक्षमीकरणआणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांत ठोस काम करून संविधानाचे तत्व पाळले जात आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून हे इंजिन वेगाने धावण्यासाठी जी ऊर्जा लागते केवळ आर्थिक नसूनसंविधानाच्या तत्वांतून येते आणि पुढेही येत राहीलअसे मत उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीभारतरत्न डॉ.बाबासाहेबांनी दिलेले संविधान कधीही कालबाह्य होणार नाही. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या अहवालानुसारत्या विद्यापीठातून 200 वर्षांत शिकून गेलेल्या विद्वान विद्यार्थ्यांपैकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभरण्यात आला. त्याखाली द सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणजे ज्ञानाचे प्रतीक डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे लिहिले आहे. अशा ज्ञानसंपन्नमहान विद्वानाने भारतीय संविधान तयार केलेहे आपल्या देशाचे भाग्य आहेअसेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीकलम 370 हटवण्याचा धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला.

उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीसंविधानाचा 75 वर्षांचा हा प्रवास अभिमानास्पद आहे आणि भारताच्या प्राचीन लोकशाही वारशाचा हा उत्सव आहे. याच पवित्र संविधानाच्या प्रकाशात आपण पुढे मार्गक्रमण करत लोकशाही अधिकाधिक बळकट करत राहू हा विश्वास आहे. संविधानाचे पावित्र्य आणि महत्त्व पुढल्या पिढ्यांनाही प्रेरक ठरावे यासाठीच प्रत्येक तालुक्यात संविधान भवन साकारले आहे.

मतदार याद्यांच्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक

 मतदार याद्यांच्या निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक

मुंबई, दि. २६ : मतदार याद्यांचे निरंतर अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक मतदान केंद्राकरिता राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती यासंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत बैठक झाली.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ.गजानन देसाईभारतीय जनता पक्षाचे गोपाळ दळवीशिवसेना पक्षाचे विलास जोशीराष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रवींद्र पवारशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिन परसनाईक तसेच विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राजकीय पक्ष हे निवडणूक प्रक्रियेतील महत्वाचे भागीदार आहेत. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी क्षेत्रिय तसेच राज्यस्तरावर नियमितरित्या बैठका घेऊन निवडणुकीच्या विविध विषयाबाबत समन्वय राखण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील मतदार नोंदणी अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर १७ ते २० मार्च २०२५ या कालावधीत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या स्थानिक प्रतिनिधी समवेत बैठका घेण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.

या वेळी बैठकीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी मतदार याद्यांचे निरंतर अद्ययावतीकरण करण्याची प्रक्रिया आणि प्रत्येक मतदान केंद्राकरिता राजकीय पक्षांकडून मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती यासंदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या सूचना समजून घेतल्या. तसेच याविषयांवावत सविस्तर चर्चा करुन सर्व राजकीय पक्षांच्या सूचनांची नोंद घेऊन त्या अनुषंगाने कायद्यातील तरतूदी विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येईलअसे सांगितले.

0000

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत "झिरो टॉलरन्सm

 महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत "झिरो टॉलरन्स"

राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात ते म्हणालेराज्यातील आमच्या बहिणींना निर्भयपणे समाजात वावरता आले पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत "झिरो टॉलरन्स" ठेवा हे पोलिसांना बजावून सांगितले आहे. माझी लाडकी बहिण सुरक्षित बहीण असली पाहिजे याची दक्षता आम्ही घेऊअशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दोषसिद्धीचा दर दरवर्षी वाढतो आहे. २०१५ मध्ये तो ३३ टक्के होतातर २०२४ मध्ये हा दर ५०.५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तो आता ७५ टक्केपर्यंत जाईल असा विश्वास व्यक्त करीत गुन्हे सिद्ध करण्यामध्ये ‘एआय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरणमी

 पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण

राज्यात मेट्रोअंतर्गत मेट्रोपॉड टॅक्सीरस्तेरेल्वेजलमार्गातून कनेक्टिव्हिटी भक्कम करायची आहे. आमची नाळ ही लोकांशी जोडली गेल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पर्यटन विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबवित असून कृषी पर्यटन धोरणसाहसी पर्यटन धोरणकॅरॅव्हॅन धोरणबीच शॅक धोरण इत्यादी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणार आहोत. राज्यात गड किल्ल्यांत  पर्यटकांना सुविधा देण्यात येणार असून मे महिन्यात महाबळेश्वरमध्ये मोठा पर्यटन महोत्सव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतीच वॉर रूमची बैठक घेतली त्यामध्ये मेट्रोरेल्वेमहामार्गविमानतळबंदरेसिंचनपाणीपुरवठास्वच्छता पर्यटन क्षेत्रातल्या एकूण १९ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला. विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन सुविधांसाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देत आहोत. प्रत्येक विभागाने पहिल्या शंभर दिवसात पुढच्या पाच वर्षात काय कामगिरी करणार आहोत ते दाखवून दिले आहे..

मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत - एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार

 मुंबईतील गृहसंकुल पुनर्विकासासाठी महाप्रीत - एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार

 

   मुंबई,दि. 27 : महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडनवी दिल्ली गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारची नवरत्न कंपनी  यामध्ये विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्याकरिता  मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला.

 

    एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड या कंपनीची मोठे गृहनिर्माण प्रकल्पआयटी इमारतींचे बांधकाम तसेच स्वदेशात आणि परदेशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची संकल्पना व अंमलबजावणी करणे आणि अशा प्रकल्पांना निधी देण्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

     ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्टभिवंडी महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिका या प्रमुख प्रकल्पांमध्ये पीएमएवाय आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची अंमलबजावणी महाप्रित करत आहे. मुंबईत सुमारे 56 एसआरए प्रकल्प महाप्रित राबविणार आहे. एमएमआर आणि विशेषतः मुंबई शहरातील विविध खाजगी सहकारी गृहसंकुल संस्थांनी त्यांच्या परिसराचा पुनर्विकासासाठी महाप्रितसोबत चर्चा केली आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत मुंबई शहरातील गृहसंकुलाची गरज पूर्ण करण्याकरिता महाप्रित आणि एनबीसीसी या कंपन्या सहकार्य करणार आहेत.

 

     महाप्रित ईएसजी अनुपालनस्वच्छ आणि हरित ऊर्जा निकषांचा अवलंबकचरा पुनर्वापरडीकार्बोनाइज्ड साहित्यनवीनतम आणि पर्यावरणपुरक लवचिक बांधकाम तंत्रज्ञानराष्ट्रीय पर्यावरणपूरक मानकेराज्यातील दुर्बल घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रकल्प देखरेखीसाठी आंतरराष्ट्रीय मानके यावर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता  महाप्रित कंपनी अग्रस्थानी आहे. तसेच महाप्रित आणि एनबीसीसी (इंडिया) लिमिटेडची तज्ज्ञता व कौशल्यामुळे होणारे फायदे लक्षात घेतादोन्ही सरकारी संस्थांनी समान हितांच्या प्रकल्पांवर पीएमसी अथवा ईपीसी तत्वावर प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे.

 

  यावेळी महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी म्हणालेएनबीसीसी आणि महाप्रित यांच्यातील सहकार्यामुळे पुनर्विकास कार्य करण्यास मदत होईल व गृहसंकुलांना पुनर्विकास करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच केंद्र सरकारच्या संस्थांना विकासकांची निवड करण्याचे पर्याय उपलब्ध होत असल्यामुळेपुनर्विकासांची कामे राज्य शासनाच्या नियमानुसार करण्यात येईल.

 

    एनबीसीसीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक के. पी. महादेवस्वामी म्हणालेएनबीसीसी (इंडिया) मुंबई आणि महाप्रित यांच्या संयुक्त सहकार्यामुळे मुंबई व मुंबई परिसरातील पुनर्विकासांची प्रकल्प राबविण्यात येतील. तसेच अशाच प्रकारचे प्रकल्प नवी दिल्ली व  इतर राज्यांमध्ये संयुक्तपणे राबविण्यात येतील.

 

  यावेळी महाप्रितचे संचालक पुरुषोत्तम जाधवकार्यकारी संचालक सुभाष नागे,  प्रकल्प संचालक पी. आर.के. मुर्तीकार्यकारी संचालक सुनील पोटे तसेच एनबीसीसी (इंडिया) नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक प्रदिप शर्माकार्यकारी संचालक प्रविण डोईफोडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi