Tuesday, 4 February 2025

प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक समिती गठीत न केल्यास ५० हजार दंड

 प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती बंधनकारक

समिती गठीत न केल्यास ५० हजार दंड

                                                    - जिल्हाधिकारी संजय यादव

 

मुंबई दि ३१ : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीस प्रतिबंध कायद्यानुसार सर्व शासकीयनिमशासकीयखाजगी कार्यालयआस्थापनेमध्ये अंतर्गत  तक्रार निवारण समिती गठीत करणे आवश्यक आहे. समिती गठीत न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

दहा व त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात समिती गठित करणे आवश्यक आहे. या समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिलेची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावीतसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांमधून सामाजिक कार्याचा अनुभव किंवा कायद्याचे ज्ञान असलेले दोन कर्मचारी सदस्य म्हणून नियुक्त करावेत व महिलांच्या प्रश्नांशी बांधिल असलेल्या अशासकीय संघटनेचा एक सदस्य असावा.   त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती गठीत केल्याचा फलक दर्शनी भगात लावणे बंधनकारक आहेत. तसेच या अधिनियमानुसार दर तीन वर्षांनी या समितीची स्थापना किंवा पुनर्रचना करणे आवश्यक आहे. असे या कायद्याच्या अमलबजावणी करून घेणारे जिल्ह्याचे प्रमुख उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) तथा जिल्हा अधिकारी गणेश सांगळे यांनी सांगितले आहे.

या कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठित करणे अनिवार्य

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ संदर्भातील अधिनियमानुसार प्रत्येक शासकीय / निमशासकीय कार्यालयसंघटनामहामंडळेआस्थापनासंस्था शाखा ज्यांची शासनाने स्थापना केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पूर्ण किंवा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निधीशासनामार्फत किंवा स्थानिक किंवा शासकिय कंपनी किंवा नगरपरिषद किंवा सरकारी संस्था यांना दिला जातो.  अशा सर्व आस्थापनातसेच कोणतेही खाजगी क्षेत्रसंघटना किंवा खाजगी उपक्रम/संस्थाएंटरप्रायजेसअशासकिय संघटनासोसायटीट्रस्टउत्पादकप्रवठावितरण व विक्री यासह वाणिज्यव्यावसायिकशैक्षणिककरमणूकऔद्योगिकआरोग्य इ. सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादाररुग्णालयशुश्रूषालयक्रीडा संस्थाप्रेक्षागृहेक्रीडा संकुले इ. ठिकाणी किंवा अधिनियमात नमूद केलेल्या कामाच्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांच्या ठिकाणी अंतर्गत समिती गठित करणे अनिवार्य असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी म्हटले आहे.

0000


 


सूर्याच्या उपासनेची* *आज रथसप्तमी*

 ⚜🌹⚜🚩🕉🚩⚜🌹⚜


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻

                       *२/२*


            *सूर्याच्या उपासनेची*

              *आज रथसप्तमी*

              

⚜🌹☀️🚩🛕🚩☀️🌹⚜


        *ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों*

        *तेजो राशे जगत्पते,*

        *अनुकंपयेमां भक्त्या,*

        *गृहाणार्घय दिवाकर*


        *भारतीय संस्कृती पंचमहाभुताचा आदर करणारी. सर्वात प्राचीन सनातन भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सणाचा आनंद प्रदीर्घ टिकणारा असतो. मर्मबंध ठेवींचा ठरतो.*

        *आज रथसप्तमी. हळदीकुंकू कार्यक्रमाचा शेवटचा दिवस. महिनाभर घरोघरी हळदीकुंकवाचे कार्यक्रमात नवविवाहितांचे.. बालकांचे हलव्याचे दागिने घालून कोडकौतुक सुरु होते.*

        *हळदीकुंकू कार्यक्रम हा व्यापक समाज हिताचा. फ्लॅट संस्कृतीत तर फारच गरजेचा. सासर माहेरच जोडणारा नाही तर  समाजही जोडणारा कार्यक्रम. महिनाभर सेवन केलेला तिळगुळ आरोग्यदायी ठरलाच पण एकमेकांना दिलेल्या वाणाची आठवण वर्षभर राहणार. घरात कितीही वस्तू असल्या तरीही हे नित्योपयोगी वस्तूंचे वाण वर्षभर आठवण देणारे. अगदी पोस्टकार्ड वाणात दिले तरीही कित्येक नाती जोडली जातात.*

        *आज रथसप्तमीला पहाटेच गावोगावच्या नदीत स्नान करुन सूर्याला अर्घ्य दिले जाणार. तो आमचे जीवन तेजोमय करायला रोज येतोय. आज तुळशी वृंदावनासमोर रथ आणि सूर्य अशी रांगोळी काढून त्याचे पूजन..खीर नैवेद्य अर्पण होणार. सूर्य पूजनाचा प्रकार म्हणून देशविदेशात आरोग्यदायी सूर्य नमस्काराचे विक्रम होणार.*                    

        *सूर्य ही आमची देवता. डोळ्याने दिसणारी, कृपेचा अनुभव देणारी ही देवता. सूर्य निरपेक्षपणे अविरत कार्य कसे करावे याचा आदर्श. सूर्य कृपेवरच या चराचराचे जीवन.. भवितव्य अवलंबून आहे. चराचरात आमच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारा हा सूर्य.*

        *कोवळी सूर्यकिरणे ही आरोग्य दायी, अनेक रोगापासून मुक्तता देणारी, हे आज विज्ञानाने सिद्ध झालेय. सूर्य हा स्वयंप्रकाशी आहे. त्याच्याप्रमाणेच निस्पृह होत स्वयंप्रकाशीत होण्यासाठी प्रेरणा देतो. परप्रकाशीत म्हणजे परावलंबी, तर स्वयंप्रकाशीत.. सामर्थ्यवान.. तेजस्वी होत इतरांचेही जीवन उजळवा हा संदेश सूर्य देतो.  आहे.* 

        *आत्यंतिक सुखाच्या अट्टाहासात होणारी वाटचाल कधीकधी निसर्गचक्रात अडथळा आणते, मग वसुंधराच संकटात सापडते. या वसुंधरेला वाचवायला जावे ते सूर्य देवाकडेच.*       

        *हे गगनराज, व्योमराज.. भास्कर तुमच्या तेजाने हे भूमंडळ उजळते. तुमची कोटी कोटी किरणे म्हणजे उधळलेले अग्निबाणच. पण आमच्याकडे येताना मात्र अमृत कण होत इथल्या अणूरेणूंना प्रकाशमान करतात. त्या तेजावरच आमचे जनन मरण अवलंबून आहे, तेच नविन साज चढवतात.*

        *ज्योती प्रमाणे चमकणारी तुमची मुर्ती आहे. तुमच्या राजसभेत सगळ्या ग्रहांचे मंत्रिमंडळ हजर आहे. हे भास्करा आता तूच या वसुंधरेची लाज राख. पृथ्वीवरचे संकट दूर कर. आमच्या जीवनाचा विकास कर.*


🌹🌞🌹🔆🙏🔆🌹🌞🌹


  *तेजोनिधी लोहगोल,*

  *भास्कर हे गगनराज*

  *दिव्य तुझ्या तेजाने*

  *झगमगले भुवन आज*

  *हे दिनमणि व्योमराज,*

  *भास्कर हे गगनराज*


  *कोटी कोटी किरण तुझे*

  *अनलशरा उधळिती*

  *अमृतकण परि होउन*

  *अणुरेणु उजळिती*

  *तेजातच जनन मरण,*

  *तेजातच नविन साज*

  *हे दिनमणि व्योमराज,*

  *भास्कर हे गगनराज*


  *ज्योतिर्मय मूर्ति तुझी,*

  *ग्रहमंडळ दिव्यसभा*

  *दाहक परि संजीवक*

  *तरुणारुण किरणप्रभा*

  *होवो जीवन विकास,*

  *वसुधेची राख लाज*

  *हे दिनमणि व्योमराज,*

  *भास्कर हे गगनराज*


🌷💫🌺☀️🏵☀️🌺💫🌷


  *गीत : पुरुषोत्तम दारव्हेकर*  ✍️

  *संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी*

  *स्वर : पं. वसंतराव देशपांडे*

  *नाटक : कट्यार काळजात घुसली*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧                                       


         🚩 *ॐ सूर्याय नमः* 🚩

      

    🌹🙏 *सुमंगल प्रभात* 🙏🌹

                 *०४.०२.२०२५*


🌻☀️💫🏵🌞🏵💫☀️🌻

निष्पापांचे रक्त 'अग्रलेख एक सडेतोड उत्तर

 श्री. संपादक,

म.टा.

तुमच्या आजच्या (जानेवारी ३१,२०२५) अंकातील 'गंगेतील निष्पापांचे रक्त 'अग्रलेख वाचला. खरं म्हणजे, हे पत्र मी माझ्या पूर्वीच्या सवयीनुसार तुमच्याकडे पाठवायला पाहिजे होते, पण अशा निर्भिड पत्रांना नेहमीच कचऱ्याची टोपली दाखवली जाते, ह्या स्वानुभवाने या वेळी सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. कारण या मिडीयावर तुमची सेंन्सॉरशिप लागू होत नाही.

पूर्वी मी रोज कमीतकमी दोन मराठी वृत्तपत्रांचा नियमित वाचक होतो. पण नंतर मी टाईम्स (इंग्रजी) सोडून बाकी सगळी मराठी वृत्तपत्रे वाचणे बंद केले. पण सौ. च्या आग्रहास्तव आम्ही परत म.टा. ची वार्षिक वर्गणी भरून तो पेपर चालू केला, तो फक्त दोन कारणांस्तव- 

१). त्याच्यातील शब्दकोड्यासाठी आणि २). रविवारच्या अंकातील तंबी दुराई यांच्या उत्कृष्ट स्तंभ (कॉलम) साठी, पण हातात अंक पडला की एखादी तरी नजर इतर पानांवर पडतेच

तर अशी नजर आज तुमच्या आजच्या अग्रलेखावरही पडली. आणि तुम्हाला सांगतो की माझा अजिबात अपेक्षाभंग झाला नाही. त्याचं काय आहे, संपादक साहेब, मोदी-योगी जोडीने आयोजित केलेल्या या जगातील सर्वात मोठा मेळाव्याकडे सगळे जग अवाक् होऊन कौतुकाने पाहाते आहे. या मेळाव्यात सामील झालेल्या हजारो परदेशी पाहुण्यांनी तोंड भरून तेथील व्यवस्थेचे, स्वच्छतेचे आणि काटेकोर आयोजनाचे कौतुक करून योगींना १००/१०० मार्क दिले आहेत. हिंदुंच्या धार्मिक भावनांना ही भरभरून सन्मान दिला जातो आहे. अशावेळी 'काय करावे, काही सुचेना' अशा मानसिक अवस्थेमध्ये असणाऱ्या भारतातील पुरोगामी, बुद्धिवादी(?) लोकांना आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या मिडियाला एक संधी या मेळाव्यात झालेल्या त्या दुर्दैवी घटनेने मिळाली आणि वेळ न घालवता त्यांनी त्या संधीचा वापर करण्याचा  प्रयत्न सुरू केला आहे. आजचा तुमचा अग्रलेख हा या प्रयत्नांचाच एक भाग आहे. 

प्रथम आपण या मेळाव्यातल्या भाविकांच्या श्रद्धेविषयी बोलू. तुम्ही गंगा काठावर राहूनही गंगास्नान न करणाऱ्या संत रोहिदासांचे उदाहरण दिले आहे. भारतीय परंपरेत संत ही उपाधी ज्याची परमेश्वरावर अनन्यसाधारण भक्ती आणि श्रद्धा आहे, त्याला दिली जाते. त्यामुळे संत रोहिदासांची परमेश्वरावर अत्यंत श्रद्धा होती, हे ओघाने आलेच. रोहिदास हे गंगाकिनारी राहात होते (ह्रूषिकेश ते बिहार पर्यंत कुठेही) तरी या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि गंगा किनारी राहात असल्याने ते गंगेत डुबकी मारीत नसले आणि घरीच बादलीतल्या पाण्याने अंघोळ करीत असले तरी ते गंगेचेच पाणी होते ना ? मग त्यांना आपो आपच गंगास्नानाचे पुण्य रोजच लाभत होते. गंगामातेवरील भारतीयांची श्रद्धा हजारो वर्षांपासून लवलेशाचाही फरक न होता आज २१व्या शतकातही अभेद्य राहिली आहे. अनेक सांस्कृतिक आक्रमणांनंतरही ती तसूभरही कमी झालेली नाही. आधुनिक विज्ञानाच्या आक्रमणाने ही ती नष्ट होण्याची सुतराम ही शक्यता नाही. उलट, परधर्मीय असणाऱ्या विज्ञानवादी विदेशी लोकांनाही आता गंगास्नानाचे महत्त्व पटते आहे. *आणि हीच तुमची पोटदुखी आहे*. 

दुसरे उदाहरण तुम्ही 'पुण्य ते उपकार,पाप ते परपीडा ' या तुकारामांच्या प्रसिद्ध उक्तीचे दिले आहे.आणि कुंभमेळ्यात हजेरी लावणाऱ्या बेछूट तथाकथित धार्मिकांना ही उक्ती माहीत नसावी, असे म्हटले आहे.

कोवीड महामारीच्या काळात जगातील बहुतेक गरीब राष्ट्रांना हजारो कोटी रुपयांची ( किंवा डॉलर्स) किंमतीची लस एक पैसाही न घेता मोदींनी (म्हणजेच धार्मिक भारतीयांनी) पुरविली. हा उपकार म्हणजे पुण्याची फार मोठी कमाई मोदींनी म्हणजेच भारतीयांनी केली, हे लक्षात ठेवूनच भारतीयांनी सलग तिसऱ्यांदा, असे पुण्य मिळवून देणाऱ्या मोदींना पंतप्रधान बनविले, हे तुम्ही विसरलेले दिसतात. आणि कुंभमेळाव्या सारख्या पवित्र ठिकाणी परपिडा करणे भाविकांच्या मनातही येणार नाही, हे जितके खरे तितकेच योगी - मोदींचे विरोधकही धजावणार नाही, इतकी चोख व्यवस्था योगींनी ठेवली आहे. 

जेंव्हा भारतीयांची लोकसंख्या आजच्या पेक्षा तुलनेने कमी होती त्या काळातही कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात बिगर भाजपा सरकारांच्या काळातही सरकारी अनास्था आणि अव्यवस्थेमुळे शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. कारण या सरकारांना कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व कळलेच नव्हते. पण योगींनी भारतीयांची कुंभमेळ्याप्रती भारतीयांची श्रद्धा लक्षात घेऊन त्याला एखाद्या उत्सवाचे नीटनेटके रुप दिले. त्यांनी धार्मिक भावनांना योग्य सामाजिक रुपही देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मतदान करणाऱ्या सुमारे ८० कोटी लोकांपैकी निम्मे लोकांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून एकदिलाने या उत्सवात भाग घेतला. एकीकडे राहुल गांधी जातीच्या मुद्यावर भारतीयांमध्ये फूट पाडण्याचा उद्योग करीत असताना, सर्व भारतीयांची एकजूट करण्याचा यशस्वी प्रयत्न  योगी-मोदींनी कुंभमेळ्यातून साधला आहे, *हे तुमच्या पोटदुखीचे दुसरे कारण आहे*. एक लाखाची राजकीय सभा किंवा मेळावा आयोजित करताना पुढाऱ्यांना किती पैसै वाटावे लागतात, हे उघडे गुपीत आहे, पण इथे तर स्वखर्चाने कोट्यवधी गरीब लोक शेकडो मैलांचा प्रवास करत आनंदाने या उत्सवात सहभागी कसे होतात? असा प्रश्न *हे तुमच्या पोटदुखीचे आणखी एक कारण आहे*.

तसेच, एका धार्मिक उत्सवासाठी सहा, सात हजार कोटी रुपये खर्चून सरकारी तिजोरी मध्ये जवळपास दोन लाख कोटी रुपयांची भर कशी टाकू शकतात, हा ही तुम्हाला भेडसावणारा प्रश्न आहे.

शेवटी, एक अद्वितीय आणि डोळ्यांचे पांग फेडणाऱ्या या उत्सवातील एकूणच सर्व व्यवस्था, स्वच्छता, टापटीप, नियोजन यांचे कौतुक न करता, एका दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने योगींना एका क्षणात हिरोचा झिरो करून त्यांना व्हिलन बनविण्याचा प्रयत्न तुम्ही आजच्या अग्रलेखातून केला आहे तो कोट्यवधी हिंदूंना मान्य होणार नाही, हे लक्षात ठेवा.


सतीश कुलकर्णी, (9822 064 709).

भाजत शिजवताना काळजी घ्या पहा जीवावर कसे बेतते

 


जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठायोजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण

 जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामाच्या प्रगतीचा मुख्य सचिवांनी घेतला आढावा

·         योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण

·         मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केली उपक्रमाची प्रशंसा

मुंबईदि. : जल जीवन मिशनच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण भागात प्रत्येक घराला कार्यात्मक घरगुती नळजोडणी देण्यात येते. पूर्ण झालेल्या योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी करण्याची योजना पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. याची प्रशंसा करुन इतर विभागांनी देखील त्यांच्या मालमत्तांची देखभाल दुरुस्ती स्थानिकरित्या उपलब्ध कारागिरांकडून करुन घेण्यासाठी त्यांची क्षमता बांधणी करण्याबाबत विचार करावाअसे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियानाच्या शिखर समितीची बैठक मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत त्यांनी जल जीवन मिशन कामाच्या व्याप्ती घटकाचा त्यांनी आढावा घेतला. पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेशालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओलवित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयजल जीवन मिशनचे अभियान संचालक ई.रविंद्रनमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय जल जीवन अभियान संचालक अरुण केंभवी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जल जीवन मिशन प्रगतीचा आढावा

राज्यात एकूण 40,297 गावे असून 1,00,404 वस्त्या आहेत. यातील एकूण 1.46 कोटी लक्ष्यित घरांपैकी 1.29 कोटी घरांना कार्यात्मक नळ जोडणी (एफएचटीसी) पुरविण्यात आली आहे. महाराष्ट्राने नळ जोडणी देण्याच्या बाबतीत 88.08 टक्के यश मिळवले आहेजे राष्ट्रीय सरासरी 79.71 टक्के पेक्षा जास्त आहे. 43,241 योजनांपैकी (यामध्ये पीव्हीटीजी जनमान योजना समाविष्ट आहेत आणि शाळा व अंगणवाड्या वगळल्या आहेत) 43,182 योजनांसाठी (99.86 टक्के) कामाचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी 28,110 योजनांमध्ये (65.21 टक्के) काम प्रगतीपथावर असून 15,010 योजनांची (34.82 टक्के) कामे पूर्ण झाली आहेत.

राज्यातील 81,522 शाळांपैकी 80,876 शाळांना (99.20 टक्के) नळ जोडणी प्रदान करण्यात आली आहे. तर, 90,664 अंगणवाड्यांपैकी 89,386 अंगणवाड्यांना (98.59 टक्के) नळ जोडणी देण्यात आली आहे. वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 26 जानेवारी 2025 पर्यंत जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीसाठी एकूण 4,925.24 कोटी रुपये खर्च झाले असून वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये एकूण 17,296.02 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती यावेळी विभागामार्फत देण्यात आली.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

 महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 

२३ हजार ७७८ कोटींची तरतूद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी,

 केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार

·         २०१४ नंतर एकाच वर्षात २० पट तरतूद

मुंबईदि. ३ :- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापुर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले. तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते.

महाराष्ट्रात सध्या १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रूपयांचे ४७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून ६ हजार ९८५ किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या  'डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसीचार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात ५ हजार ५८७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३२ अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे.

रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली ४ हजार ३३९ मार्ग अंतरासाठी कार्यान्वित केली जाणार आहे. यातील सध्या ५७६ किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वित आहे. राज्यभरात २०१४ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी १ हजार ६२ रेल्वे उड्डाण मार्गभुयारी मार्ग (आरएफओबीआरयुबी) बांधण्यात आली आहेत. याशिवाय २३६ ठिकाणी लिफ्ट३०२ एस्कलेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच ५६६ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध दिली आहे. याशिवाय राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा ११ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज, सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे.

Monday, 3 February 2025

काही जण गायींना पोळी खाऊ घालतात खास त्यांचेसाठी* पौर्णिमा असो किंवा अन्य कोणताही दिवस पोळी देऊ नका.

 *काही जण गायींना पोळी खाऊ घालतात खास त्यांचेसाठी*

पौर्णिमा असो किंवा अन्य कोणताही दिवस पोळी देऊ नका.



🐂🐄 *गो मातेचे अन्न*  🎋🌾


आपल्या घरी गाय आली की आपण तिला प्रेमाने पोळी-भाकरी खाऊ घालतो, असे चित्र सर्वसाधारणपणे सगळीकडे दिसून येते. गायी सुद्धा प्रेमाने पोळी खातात! पण वास्तव काही वेगळेच आहे, ते असे की पोळी गायीसाठी *जंक फूड* आहे. गायीला कृपया पोळी देऊ नका, *निसर्गाने गायीला शिजवलेले अन्न खायला बनवलेलेच नाही.*


आपण घरात आणलेल्या पालक, मेथी वगैरे भाज्यांमधून आपण आपल्यासाठी पाने ठेवतो आणि बाकी राहिलेले देठ, मुळे फेकून देतो. तुम्हाला जर गाईला, खायला काही द्यायचेच असेल तर उरलेल्या भाज्यांची देठ द्यावीत, तसेच गवत विकत घ्या आणि खायला द्या. दुसरा पर्याय म्हणजे एक रात्र भिजवलेले हरभरे, गहू, तांदूळ, मूग, मटकी द्यावी.


त्यांना पोळी, भाकरी खायला दिली तर त्यांच्या शेणाचा वास माणसाच्या विष्ठेसारखा येतो आणि गाईची पचनसंस्था बिघडते. त्यांच्या पचनसंस्थेमध्ये असलेले बॅक्टेरिया असे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त नसतात किंवा मदत करत नाहीत. आगीवर स्वयंपाक केल्याने अन्नामध्ये रासायनिक बदल होतो, जो गवत खाणाऱ्या प्राण्यांना पचन संस्थेला मान्य होत नाही.


*निष्पाप प्राण्यांची सेवा करताना, कळत नकळत, त्यांचे आरोग्य बिघडण्याचे कारण बनू नका.*


आपण शिजवलेले अन्न खातो, त्यामुळे विष्ठेला दुर्गंधी येते. जर आपण कच्च्या भाज्या, फळे, म्हणजे सर्व काही कच्च खाल्ल्यास विष्ठेचा वास वेगळा असेल. देवाने ज्या स्वरूपात अन्न दिले आहे, त्याच रुपात  गायीला द्यावे, त्यात छेडछाड करू नका.


मी नुकताच शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गोरक्षण संस्थेला भेट दिली. संस्था चालकांनी मला सांगितले की, गेल्या दोन वर्षापासून त्यांनी कुठलेही गोग्रास स्विकारण्यास बंदी घातली आहे. ज्यांना गाईला खाद्य द्यायचे आहे, त्यांना केवळ गवत देता येते. संस्था चालकांनी सांगितले; गोग्रास दिल्याने पूर्वी गाई वारंवार आजारी होत, त्यांच्या पोटात गॅस होई, त्यामुळे त्या अस्वस्थ असत.  आता गोग्रस ( वरण, भात, भाजी, पोळी, तळलेले पदार्थ वगैरे केळीच्या पानावर ठेवून गाईला दिलेले अन्न) बंद केल्याने, गाई तंदुरुस्त असतात, आणि औषध कमी लागतात.


*शक्य असल्यास गायीला मका, ज्वारी, बाजरीचा भरडा द्यावा सोबत गूळ द्यावा हे तिचे अत्यंत आवडते आणि तिच्या साठी आरोग्यदायी खाद्य आहे*

Featured post

Lakshvedhi