Tuesday, 25 March 2025

बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी

 बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. २४ : बाळापूर तालुक्यात अनेक परंपरागत वीटभट्ट्या कार्यरत असूनत्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या आहेत. यामध्ये कुंभार समाज प्रमुख असूनते पारंपरिक पद्धतीने वीटभट्टी व्यवसाय करत आहेत. या व्यवसायामध्ये जवळपास ८५ वीटभट्ट्या परंपरागत आहेततर ६४ वीटभट्ट्या खासगी जमिनींवर कार्यरत आहेत. या सर्व वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे उत्तर देत होते.

            शासनाने या वीटभट्ट्यांची तपासणी केली असल्याचे सांगून महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कीयातील काही वीटभट्ट्या सरकारी जमिनींवर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ११ वीटभट्ट्या सरकारी जमिनींवर असूनत्यांच्याकडून भाडे आणि महसूल वसूल करण्यात आले आहे. आतापर्यंत ३० लाख ४८ हजार रुपये महसूल स्वरूपात जमा करण्यात आला आहे. यातील बहुतांश वीटभट्ट्या छोट्या असूनत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि कुंभार समाजातील कुटुंबे यावर अवलंबून असल्याने कारवाई केल्यास ५०-६० कुटुंबांच्या रोजगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात फेरतपासणी करण्याची भूमिका घेतली आहे. यातील अनेक वीटभट्ट्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेण्याची गरज नसतेकारण त्या लहान उद्योगांच्या श्रेणीत येतात. मात्रकाही ठिकाणी पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे कायाची तपासणी करण्यात येणार आहे. जर कोणी नियमबाह्य मार्गाने व्यवसाय करत असेलतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi