Tuesday, 25 March 2025

एनसीईआरटी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आणि सीबीएससी परीक्षा पध्दती स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

 एनसीईआरटी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आणि सीबीएससी परीक्षा पध्दती स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई,दि.२४ राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांची परिक्षा पध्दती स्विकारण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदन केले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणालेराज्यातील सुजाण पालक यांचा सहभागशिक्षकांची  सकारात्मक  भूमिका

या माध्यमातुन नविन शैक्षणिक धोरणाची राज्यात  प्रभावी अंमलबजावणी  करण्यात येत आहे.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) यांच्याआधारे राज्याचे  स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले आहेत. यामध्ये  राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.  महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत बनविताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहेत.

या नवीन  राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी घोकंपट्टीवर आधारीत परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या परीक्षा पध्दतीप्रमाणे सर्वकष प्रकारचे मुल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पध्दतीत आणून आणि त्यातही आवश्यक ते बदल / सुधारणा करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

  तज्ज्ञ समित्यांच्या मदतीने राज्यातील शैक्षणिक पार्श्वभूमी व राज्याच्या गरजा विचारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पायाभूत स्तर अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली.

यासंदर्भातील सर्व मसुदे SCERT च्या संकेतस्थळावर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या व त्यानुसार दोन्ही आराखडा मसुदे अंतिम करण्यात आले व त्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता  मिळाली आहे.

अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती

 तज्ज्ञ समित्यांच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी (बालवाटिका १,,इ. १ ली व २ री) अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली व अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे. नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इ. १ ली पाठ्यपुस्तक निर्मिती कामकाज सुरु आहे. राज्यासाठी इ. १ री ते १० वी साठी अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती SCERTM मार्फत करण्यात येत आहे.

बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी

 बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. २४ : बाळापूर तालुक्यात अनेक परंपरागत वीटभट्ट्या कार्यरत असूनत्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या आहेत. यामध्ये कुंभार समाज प्रमुख असूनते पारंपरिक पद्धतीने वीटभट्टी व्यवसाय करत आहेत. या व्यवसायामध्ये जवळपास ८५ वीटभट्ट्या परंपरागत आहेततर ६४ वीटभट्ट्या खासगी जमिनींवर कार्यरत आहेत. या सर्व वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे उत्तर देत होते.

            शासनाने या वीटभट्ट्यांची तपासणी केली असल्याचे सांगून महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कीयातील काही वीटभट्ट्या सरकारी जमिनींवर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ११ वीटभट्ट्या सरकारी जमिनींवर असूनत्यांच्याकडून भाडे आणि महसूल वसूल करण्यात आले आहे. आतापर्यंत ३० लाख ४८ हजार रुपये महसूल स्वरूपात जमा करण्यात आला आहे. यातील बहुतांश वीटभट्ट्या छोट्या असूनत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि कुंभार समाजातील कुटुंबे यावर अवलंबून असल्याने कारवाई केल्यास ५०-६० कुटुंबांच्या रोजगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात फेरतपासणी करण्याची भूमिका घेतली आहे. यातील अनेक वीटभट्ट्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेण्याची गरज नसतेकारण त्या लहान उद्योगांच्या श्रेणीत येतात. मात्रकाही ठिकाणी पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे कायाची तपासणी करण्यात येणार आहे. जर कोणी नियमबाह्य मार्गाने व्यवसाय करत असेलतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा

 एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त 

कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबई, दि. २४ : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले कीअनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर  कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर  होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्यांसंदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणेनाशिक- पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या बसेसना संगमनेर बसस्थानकामध्ये थांबा देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

****

संध्या गरवारे/विसंअ/

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे

 नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि

एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे

वनमंत्री गणेश नाईक

मुंबईदि. २४ : नागपूर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालय (गोरेवाडा) येथील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाला असल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.        

            सदस्य मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नाईक बोलत होते.

            गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयात विषाणुजन्य आजारामुळे प्राण्याचा मृत्यू होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून वनमंत्री नाईक म्हणाले कीबाधित प्राण्यांचे पिंजरे निर्जंतुक करण्यात आले आहेत. प्रचलित नियमांतील तरतुदीनुसार मृत प्राण्यांचे मृतदेह नष्ट करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अन्य क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कोंबडीच्या मांसाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदे कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री कार्यालयामध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून रुजू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत माहिती घेवून निर्णय 

गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणि मच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण

 गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणि

मच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण

- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबईदि. २४ : गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये वाढ होणे आणि मच्छिमारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी एक सर्वंकष धोरण तयार करण्यात  येत असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

            सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्य व्यवसाय मंत्री राणे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये प्रवीण दरेकरउमा खापरेभाई जगतापप्रसाद लाडएकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

            गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी या क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता आणणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले कीयासाठी एक सर्वंकष धोरण विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच विभागाकडे असलेल्या सर्व तलावांची माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मत्स्योत्पादनात सध्या महाराष्ट्र १७ व्या स्थानावर आहे. राज्य मत्स्योत्पादनामध्ये ३ ऱ्या क्रमांकावर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मासेमारीला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात येणार आहे. तसेच मत्स्योत्पादन वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येईल. याशिवाय तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील तलावांमध्ये अतिक्रमणही झाल्याचे निदर्शनास येत आहे. यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री राणे यांनी दिली.


प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान तात्काल वितरीत करून दोंडाईचा येथील सौर प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे

 प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान तात्काल वितरीत करून


दोंडाईचा येथील सौर प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


· दोंडाईचा सौर प्रकल्पासाठी आवश्यक तेवढ्याच जमिनीचे अधिग्रहण


 


मुंबई, दि. २४ : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे २५० मेगावॅटच्या सौर प्रकल्पासाठी आवश्यक तेवढीच जमीन खरेदी करावी. लवकरात लवकर जमिन अधिग्रहण करुन सानुग्रह अनुदान देवून धुळे येथील दोंडाईचा प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


           विधानभवन येथे धुळे येथील दोंडाईचा प्रकल्पाच्या आढाव्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव पी. अन्बलगन, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.बी.राधाकृष्णन.टाटा पॉवर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेश नंदा उपस्थित होते.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महानिर्मितीने ४७६.७६ हेक्टर खासगी जमिन थेट खरेदी पध्दतीने अधिग्रहित केली असून प्रकल्पग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे. जेवढी जमिन या प्रकल्पासाठी आवश्यक आहे तेवढीच जमिन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घ्यावी. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेवून स्थानिक प्रशासनाने गतीने सानुग्रह अनुदान वितरीत करावे. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १००० एकर जमिनीची आवश्यकता आहे. जर १३५० हेक्टर जमिन प्राप्त झाली तर ९०० एकरवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा उरलेली जमिन एमआयडीसीला देण्यात यावी. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सौर ऊर्जेसाठी पॅनल तसेच इतर यंत्रणा उभारावी. टाटा पॉवर कंपनीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.


धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे सौर ऊर्जा प्रकल्प लवकर पूर्ण करावा तसेच या परिसरात उद्योग उभारण्यासाठी, एमआयडीसाला जागा देण्यात यावी अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे नाविन्यपूर्ण संकल्पनांसह उत्कृष्ट नियोजन करावे

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे

नाविन्यपूर्ण संकल्पनांसह उत्कृष्ट नियोजन करावे

- मुख्य सचिव सुजाता सौनिक

 

मुंबई, दि. २४ : भारतीय संविधानाचे शिल्पकारभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाचे सर्व संबंधित यंत्रणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनासह उत्कृष्ट नियोजन करण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

मंत्रालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या तयारीच्या अनुंषगाने आयोजित आढावा बैठक झाली. यावेळी भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरोनागसेन कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा तसेच दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या, जयंती उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात चैत्यभूमी परिसरात अभिवादन करण्यासाठी अनुयायीनागरिक येत असतात. त्यांच्यासाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हापासून सुरक्षा करणारी मंडप व्यवस्था त्याचसोबत  सर्व सोयी सुविधा उत्तम दर्जाच्या उपलब्ध ठेवण्यात याव्यात.  त्याठिकाणी प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी.त्याचप्रमाणे दादर व सर्व संबंधित परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियंत्रण करुन जागोजागी सूचना फलक लावावेतबेस्ट मार्फत पूरेशा प्रमाणात दादर स्टेशन ते चैत्यभूमी परिसरासाठी बस सेवा उपलब्ध ठेवावी.

या ठिकाणी मोठ्या संख्येन पुस्तकांची खरेदी नागरिकांमार्फत केली जाते. या पार्श्वभूमीवर विविध दर्जेदार प्रकाशक संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी पुस्तक, ग्रंथ, पूरक साहित्याची विक्री प्रदर्शन यांचे स्टॉल लावण्याचे नियोजन करावे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकापोलिसरेल्वेबेस्टमाहिती व जनसंपर्कजिल्हाधिकारीसांस्कृतिक विभागसामाजिक न्यायव इतर सर्व संबंधितांनी आपल्या स्तरावर जयंती उत्सवाचे नियोजन अधिक व्यापक यशस्वीपणे करण्याच्या दृष्टीने आढावा बैठका घेऊन नाविन्यपूर्ण संकल्पनांसह जयंती साजरी करण्यासाठी नियोजन करण्याचेही श्रीमती सौनिक यांनी यावेळी सूचित केले. महानगरपालिकेमार्फत चैत्यभूमी येथे उपलब्ध करुन देण्यात येणा-या सोयीसुविधा व जयंती उत्सवासाठी करण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती यावेळी सादर करण्यात आली.

Featured post

Lakshvedhi