अहिल्यानगरमधील खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या
कार्यवाहीस गती देण्याचे सभापती प्रा.राम शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. 26 : अहिल्यानगरमधील खर्डा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाचे जतन व दुरूस्ती करण्याकरिता बगीचा, सुशोभीकरण, संरक्षण भिंत, दरवाजा या बाबींचा नव्याने समावेश करून फेरनिविदा काढण्यात यावी. जलदगतीने काम पूर्ण करण्यासंदर्भातील कामकाजाचा अहवाल पुढील एक महिन्यात सादर करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ल्याच्या स्मारकाच्या जतनासंदर्भात विधीमंडळ येथे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी खर्डा किल्ल्याच्या दुरूस्तीसंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा तसेच गाव स्तरावर असलेल्या महावारसा समिती तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना स्मारकाची डागडुजी व जतन करताना विचारात घ्याव्यात, असे निर्देश यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
सभापती प्रा.शिंदे म्हणाले की, स्मारकाच्या ठिकाणी किल्ल्याच्या खंदकातील उर्वरीत भिंत, बुरूज, खोल्या य
No comments:
Post a Comment