Thursday, 27 March 2025

विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज

 विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज

 

विधान परिषदेत एकूण ११५ तास ३६ मिनिटांचे कामकाज झाले असून रोजचे सरासरी कामकाज ७ तास १३ मिनिटे झाल्याची माहिती सभापती प्रा.शिंदे यांनी दिली. अधिवेशनात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९१.६७ टक्के तर सरासरी उपस्थिती ८३.६५ टक्के होती.

 

विधान परिषदेत तीन शासकीय विधेयके पुर:स्थापित करण्यात येऊन तीन विधेयके संमत करण्यात आली. तर चार विधानसभा विधेयके पारित करण्यात आली. विधानसभेकडे एकूण पाच धन विधेयके शिफारशी शिवाय परत पाठविण्यात आली.

 

विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात जास्तीत जास्त प्रश्नांना न्याय मिळणे आवश्यक आहेअशी भूमिका सभापती प्रा. शिंदे यांनी मांडली होती. त्यानुसार या अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये पुकारण्यात आलेल्या आजवरच्या प्रश्नांच्या सरासरीपेक्षा जास्त संख्येने प्रश्न चर्चेला घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 

या अधिवेशनात जागतिक महिला दिन’ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त’ मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या विषयावर चर्चा घेण्यात आली.

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

 विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

पुढील अधिवेशन 30 जून रोजी मुंबईत

 

            मुंबईदि. 26 : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. 30 जून 2025 रोजी विधानभवनमुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत प्रत्यक्षात 146 तास कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात 146 तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 7 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.84 टक्के होतीतर एकूण सरासरी उपस्थिती ही 83.55 टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित 9 शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी 9 विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम 293 अन्वये एकूण प्राप्त सूचना 5 असून 5 सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

    या अधिवेशनात "जागतिक महिला दिन" आणि "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या       त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त" मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त "भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल" या विषयावर चर्चा घेण्यात आली.

महाराष्ट्र आता थांबणार नाही,एआय’ तंत्राने शेतीचे उत्पन्न वाढवणार

 महाराष्ट्र आता थांबणार नाही

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधान परिषदेत मांडले महाराष्ट्राचे विकासचित्र

 

मुंबईदि. 26 : महाराष्ट्र संविधानाच्या मार्गावर दमदार वाटचाल करीत असून आता तो थांबणार नाही. महाराष्ट्रात आता विकासाची नवी पहाट उजाडत असल्याचे सांगत राज्याच्या प्रगतीलासमृध्दीला हातभार लावावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केले.

विधान परिषेदत नियम २५९ अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कल्याणकारी योजनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांवर आहे आणि यापुढेही राहिल त्यामुळे महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल कुणी चिंता करण्याची गरज नाहीयावेळी राज्याचे विकासचित्र रेखाटताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेजीडीपीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहेनिर्यातीत महाराष्ट्र पहिला आहे. औद्योगिक उत्पादनात राज्य पहिले आहेजीएसटी संकलनात देखील महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र पहिला आहे.  थेट परकीय गुंतवणुकीमध्ये राज्य पहिलं आहे. स्वच्छतेत पहिला क्रमांक मिळविला आहे. सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प १० लाख कोटींचे महाराष्ट्रात सुरू आहेतअशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

‘एआय’ तंत्राने शेतीचे उत्पन्न वाढवणार

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेपिक विमा योजनाई पीक पाहणीसंदर्भात नुकतीच बैठक घेतली. शेतकऱ्यांसाठी सिंगल विंडो इंटरफेस असलेलं एक ॲप आणि संकेतस्थळ विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेटही घेतली. एआय तंत्रज्ञानाने आपल्याला शेतीचे उत्पन्न दुप्पट - चौपट करायचे आहे. त्यासाठी बिल गेटस आपल्याला मदत करणार आहेत. डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर नेण्याचे उद्दीष्ट आहे. काही दिवसांपूर्वी न्युझीलँडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सेन यांची राजभवनावर भेट झाली. त्यावेळी त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. मुंबईच्या विकासाची गती पाहून ते सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यांनी मुंबईतील पायाभूत सुविधांची माहिती घेतल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लोकशाही ही संविधानातील सर्वात मोठी ठेव,भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा

 लोकशाही ही संविधानातील सर्वात मोठी ठेव

संविधनातील उद्देशिका आपली आहे. आम्ही भारतीय लोक सांगतोम्हणून हे जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. पाश्चिमात्य देशातील हे संविधान नाही. ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आहे. संधीची समानता त्यांनी दिली. जातधर्म यांच्या आधारे संधी दिली जाणार नाही. सर्वांना समान संधी दिली जाईल. लंकेतील सीतेची सुटकादेखील संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. ती यासाठी दाखवलेली आहेकी आम्हाला या संविधानाचा नारी सन्मानासाठी वापर करायचा आहेहे त्यातून अभिप्रेत करण्यात आलेले आहे. गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवला आहे. या तत्त्वावर उभे राहिलेले हे संविधान आहे. या संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहात्मा गांधी नेहमी म्हणायचे रामराज्य आणायचे आहे. राजा जेव्हा भेदभाव करत नाहीत्याला रामराज्य म्हणतात. समाजातील छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांना शक्ती राजा देतो. त्याला रामराज्य म्हणतात. हे पूर्णतः भारतीय मूल्यांवर तयार केलेले संविधान आहे. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतीमान चक्र आहे. काळाच्या बरोबर चालण्याचे धैर्य दाखवले नाहीतर आपण पुढे जाऊ शकत नाही. भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा आहे. संविधानाने मुलभूत हक्क बहाल केले आहेत. कायद्यासमोर समानता आहे. धर्मभेद यावरून भेदभाव करता येणार नाही. सामाजिक समानतासमान संधीकलम १५ मध्ये भेदभाव करता येणार नाहीअसे बाबासाहेबांनी सांगितले आहे. पण एखादा समाज जर मागे राहिला असेल तर शैक्षणिक आरक्षण तरतूदही केली आहे.

संधीची समानता

संविधानाने सर्वांना संधीची समानता दिली आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा समान आहे. कुठल्याही व्यक्तीला जातपंथधर्म या आधारावर संधी मिळणार नाही. प्रत्येकाची प्रतिष्ठा राहीली पाहिजेअसा प्रयत्न डॉ. बाबासाहेबांनी संविधानात केला आहे. संविधानातून राजकीय लोकशाही नकोसामाजिकआर्थिक लोकशाही आली पाहिजेअसे डॉ. बाबासाहेब सांगायचेअसेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भारतीय संविधानाने पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार दिला आहे. भारत एक संघराज्य प्रणाली आहे. हे राज्य सांस्कृतिक एकतेवर अवलंबून आहे. कार्यपालिकान्यायपालिकाविधीपालिका हे तीन स्तंभ भारतीय लोकशाहीचे आहे. तर अदृश्य स्तंभ हा प्रसार माध्यमे आहे. संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली आहे. या तत्वानुसार समान नागरी कायदा करण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यावर दिली आहे. नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप समान नागरी संहिता लागावीयासाठी राज्य प्रयत्नशील राहीलअसेही या तत्वानुसार नमूद केले आहे. पशुजनावरे यांच्या कत्तलीस मनाई करण्याचे तत्वही राज्य धोरण मार्गदर्शक तत्वामध्ये आहे.

प्रत्येक नागरिकाला प्रगतीचे पंख देण्याची क्षमता संविधानात

 प्रत्येक नागरिकाला प्रगतीचे पंख देण्याची क्षमता संविधानात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

संविधानाच्या ७५ वर्षानिमित्त गौरवशाली परंपरेच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांचा सहभाग

लोकशाही ही संविधानाचा सर्वात मोठी ठेव

            मुंबईदि. २६ भारताचे संविधान हे जगात सर्वोत्तम आहे. भारताचे २०४७ मध्ये विकसित देशाचे स्वप्न साकारवयाचे आहे. ही स्वप्नपूर्ती करण्याची क्षमता संविधानात असून देश संविधानाने दिलेल्या मार्गावर चालत आहे. संविधानाने सामाजिकआर्थिकराजकीय क्रांती आणली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेल्या संविधानामुळे रक्त विरहीत क्रांती देशात झाली. या संविधानात प्रत्येक भारतीयाला प्रगतीचे पंख देण्याची क्षमता आहेअसे गोरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काढले. भारतीय संविधानाच्या ७५ वर्ष गौरवशाली परंपरेच्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहभाग घेत मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेशासनाच्यावतीने ४३४ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये संविधान मंदीर स्थापन करण्यात आले आहेत. मूल्यशिक्षणात संविधानाची मुल्ये शिकविण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात संविधान भवन बांधण्यात येणार आहे. उच्च भारतीय मुल्यांचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार केले आहे. भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहेलवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. लंकेतील सीतेची सुटकागीतेचा उपदेश आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान संविधानात आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेतोपर्यंत भारताचे संविधान कुणीही बदलू शकणार नाही. त्यामुळे संविधानाला कोणताही धोका नाहीअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इंग्रजांचे कॅबिनेट मिशन

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांनी त्या काळात भारतात कॅबिनेट मिशन पाठविले. या कॅबिनेट मिशनमध्ये तीन मंत्री होते. या कॅबिनेट मिशनने भारताला स्वतंत्र करण्यासाठी भारताचे स्वत:चे संविधान असायला पाहिलेअसा अहवाल दिला आहे. भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून संविधान सभा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकार 1935 चा कायदा करण्यात आला. संविधान सभेने एकेका कलमावरशब्दावर चर्चा केली आहे. सभेने 165 दिवस 11 तास काम केले. या सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली तर शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. तसेच 26 नोव्हेबर 1949 रोजी संविधान स्वीकारलेतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणले.

संविधान सभेचे कामकाज

जगात सर्वाधिक प्रदीर्घ काळ संविधान निर्मितीचे काम भारतीय संविधान सभेने केले आहे. सभेमध्ये 389 सदस्य होतेत्यापैकी 292 सदस्य प्रोव्हेंशनस असेम्बंली मधून निवडून आले होते. 92 सदस्य हे संस्थानचे होते, 4 जण चिफ कमीशनर कॉन्सीट्युएन्सीमधून निवडून आले होते. संविधान सभेचे पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झालीया अधिवेशनाची सुरूवातही वंदे मातरमने झाली होती. संविधान सभेने मसुदा लेखन समिती तयार केली. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीने अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला. संविधान लागू करताना संविधानात उद्देशिका, 22 भाग, 395 कलमे होती. आता संविधानात 25 भाग, 448 कलमे, 12 परिशिष्ठ आहेत. मसुदावेळी 7 हजार 635 सुधारणा सुचविण्यात आल्या होत्यात्यापैकी 2 हजार 473 सुधारणा स्वीकारण्यात आल्या. संविधानात आतापर्यंत 106 घटना दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 106 वी दुरूस्ती महिलांना संसदेत व विधानसभेत 33 टक्के आरक्षणाची आहे.

१३ कोटी लोकांच्या विकासाचा अर्थसकंल्प

 १३ कोटी लोकांच्या विकासाचा अर्थसकंल्प :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

           

       उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,सर्व कल्याणकारी योजना सुरू ठेवून अर्थव्यवस्था बिघडू न देता अर्थसकंल्प सादर केला.राज्यातील १३ कोटी लोकांच्या विकासाच्या दृष्टीने विचार करून अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिशय चांगला अर्थसंकल्प सादर केला. विकासाचे आणि लोकाभिमुख प्रकल्प शासन राबवित आहे. शेतकरीकष्टकरी कामगार वर्ग  या सर्व घटकांचा विचार राज्य चालवताना करत आहोत.

 

   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कीएकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना पुढे नेताना  सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करित आहोत. परकीय गुंतवणूक वाढविण्यातही राज्य अग्रेसर असूनदाओस येथे झालेल्या परिषदेत १५ लाख कोटीचे करार करण्यात आले. एक खिडकी योजनेअंतर्गत राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. स्टार्ट अपमध्ये राज्य अव्वल असूनआपल्या राज्यावर इतर राज्यांच्या तुलनेत कर्जही कमी आहे. १०० दिवसांच्या कामकाजाचे उद्दिष्ट  मुख्यमंत्री यांनी सर्व विभागांना दिले होतेत्यानुसार सर्व विभागांनी उत्तम काम पार पाडले असूनअनेक विभागांनी उद्दिष्ट पुर्ण केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi