Thursday, 13 February 2025

चेहऱ्यावरच्या दुख वाचता आले पाहिजे, देह विठ्ठल विठ्ठल झाला

 


अहिराणी आणि खानदेशी :

 अहिराणी आणि खानदेशी :

खानदेशात अहिरांचे वास्तव्य होते. अहिरांनी सुपीक जमिनीवर गुरे चारण्या सोबतच शेती व्यवसाय सुरु केला. शेती व्यवसायाला पूरक असे विविध व्यवसाय करणारे इतर लोक अहिरांशी सततच्या संपर्कात येवू लागले. सत्ताव्यापारव्यवसाय यातील अहिरांच्या भाषेचे वर्चस्व हे खानदेशभर वाढल्याने अहिराणी ही प्रदेशाच्या नावाने म्हणजे खानदेशी बोली या नावाने ओळखली जाऊ लागली. ती एका जातीची भाषा न राहता ती त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचीप्रदेशाची भाषा झाली. अहिरांशी सततचा इतर भाषिकांचा संपर्क आला. तो इतर भाषिक समाजही त्यांच्या स्वतःच्या बोलींची छाप असणारी अहिराणीमिश्र अहिराणी बोलू लागला. बोलीचा उल्लेख करतांना ती त्या प्रदेशाची बोलीखानदेशाची बोली म्हणून खानदेशी या नावाने गणली गेली. खानदेशी बोली ही संकल्पना अहिराणी बोली ह्या संकल्पनेपेक्षा विशाल आहे. त्या-त्या परिसरातील खानदेशी ही त्या-त्या परिसराच्या नावाने संबोधली जाऊ लागली. ज्या ज्या जमातींनी ती भाषा स्वीकारली त्या-त्या जमातींच्या नावाने ती बोली ओळखली जाऊ लागली. यानुसार खानदेशी बोलीचे सामाजिक आणि प्रादेशिक असे प्रभेद निर्माण झालेत. खानदेशीच्या प्रादेशिक प्रभेदांचा विचार करताखानदेशाच्या नैऋत्येकडील बागलाण भागातील ती बागलाणीउत्तरेकडील तापीच्या परिसरातील ती तप्तांगीदक्षिणेकडील ती दखनी किंवा डोंगरांगीपश्चिमेकडील ती वरल्ह्यांगीपूर्वेकडील ती खाल्ल्यांगीनेमाड कडील ती नेमाडीडांगान परिसरातील ती डांगीतसेच तावडी असे प्रादेशिक प्रभेद आढळतात. तर सामाजिक प्रभेदातखानदेशात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक जातीच्या स्वतःच्या बोलीची छाप असलेली अहिराणी बोली ही त्या जातीची स्वतंत्र नामधारण करुन सामाजिक प्रभेदाचे रुप बनली. त्यात महाराऊलाडशाखीय वाण्यांची ती लाडसिक्कीभिल्लाची ती भिलाऊअहिरांची ती अहिराणीलेवा पाटीदारांची ती लेवा पाटीदार बोलीपावरांची ती पावरीकाटोनी भिल्लांची ती काटोनीघाटावरुन आलेल्यांची स्वतःच्या बोलींची छाप असलेली ती घाटोयीगुजरांची ती गुजरीभावसारांची ती भावसारीपरदेशांची ती परदेशी अशा जातीनिहाय अहिराणीच्या सामाजिक प्रभेदांची यादी वाढतच गेली. या सर्व सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेदांना एकाच नावाने सामावून घेणारी विशाल संकल्पना ही "खानदेशी बोली" जी संपूर्ण खानदेशात बोलली जाते.

 

डॉ. रमेश सूर्यवंशी

'अभ्यासिका', वाणी मंगल कार्यालया समोर कन्नड

ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र) पिन ४३११०३

अहिर - अहिराणी :

 अहिर - अहिराणी :

रामायणमहाभारतमत्स्यपुराणबृहदसांहितानासिक लेणेमहाराष्ट्र ज्ञानकोशडब्ल्यू क्रूक यांचा कास्ट अॅण्ड ट्राइब्ज इन नॉर्थ वेस्टर्न इंडियाआ. इ. इन्थोव्हेन यांचे ट्राईब्ज अॅण्ड कास्ट ऑफ बॉम्बे इ. ग्रंथावरुन अहिरांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. त्या नुसार खानदेश हा मूळचा अहिरांचा देश. अहिर ही शेतकऱ्यांचीगवळ्यांची एक जात. प्रमुख उद्योग गुरे राखणे. मत्स्यपुराणात सात तर वायू पुराणात दहा अहिर राज्यांची संख्या दिसते. इ.स. १५० मध्ये आध्रांचा ऱ्हास होऊन अभीरांचे राज्य आले. वायव्येकडून ते दक्षिणेकडे सरकत आले. चौथ्या शतकात खानदेशावर अहिरांचे राज्य होते. आठव्या शतकात काठी लोक जेव्हा गुजरातेत आले तेव्हा बराच मुलुख हा अहिरांच्या ताब्यात होता.

या अहिरांची वाणी-बोली ती अहिरवाणी किंवा अहिराणी. खानदेशात अहिराणी ही कृषि जीवन जगणाऱ्याची बोली आहे. खानदेशातील जिल्ह्यातील भूप्रदेशात ती बोलली जाते. म्हणून ती खानदेशी. आता खानदेश हा जळगांव व धुळे या दोन जिल्ह्यात विभागला आहे. मात्र या बोलीचे क्षेत्र या जिल्ह्याच्या क्षेत्राहून ही मोठे आहे. चांदवडचे डोंगरसातपुड्याचे डोंगरवाघुर नदी आणि संह्यपर्वतअजिंठ्यांचे डोंगर या निसर्गाने तोडून वेगळ्या ठेवलेल्या खोलगट भूभागातखदाणीतखाणीत ही खानदेशीअहिराणी बोलली जाते. या भूभागात मग नासिकनंदूरबारछत्रपती संभाजी नगरजळगांवधूळे या जिल्ह्याच्या गावांचाही समावेश होतो.

           खानदेशात अहिर होते. कालानुरुप त्यांच्या नावांत बदल झाला. मात्र त्यांची अहिराणीअभिरोक्ती किंवा अभिरी आजही टिकून आहे. अभीर म्हणजे यदुवंशीयअभीर किंवा अहिर ही गवळ्यांचीगुरे चारणाऱ्यांचीकृषि-उद्योग करणाऱ्यांची एक जात.

इतर भाषिकांनी अहिरांच्या बोलीला अहिरवाणी किंवा अहिराणी म्हणून ओळखले किंवा संबोधले. अहिर हे खानदेशात सर्वत्र पसरलेले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या बोलीवर सुद्धा अहिराणीची छाप पडणे साहजिकच होते. खानदेशातील अहिराणीला खानदेशी या प्रादेशिक नावाने देखील ओळखले जाऊ लागले.

अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख खानदेश प्रस्ताविक

 अहिराणी बोली भाषावैज्ञानिक ओळख

खानदेश प्रस्ताविक

अहिराणी ही खानदेश या भू प्रदेशात बोलली जाणारी बोली. महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या मिळून होणाऱ्या प्रदेशास आजही खानदेश म्हणून ओळखतात. पूर्वी खानदेश हा मुंबई इलाख्याचा एक जिल्हा होता. प्राचीन काळी खानदेश या प्रदेशाचा विस्तार सातपुडा पर्वतापासून दक्षिणेकडे सातमाळा व अजिठ्यांचे डोंगर येथ पर्यंत तर पूर्वेकडील वऱ्हाड प्रांत ते निमाड जिल्हा पासून पश्चिमेकडे बडोदे संस्थान व रेवाकाठ जहागिरी पर्यंत इतका होता. याचे अतिप्राचीन नाव ऋषिकदेश. यादवांच्या काळात हा भूभाग सेउनदेश म्हणून ओळखला जाई. मोगलांच्या काळात हा भाग खानदेश म्हणून ओळखला जाई. व्यवस्थापनाच्या दृष्टिने इ.स. १९०६ मध्ये खानदेश जिल्ह्याचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश हे दोन भाग पाडण्यात आले. पुढे १९६० पासून पूर्व खानदेशास जळगांव जिल्हा व पश्चिम खानदेशास धुळे जिल्हा अशी नावे देण्यात आली.

खानदेश इतिहास :

रामायण- महाभारत यांतील उल्लेखलेल्या ऋषकदेश या भूप्रदेशाच्या वर्णनाशी खानदेशाचा भूभाग जुळतो. खानदेश या शब्दाची उत्पत्ती कान्हदेवकान्हेरदेवकान्हाचा देशकानबाई या शब्दांत शोधण्याचा आजवर प्रयत्न झालेला आहे. मात्र त्यात तथ्य वाटत नाही. खानदेश या भूप्रदेशाहून इतरत्र कान्हाचा किंवा श्रीकृष्णाचा संबंध अधिकचा आहे. तसेच खानदेशातील अनेक उत्सवांपैकी कानबाईकानुबाई हा एक उत्सव आहे. त्यामुळे एखाद्या भूप्रदेशाला त्या परिसरातील एका उत्सवाच्या नावाने ओळखले जाणे ही शक्यताही कमीच आहे. कान किंवा कानन म्हणजे अरण्यवनगवताळ प्रदेश. कान किंवा खान या शब्दाचा अर्थ खाणखदानथाळामध्ये खोल असणारा भागखनि किंवा उत्पत्तीस्थान. सातपुडांच्या रांगासह्याद्रीच्या रांगाचांदवडचे डोंगर आणि वाघूर नदी व परिसरातील डोंगर रांगा यामुळे हा परिसर खोल खदाणी सारखाखाणीसारखा आहेच. गिरणातापीनर्मदा या नद्यांच्या खोऱ्यांचा हा भाग दाट अरण्याचागुरांसाठी विपूल गवत असणारा प्रदेश. येथे विपुलता (खाण) होतीचौफेर नैसर्गिक तटबंदीमूळे (भेसळ मुक्त अशी) शुद्धताव शुद्ध वंश (खानखानदानी) होती. म्हणून खदाणीचा खाणीचा देशचांगल्या वंशाचा-खानदानीचा देशगवताचा-कानन देश यावरुन खानदेश हे नामाभिद्यान झाले असावेया व्युत्पत्तीचांही विचार करण्याजोगा आहे.

अशिरगड हे अश्वत्थाम्याचे स्थान होते. पांडवाविरुद्ध तोरणमाळचा राजा लढला होता ते तोरणमाळ धुळे जिल्ह्यात आहे असे महाभारतकालीन उल्लेख आढळतात. चाळीसगांव जवळील पाटणे परिसरात आद्य पराष्मयुग व तदनंतर अप्पर पराश्म युगात मानवी वस्ती होती हे उत्खननात सापडलेल्या पाच स्थरांवरुन सिद्ध होते. बहाळ येथे सापडलेली नाणीघटोत्कच लेण्यानागदमूंदखेडेमेहुनबारेबहुलवाड येथे सापडलेले ताम्रपटसारजादेवी मंदिरावरील शिलालेखअंजिठा लेण्याया पुराव्याआधारे खानदेशच्या इतिहासावर प्रकाश पडतो. खानदेशात इ.स.पूर्व चौथे ते इ.स. दुसरे शतकात मौर्याचे राज्य होते. पहिल्या शतकात सातवाहनांची सत्ता होती. ३ रे ते ५ वे शतकांत वाकाटकांची सत्ता होती (वर्षदेवस्वामीदासमुलंदा) चौथ्या शतकांत वाकाटकांसोबतच अभीरांचीही सत्ता होती. इ.स. ६५५ ते ७०२ या काळात सेद्रकांचे (निकुम्माल्लशक्तीनृपती जयशक्तीनृपती वैरसेन) राज्य होते. या सोबतच सहाव्या शतकांत कलचुरी तर सातव्या शतकांत पुलकेशीचे तर आठव्या शतकात त्रैकूटकांचे राज्य होते. त्यानंतर नवव्या ते बाराव्या शतका पर्यंत राष्ट्रकूटसोमवंशीआणि यादव यांचे राज्य होते. पुढे अल्लाउद्दीन खिलजीअकबरयांच्या सत्तेनंतर १८ व्या शतकांत (इ.स-१७२०) निजामांचे राज्य होते. १७६० ते १८१८ हा मराठ्यांचा काळ तर १८१८ ते १९४७ हा ब्रिटिशांचा काळ गणला जातो.

अभिजात मराठी अहिराणी बोलीचा इतिहासmuk

 अभिजात मराठी

अहिराणी बोलीचा इतिहास

(भाग १)

 

             अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे  २१२२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होत आहे. हे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक हात मदत करत आहेत. शासनही याला पाठबळ देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

              अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत हा भव्य सोहळा अनुभवणार आहेत.  त्यानिमित्ताने राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृतींना उजाळा या निमित्ताने देण्यात येणार आहे. या निमित्ताने खान्देशातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेवरील केलेले संशोधन व अहिराणी बोलीखानदेश इतिहास,अहिराणी शब्दकोश या विषयावर केलेले लिखाण ...

अहिराणी बोलीचा इतिहास

 अहिराणी बोलीचा इतिहास

(भाग १)

 

             अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे  २१२२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होत आहे. हे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक हात मदत करत आहेत. शासनही याला पाठबळ देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

              अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत हा भव्य सोहळा अनुभवणार आहेत.  त्यानिमित्ताने राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृतींना उजाळा या निमित्ताने देण्यात येणार आहे. या निमित्ताने खान्देशातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी अहिराणी बोली भाषेवरील केलेले संशोधन व अहिराणी बोलीखानदेश इतिहास,अहिराणी शब्दकोश या विषयावर केलेले लिखाण ...

 

नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची तातडीने चौकशी करावी

 नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलच्या दुर्व्यवस्थेची

तातडीने चौकशी करावी

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

• नगरविकासच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने

१५ दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश

 

मुंबईदि. १३ : नागपूर येथील मेडिट्राना हॉस्पिटलकडे अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र नसणे तसेच इमारत बांधकामामध्ये अनियमितता असूनही हॉस्पिटल सुरू ठेवण्यासाठी जबाबदार असणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतील संबंधित उपायुक्तवैद्यकीय अधिकारीनगररचनाकार यांची नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत १५ दिवसांत चौकशी करण्यात यावीअसे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मेडिट्राना हॉस्पिटलसंदर्भातील अनियमिततेबाबत आमदार विकास ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकी झाली. या बैठकीस नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी ‘मेडिट्राना’ बाबतच्या तक्रारीचा सविस्तर आढावा घेतला. श्री. बावनकुळे म्हणालेहॉस्पिटल हे रुग्णांच्या सेवेसाठी असते. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी त्यांनी सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. बांधकाम अनियमितता अथवा अग्निशमन ना हरकत नसणे ही गंभीर बाब आहे. हॉस्पिटल बंद करणे हा शासनाचा उद्देश नसून ते सुस्थितीत कार्यरत राहणे गरजेचे असल्याने त्यांना कायद्यानुसार नोटीस देऊन एका महिन्यात त्यातील त्रुटी पूर्ण करून घ्याव्यात. याचबरोबर या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यात यावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

अनियमिततेसंदर्भात मेडिट्राना हॉस्पिटलबाबत तक्रार प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने बॉम्बे नर्सिंग ॲक्ट १९४९ नुसार हॉस्पिटलला नोटीस देऊन त्रुटींची पूर्तता करून घ्यावीअसेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नगरविकास विभागाच्या सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीमध्ये आरोग्य विभागाचे सहसचिव तसेच अग्निशमन विभागाचे अधिकारी यांचा समावेश करावाअसे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

Featured post

Lakshvedhi