Thursday, 27 March 2025

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

 विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

पुढील अधिवेशन 30 जून रोजी मुंबईत

 

            मुंबईदि. 26 : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. 30 जून 2025 रोजी विधानभवनमुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधान परिषदेत सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत प्रत्यक्षात 146 तास कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात 146 तास कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 7 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.84 टक्के होतीतर एकूण सरासरी उपस्थिती ही 83.55 टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित 9 शासकीय विधेयके मांडण्यात आली त्यापैकी 9 विधेयके संमत झाली. तसेच सभागृहात नियम 293 अन्वये एकूण प्राप्त सूचना 5 असून 5 सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

    या अधिवेशनात "जागतिक महिला दिन" आणि "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या       त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त" मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा झाली. तसेच भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षानिमित्त "भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल" या विषयावर चर्चा घेण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi